Business Idea| Gucchi Mushroom Dainik Gomantak
ग्लोबल

Business Idea: कमी खर्चात अधिक उत्पन्न! विदेशातही 'या' मशरुमला मोठी मागणी

गुच्छी मशरुम ही एक डोंगरी भाजी असून विदेशात प्रचंड मागणी आहे.

दैनिक गोमन्तक

भारतातील शेतकऱ्यांमध्ये मशरूमची लागवड खूप लोकप्रिय होत आहे. कारण कमी खर्चात आणि कमी जागेत मशरूमचे उत्पादन घेउन शेतकरी मालामाल होउ शकतात. शेतकऱ्यांना त्याच्या लागवडीसाठी वेगळा वेळ देण्याची गरज नाही. त्यापेक्षा पशुपालन, मत्स्यपालन, कुक्कुटपालन आणि मशरूमची (Mushroom) शेती नांगरणी करूनही करता येते. मशरूम लागवडीसाठी माती किंवा खताची फारशी गरज भासत नाही. शेतातील नैसर्गिक खताच्या मदतीने छोट्या खोलीत मशरूमची लागवड करता येते.

हिमालयाच्या (Himalaya) पर्वतरांगांच्या मैदानात अनेक औषधी वनस्पती आढळतात. त्यांना वाढवण्यासाठी विशेष काळजी घ्यायची गरज नसते. यात गुच्छी मशरूमचे वैशिष्ट्य म्हणजे ते वाढवण्यासाठी खते आणि बियाणे घालण्याची गरज नाही, तर हिमालयातील बर्फ वितळल्यामुळे हे मशरूम निसर्गाच्या कुशीत वाढतात. व्हिटॅमिन-बी, व्हिटॅमिन-सी आणि अॅमिनो अॅसिडच्या गुणधर्मांनी समृद्ध गुच्छी मशरूमचे (Gucchi Mushroom) चमत्कारिक आणि औषधी गुणधर्म आहेत. जे हृदयविकार (Heart) असणाऱ्यांसाठी जीवनदायी मानले जाते.

  • बाजारात प्रचंड मागणी
    या गुच्छी मशरूममध्ये असलेल्या चमत्कारिक गुणधर्मांमुळे केवळ भारतातच नाही तर आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतही मागणी जास्त आहे. त्यामुळेच नैसर्गिकरित्या पिकवलेले मशरूम 30 हजार रुपये किलो दराने विकले जाते. हिमालयाच्या मैदानाबरोबरच हिमाचल प्रदेशातील शिमला, कुल्लू, मनाली आणि चंबा या जंगलांमध्ये फेब्रुवारी-एप्रिलमध्ये गुच्छी मशरूम वाढतात. जंगलात (Forest) आणि झुडपात वाढणारी हे मशरूम युरोप, अमेरिका (America) , फ्रान्स, स्वित्झर्लंड आणि इटलीसारख्या अनेक देशांमध्ये पसंत केले जाते. त्यामुळे स्थानिक रहिवासी आणि शेतकरी त्याचे उत्पन्न घेण्यास प्रयत्न करतात.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Lessons from Animals: प्राण्यांकडूनही शिकता येतात जीवनाचे धडे! मुंग्यांची शिस्त, पक्ष्यांची मेहनत अन् निसर्गाची जादू

Bangladesh Resort Fire: बांगलादेशात रिसॉर्टला भीषण आग, 10 जणांचा होरपळून मृत्यू; जीव वाचवण्याची संधीच मिळाली नाही VIDEO

Trigrahi Yog 2026: ग्रहांच्या फेरबदलाचा मोठा चमत्कार! त्रिग्रही आणि बुधादित्य योगाच्या संयोगाने उजळणार 3 राशींचे भाग्य; होणार अफाट धनलाभ

INS Samarthak Warship: भारताची पहिली बहुउद्देशीय युद्धनौका 'समर्थक' नौदलात दाखल; सागरी सुरक्षा होणार अधिक मजबूत!

Hero च्या दोन नव्या बाइक्स लॉन्च! किंमत 1.27 लाखांपासून सुरू, क्रूझ कंट्रोलसह मिळणार अनेक भन्नाट फीचर्स

SCROLL FOR NEXT