Canada Aid To Pakistan 47 Million Dollars Dainik Gomantak
ग्लोबल

Pakistan Economic Crisis: पाकड्यांचा कॅनडाच्या तिजोरीवर डोळा! मिळाली 453 कोटींची मोठी 'भीख'; शाहबाज सरकारने भारताविरोधात ओकली गरळ

Canada Aid To Pakistan 47 Million Dollars: दहशतवादाला खतपाणी घालणाऱ्या पाकिस्तानची आर्थिक दुरवस्था आता जगापासून लपलेली नाही. महागाई आणि कर्जाच्या दलदलीत दबलेल्या या शेजारी देशाचा खरा चेहरा पुन्हा एकदा जगासमोर उघड झाला.

Manish Jadhav

Canada Aid To Pakistan 47 Million Dollars: दहशतवादाला खतपाणी घालणाऱ्या पाकिस्तानची आर्थिक दुरवस्था आता जगापासून लपलेली नाही. महागाई आणि कर्जाच्या दलदलीत दबलेल्या या शेजारी देशाचा खरा चेहरा पुन्हा एकदा जगासमोर उघड झाला. आतापर्यंत अमेरिकेसमोर मदतीची याचना करणाऱ्या पाकिस्तानने आता कॅनडासमोरही आर्थिक मदतीसाठी हात पसरले. कॅनडाच्या परराष्ट्र मंत्री अनिता आनंद यांच्या नुकत्याच पार पडलेल्या पाकिस्तान दौऱ्यादरम्यान पाकिस्तानला तब्बल 47 दशलक्ष डॉलर म्हणजे भारतीय चलनानुसार सुमारे 453 कोटी रुपयांचे नवे मदत पॅकेज पदरात पाडून घेण्यात यश आले.

गेल्या दोन दशकांत कोणत्याही कॅनडाच्या परराष्ट्र मंत्र्यांचा हा पहिलाच पाकिस्तान दौरा होता. या संधीचा पूर्ण फायदा उठवत शाहबाज शरीफ सरकारने आपल्या देशातील गरिबीचे भांडवल केले. अंतर्गत बंडखोरी, बलुचिस्तानमधील तीव्र असंतोष आणि स्वतःच्याच भूमीत फोफावलेल्या दहशतवादामुळे पाकिस्तान (Pakistan) सध्या अत्यंत बिकट परिस्थितीतून जात आहे. आपली ढासळलेली अर्थव्यवस्था व्हेंटिलेटरवर जिवंत ठेवण्यासाठी पाश्चात्य देशांकडे भीक मागण्याची जुनी सवय पाळत पाकिस्तानने यावेळी कॅनडाच्या तिजोरीतून पैसा लाटला.

मात्र, या आर्थिक मदतीच्या मोबदल्यात पाकिस्तानने आपला भारतविरोधी अजेंडा पुढे हाकण्याची एकही संधी सोडली नाही. या उच्चस्तरीय बैठकीदरम्यान पाकिस्तानने कॅनडाच्या परराष्ट्र मंत्र्यांसमोर भारताने सिंधू पाणी करार स्थगित केल्याचा त्रागा केला. गेल्या वर्षी पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने घेतलेल्या कठोर भूमिकेमुळे घाबरलेला पाकिस्तान आता आंतरराष्ट्रीय स्तरावर मध्यस्थीसाठी गयावया करत आहे. याशिवाय, कॅनडाच्या परराष्ट्र मंत्र्यांसमोर काश्मीरचा जुनाच राग पुन्हा आळवून भारताला मुत्सद्दी घेराव घालण्याचा निष्फळ प्रयत्न करण्यात आला.

विशेष म्हणजे, अनिता आनंद यांनी रावळपिंडी येथे पाकिस्तानी लष्करप्रमुख आसिफ मुनीर यांची घेतलेली गुप्त भेट बरंच काही सांगून जाते. एका बाजूला पाकिस्तान आपल्या सामान्य जनतेला मूलभूत सुविधा देण्यात पूर्णपणे अपयशी ठरला असून जगभरात कर्जासाठी हात पसरत आहे, तर दुसरीकडे भारतविरोधी प्रोपगंडा चालवण्यासाठी आणि दहशतवादाच्या यंत्रणेला खतपाणी घालण्यासाठी तो परदेशी निधीचा वापर करत असल्याचे पुन्हा एकदा सिद्ध झाले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Pakistan Cricket Team: पाकिस्तान संघात पुन्हा एकदा मोठा फेरबदल! सलमान आगाची कॅप्टन्सी जाणार; 'या' खेळाडूकडे सोपवली जाणार संघाची कमान

Shani Gochar 2026: मोठ्या व्यावसायिक डील अन् पदोन्नतीचा योग! 9 ऑक्टोबरपासून उजळणार 5 राशींचं नशीब; शनीचं नक्षत्र परिवर्तन ठरणार वरदान

Viral Post: सकाळी ऑफिसमध्ये वेलकम, तर दुपारी थेट नोकरीवरून काढलं; जॉइनिंगच्या अवघ्या 4 तासांत महिलेसोबत नेमकं काय घडलं? पोस्ट व्हायरल

सनरूफ, 360-डिग्री कॅमेरा, 10.25 इंच स्क्रीन... Maruti Dzireला टक्कर देण्यासाठी येतेय Tataची नवी Aeris; शुक्रवारी होणार लॉन्च

Asian Games 2026: Chak De India! वादळी खेळाच्या जोरावर भारतानं दक्षिण कोरियाला 8-2 ने लोळवलं; सेमीफायनलचं तिकीट जवळपास पक्कं

SCROLL FOR NEXT