

Pakistan Flash Floods Khyber Pakhtunkhwa: पाकिस्तानातील उत्तर-पश्चिम खैबर पख्तूनख्वा प्रांतात मुसळधार पाऊस आणि अचानक आलेल्या पुरामुळे भयंकर स्थिती निर्माण झाली आहे. निसर्गाच्या या कोपामुळे वेगवेगळ्या दुर्घटनांमध्ये 5 बालकांसह 12 जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला असून 18 जण गंभीर जखमी झाले आहेत. प्रांतीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाने दिलेल्या माहितीनुसार, अनेक ठिकाणी घरांची छते आणि भिंती कोसळल्याने, तसेच काही जण पुराच्या प्रवाहात वाहून गेल्याने या जीवितहानीच्या घटना घडल्या आहेत. मृतांमध्ये 6 पुरुष, 5 मुले आणि एका महिलेचा समावेश आहे, तर जखमींवर विविध रुग्णालयात उपचार सुरु आहेत.
हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, पेशावर, खैबर, मर्दान, बुनेर, बाजौर, लोअर चित्राल, अबोटाबाद, मनसेहरा, तोरघर आणि कुर्रम या जिल्ह्यांना या पावसाचा सर्वाधिक फटका बसला. मुसळधार पावसामुळे (Rain) अनेक सखल भागात पाणी साचले असून एक घर पूर्णपणे उद्ध्वस्त झाले, तर 13 घरांचे अंशतः नुकसान झाले. परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन PDMA, रेस्क्यू 1122 आणि स्थानिक जिल्हा प्रशासनाने बाधित भागांत युद्धपातळीवर मदत व बचाव कार्य सुरु केले. बाधित कुटुंबांपर्यंत तातडीने अन्न, औषधे आणि मदत साहित्य पोहोचवण्याचे स्पष्ट निर्देश प्राधिकरणाच्या महासंचालकांनी प्रशासनाला दिले आहेत.
दरम्यान, सध्यातरी प्रांतातील मुख्य नद्या आणि नाल्यांमधील पाण्याचा प्रवाह मर्यादित असला तरी येत्या 25 जुलैपर्यंत मुसळधार पाऊस सुरुच राहण्याचा अंदाज पाकिस्तान हवामान विभागाने वर्तवला आहे. यामुळे भविष्यात परिस्थिती अधिक बिकट होण्याची शक्यता नाकारता येत नाही. खबरदारीचा उपाय म्हणून प्रशासनाने नागरिकांना अनावश्यक प्रवास टाळण्याचे, पर्यटनासाठी न जाण्याचे आणि नदी-नाल्यांच्या काठापासून दूर राहण्याचे आवाहन केले. तसेच, सर्व जिल्ह्यांतील प्रशासनाला हाय अलर्टवर ठेवण्यात आले असून नागरिकांना अधिकृत आपत्कालीन सूचनांचे पालन करण्यास सांगण्यात आले आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.