Gangster Harpreet Singh Uppal Murder Dainik Gomantak
ग्लोबल

Gangster Harpreet Singh Uppal Murder: गँगस्टर हरप्रीत सिंग उप्पलची कॅनडात हत्या; पोलिसांनी जारी केले CCTV फुटेज

Canada Police release CCTV: कॅनडातील एडमॉन्टनमध्ये भारतीय वंशाचा गँगस्टर हरप्रीत सिंग उप्पल आणि त्याच्या 11 वर्षाच्या मुलाची गोळीबारात मृत्यूी झाल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

Manish Jadhav

Canada Police release CCTV Footage Gangster Harpreet Singh Uppal Murder: कॅनडातील एडमॉन्टनमध्ये भारतीय वंशाचा गँगस्टर हरप्रीत सिंग उप्पल आणि त्याच्या 11 वर्षाच्या मुलाची गोळीबारात मृत्यूी झाल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

विशेष म्हणजे, कॅनडा (Canada) पोलिसांनी संशयितांचे व्हिडिओ आणि फोटो जारी केली आहेत. कॅनडा पोलिसांनी या हत्येचे वर्णन 'विकृत' म्हणून केले आहे. उप्पल हा अंमली पदार्थांच्या व्यापारात गुंतलेला टोळीचा सदस्य असल्याचे पोलिसांनी सांगितले.

दरम्यान, व्हँकुव्हर सनच्या मते, उप्पल 'ब्रदर्स कीपर' टोळीचा सदस्य म्हणून काम करत होता. खलिस्तानी दहशतवादी हरदीप निज्जरच्या हत्येनंतर भारत आणि कॅनडा यांच्यातील राजनैतिक वादाच्या पार्श्वभूमीवर ही हत्या झाली आहे.

या वर्षी 19 जून रोजी सरे येथील गुरुद्वाराबाहेर निज्जर याची अज्ञात हल्लेखोरांनी गोळ्या झाडून हत्या केली होती. एडमॉन्टन पोलिसांनी (Police) सीसीटीव्ही फुटेज, एका वाहनाचे आणि दोन संशयितांचे जारी केले आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 9 नोव्हेंबर रोजी दुपारी 12 वाजता झालेल्या गोळीबाराच्या संदर्भात याची मदत होऊ शकते.

एडमॉन्टन पोलिस सर्व्हिस (ईपीएस) होमिसाईड सेक्शनचे स्टाफ सार्जंट रॉब बिलावे म्हणाले की, “आम्हाला आशा आहे की फोटो आणि व्हिडिओ क्लिपच्या प्रकाशनामुळे एखाद्याला वाहन आणि संशयितांना ओळखण्यात मदत होईल.''

निवेदनात पुढे म्हटले आहे की, “कधीकधी क्षुल्लक वाटणारे तपशील आमच्या तपासात अत्यंत उपयुक्त ठरु शकतात. शूटिंगबद्दल कोणाला काही माहिती असल्यास, कृपया आम्हाला कॉल करा. व्हिडिओतील दोन व्यक्ती उप्पल आणि त्याच्या 11 वर्षांच्या मुलाच्या हत्येतील संशयित आहेत. दोघांनाही 50 व्या स्ट्रीट आणि एलर्सली रोड येथील शॉपिंग कॉम्प्लेक्समध्ये शूट करण्यात आले.”

दरम्यान, व्हिडिओमध्ये संशयित काळ्या रंगाच्या बीएमडब्ल्यू एसयूव्हीमधून जाताना दिसत आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संशयित उप्पलच्या पांढऱ्या एसयूव्हीकडे धावले, त्यांनी शस्त्रे फेकली आणि घटनास्थळावरुन पळ काढला. उप्पल आणि त्याच्या मुलाला गोळ्या लागल्या आणि काही वेळातच त्यांचा मृत्यू झाला.

पोलिसांचा तपास सुरु असून सोमवार आणि मंगळवारी शवविच्छेदन करण्यात येणार आहे. शूटिंगच्या वेळी उप्पल आणि त्याच्या मुलाशिवाय आणखी एक 11 वर्षांचा मुलगा कारमध्ये होता. गोळीबारानंतर हल्लेखोर घटनास्थळावरुन पळून जाण्यात यशस्वी झाले, असे निवेदनात म्हटले आहे.

एडमॉन्टन पोलिसांनी एका निवेदनात म्हटले आहे की, “9 नोव्हेंबर 2023 रोजी रात्री 12:00 वाजता, अधिकाऱ्यांनी 50 स्ट्रीट आणि एलर्सली रोडच्या परिसरात गोळीबार झाल्याचे म्हटले.''

दुसरीकडे, सीटीव्ही न्यूज एडमॉन्टनच्या वृत्तानुसार, उप्पल याला लक्ष्य करण्याची ही पहिलीच वेळ नाही. यापूर्वी 2021 मध्ये, एडमॉन्टन रेस्टॉरंटमध्ये झालेल्या गोळीबारात उप्पल जखमी झाला होता, ज्याचे पोलिसांनी लक्ष्यित हल्ला म्हणून वर्णन केले होते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Medical College: विद्यार्थ्यांनो लक्ष द्या; ही संधी गमावू नका!! 'गोमेकॉ' ने केलीये फिजिओथेरपीच्या जागांमध्ये लक्षणीय वाढ

Sao Jose De Areal Gramsabha: औद्योगिक कचऱ्याच्या प्रदूषणामुळे कारखान्यांवर कडक कारवाईची मागणी

Goa Fraud: PMO मध्ये सिक्युरिटी इन्चार्ज असल्याचं भासवून टॅक्सीचालकांना गंडा; तोतया व्यक्तीविरोधात तक्रार दाखल!

Calangute: बीचवरुन बेपत्ता झाला 9 वर्षाचा परदेशी पर्यटक, गोवा पोलिसांनी पुन्हा घडवली कझाकस्तानच्या मायलेकांची भेट

Goa Today's Live News: पंतप्रधानांचा सुरक्षा प्रभारी असल्याची तोतयागिरी केल्याप्रकरणी शिरंग जावळ विरोधात तक्रार दाखल

SCROLL FOR NEXT