Pak Army Video: पहिल्याच LOC दौऱ्यात पाकच्या नव्या लष्करप्रमुखांची भारताला धमकी, पाहा काय म्हणाले

असीम मुनीर यांनी नियंत्रण रेषेवरील पाकिस्तानी लष्कराच्या तयारीची पाहणी केली.
Pak Army Video
Pak Army VideoDainik Gomantak
Published on
Updated on

पाकिस्तानचे नवनियुक्त लष्करप्रमुख असीम मुनीर (Pakistan's New Army Chief General Asim Munir) यांनी नुकतीच सुत्रे हातात घेतली आहेत. पण, नवनियुक्त लष्करप्रमुखांनी जुन्या जनरलच्या पावलावर पाऊल ठेवत भारताविरुद्ध विष उगळायला सुरूवात केली आहे. 'आम्ही आमच्या सीमांचे रक्षम करण्यास सज्ज असून, आपल्यावर हल्ला झाल्यास भारतासोबत युद्धासाठी आम्ही तयार आहोत.' असे असीम मुनीर म्हणाले.

असीम मुनीर यांनी नियंत्रण रेषेवरील पाकिस्तानी लष्कराच्या तयारीची पाहणी केली. यावेळी त्यांनी उच्च अधिकाऱ्यांची बैठक देखील घेतली. पाकिस्तानची सशस्त्र सेना त्यांच्या भूमीचे रक्षण करण्यासाठी सज्ज आहे. पण, आम्हाला डिवचले तर आम्ही लढायला तयार आहोत. असे असीम मुनीर म्हणाले. सीमावर्ती भागाच्या भेटीदरम्यान लष्करप्रमुख जनरल मुनीर यांनी लष्कराकडून नियंत्रण रेषेवरील परिस्थितीची माहिती घेतली.

Pak Army Video
Indian Navy:...आणि कराची बंदर सात दिवस जळत होते; ज्यानं पाकिस्तानचे कंबरडे मोडले असे 'ऑपरेशन ट्रायडन्ट'

पाक लष्करप्रमुखांनी यावेळी सैनिकांसोबत धार्मिक घोषणाही दिल्या. लष्करप्रमुखांच्या भाषणाचा एका व्हिडिओ देखील समोर आला आहे. यात पाकिस्तानी नकाशे अस्पष्ट दाखवण्यात आले आहेत.

Pak Army Video
Goa Corona Update: गोव्याची वाटचाल कोरोनामुक्तीच्या दिशेने, शनिवारी केवळ एक नवीन रूग्ण

भारतीय अधिकाऱ्यांनी अलीकडे जम्मू-काश्मीर आणि गिलगिट-बाल्टिस्तानबाबत केलेल्या वक्तव्याचा असीम मुनीर यांनी यांनी निषेध केला. भारताने कोणतीही चूक केल्यास पाकिस्तान त्याला चोख प्रत्युत्तर देण्यास तयार आहे, असे मुनीर म्हणाले. त्याचे गंभीर परिणाम भारताला भोगावे लागू शकतात, अशी धमकी त्यांनी दिली.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com