Hardeep Nijjar Shot Dead Dainik Gomantak
ग्लोबल

Hardeep Nijjar Shot Dead: खलिस्तानी दहशतवादी हरदीप सिंह निज्जरचा कॅनडात खून, भारतविरोधी कारवायांमध्ये होता फरार

Manish Jadhav

Hardeep Nijjar News: खलिस्तानी समर्थक आणि दहशतवादी हरप्रीत सिंह निज्जर याची कॅनडात हत्या करण्यात आली आहे. त्याच्यावर दोन जणांनी गोळीबार केला. ही घटना सरे येथील गुरुद्वारा साहिबमधील आहे.

निज्जर हा गुरुद्वारा साहिबचा प्रमुखही होता. त्याला तातडीने रुग्णालयात नेण्यात आले असता त्याला मृत घोषित करण्यात आले. हरदीप सिंह हा कॅनडातील अनेक राजकीय पक्षांचा आवडता होता.

दरम्यान, हरप्रीत सिंह निज्जर हा मूळचा जालंधर जवळचा असून, तो बऱ्याच दिवसांपासून कॅनडामध्ये राहत होता. तो अनेक प्रतिबंधित शीख संघटनांशी जोडला गेला होता. पंजाबमधील हिंदू नेत्यांच्या टार्गेट किलिंगमध्येही त्याचा हात होता.

ते प्रामुख्याने बब्बर खालसा इंटरनॅशनल आणि शीख फॉर जस्टिससाठी काम करत होता. निज्जर पाकिस्तानात बसलेल्या दहशतवाद्यांना (Terrorists) शस्त्रे आणि पैसा पुरवत असे जेणेकरुन त्यांचा भारतविरोधी कारवायांमध्ये सहज वापर करता येईल.

दुसरीकडे, कॅनडातील सार्वमत मोहिमेतही त्यांचा हातखंडा होता. तो सोशल मीडियावर खूप सक्रिय होता. तरुणांना खलिस्तानशी जोडण्यासाठी तो नेहमी व्हिडिओ आणि ऑडिओ संदेश पोस्ट करत असे. राष्ट्रीय तपास यंत्रणा एनआयएने त्याच्यावर 10 लाख रुपयांचे बक्षीस ठेवले होते. निज्जर हा भारतविरोधी कारवायांमध्ये फरार होता.

काही काळापूर्वी एनआयएने (NIA) जालंधरमधील त्याची जमीन ताब्यात घेतली होती. केंद्र सरकारच्या म्हणण्यानुसार, जालंधरच्या भरसिंग पुरा गावातील मूळ रहिवासी असलेला 46 वर्षीय निज्जर खलिस्तान टायगर फोर्सच्या ऑपरेशन, नेटवर्किंग, प्रशिक्षण आणि निधी पुरवण्यात सक्रीय होता.

तसेच, कॅनडात राहणारा निज्जर केटीएफचा प्रमुख होता. यापूर्वी एनआयएने भारताविरुद्ध दहशतवादी कारवाया करण्याचा कट रचल्याप्रकरणी निज्जरविरुद्ध आरोपपत्रही दाखल केले होते. पंजाबमधील दहशतवादी कारवायांमध्ये निज्जरचा सहभाग असल्याच्या आरोपावरुन भारताने कॅनडाच्या अधिकाऱ्यांना त्याच्यावर कारवाई करण्यास सांगितले होते.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa HSE Board Exam: गोवा बारावी बोर्ड परीक्षेच्या वेळापत्रकात बदल, JEE परीक्षेमुळे मोठा निर्णय

Fact Check: गोव्यात बोट पलटी होऊन 23 लोकांचा मृत्यू, 64 बेपत्ता; व्हायरल व्हिडिओ मागील सत्य काय?

Tourist in Goa: गोव्यात धार्मिक तणाव, पर्यटकांची पायपीट तर शाळकरी मुलांचे हाल!!

गोव्यातील पोर्तुगीजकालीन पूलांचे होणार 'स्ट्रक्चरल ऑडिट'; सावंत सरकारचा निर्णय

Goa Government Schools: ...गेल्या 5 वर्षांत ट्रेंड बदलला, शासनाचे सरकारी शाळांना प्राधान्य; CM सावंत

SCROLL FOR NEXT