Bush fire in California forest Dainik Gomantak
ग्लोबल

कॅलिफोर्नियाच्या जंगलात आगीचे तांडव

अमेरिकेच्या (USA) कॅलिफोर्निया (California Fire) राज्याच्या जंगलात लागलेल्या भीषण आगीमुळे सर्वत्र विध्वंस झाला आहे.

दैनिक गोमन्तक

अमेरिकेच्या (USA) कॅलिफोर्निया (California) राज्याच्या जंगलात लागलेल्या भीषण आगीमुळे सर्वत्र विध्वंस झाला आहे. डझनभर घरे जळून खाक झाली आहेत (California Fire). जोरदार वाऱ्यामुळे ही आग भडकत आहे. आगीमुळे लोकांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे.ही आग तिथल्या ग्रामीण भागात पोहोचल्याने त्या भागातली वीजही कट करण्यात आली आहे. कॅलिफोर्निया वन आणि अग्निसुरक्षा विभागाच्या मते, कॅलिफोर्नियातील ही दुसरी मोठी जंगलाची आग आहे.ही आग इतकी भयानक आहे की 2 ते 4 तासात 34,000 एकर जमीन जळून राख झाली आहे. (Bush fire in California forest)

हवामान बदल आणि दुष्काळामुळे आग अधिक धोकादायक

डिक्सी इन्सीडेंट कमांडचे प्रवक्ते डौग उलीबेरी यांनी सोमवारी रात्री सांगितले की, उत्तरी कॅलिफोर्नियाच्या बऱ्याच भागात जोरदार वाऱ्यांमुळे आग भडकत आहे. या भीषण आगीने 1,200 घरे आणि इतर इमारती जळून खाक झाल्या,अंदाजानुसार आणखी 16,000 इमारतींना आगीचा धोका असल्याने 12,000 ते 28,000 रहिवाशांना वाचवण्याचे कामही वेगाने सुरू आहे.

अहवालानुसार, पश्चिमेकडील भागाचे तापमान वाढल्याने ही आग लागली असून शास्त्रज्ञांचे म्हणणे आहे की हवामान बदल आणि दुष्काळ याच्यामुळे आग अधिक धोकादायक बनत आहे.

आगीमुळे मोठे नुकसान

मीडिया रिपोर्ट्सनुसार, आगीमुळे खूप मोठे नुकसान झाले असल्याचे समोर येत आहे. ज्यात सुमारे 1200 रहिवाशांच्या समुदायाची प्राथमिक शाळा, चर्च आणि पोस्ट ऑफिससह मालमत्तेचे मोठे नुकसान झाले. कॅलिफोर्निया गव्हर्नर ऑफिस ऑफ इमर्जन्सी सर्व्हिसेसच्या मते, विस्थापितांची एकूण संख्या 11,000 पेक्षा जास्त आहे आणि लोकांना या आगींपासून वाचण्यासाठी प्रशासनाकडून सुरक्षित ठिकाणी नेले जात आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Civil Service Transfers: गोवा नागरी सेवेत फेरबदल! गुरुदास देसाई यांची जिल्हाधिकारीपदी वर्णी तर वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या तडकाफडकी बदल्या

Mandre Panch Sexual Harassment Case: पंच रॉबर्ट फर्नांडिसविरोधात अजामीनपात्र वॉरंट जारी; महिलेचा छळ अन् मारहाण प्रकरणात

Mapusa ITI Fire Safety Course: 10वी पास तरुणांसाठी सरकारी रोजगाराची सुवर्णसंधी! म्हापसा 'ITI'मध्ये 24 जागांसाठी प्रवेश, एक वर्षाचा अभ्यासक्रम

Goa Crime Case: दोरीने गळा आवळला, पण मारेकरी कोण? गोव्यात गाजलेल्या 'अनमोड घाट' हत्येचा शेवट; चौघांची निर्दोष सुटका

PM Jan Dhan Yojana Goa: 2,35,200 नागरिकांपर्यंत पोहोचल्या बँकिंग सुविधा! जनधन योजनेत गोव्यातील 'कॅनरा बँक' अव्वल; केंद्रीय अर्थमंत्र्यांनी दिली आकडेवारी

SCROLL FOR NEXT