भयावह! वंशाच्या दिव्यासाठी पत्नीवर फेकलं उकळतं पाणी

उत्तर प्रदेशचे हे दाम्पत्य असून त्यांनी 2013 मध्ये लग्न केले होते.
domestic violence
domestic violenceDainik Gomantak
Published on
Updated on

लोकांचा राहणीमानाचा दर्जा उंचावला असला तरी मानसिकतेचा दर्जा ढासळलाच असल्याची प्रचिती या एका घटनेने पुन्हा झाली. दोघांचा राजाराणीचा संसार सुरू असतांना वंशाला दिवा पाहिजे या अट्टहासापोटी समजातील कितीतरी महिलांवर अजूनही अन्याय अत्याचार होतच आहे

असेच काहीसे या घटनेबाबतही घडले आहे. उत्तर प्रदेशचे हे दाम्पत्य असून त्यांनी 2013 मध्ये लग्न केले होते. मुलाला जन्म न दिल्याने महिलेच्या पतीने तिच्यावर उकळते पाणी ओतले. आणि 32 वर्षीय महिलेला तीच्या पतीने गंभीर दुखापत केली, अशी माहिती पोलीस अधीक्षक (ग्रामीण) संजीव बाजपेयी, यांनी बुधवारी दिली. या जोडप्याला तीन मुली आहेत, त्यातील सर्वात लहान मुलीचा गेल्याच वर्षी जन्म झाला आहे.

domestic violence
'या' दोन राज्यात वाढत आहे कर्करोग, IMCR-NCDIR च्या अहवालात धक्कादायक खुलासा

संजूचा पती सत्यपाल तिच्यावर आई -वडिलांकडून 50,000 रूपये आणण्यासाठी दबाव आणत होता. संजूला तीन मुली असल्याने तो तीच्यावर अत्याचार करायचा कारण त्याला वंशाचा दिवा म्हणजे मुलगा हवा होता. पोलिस तक्रारीचा हवाला देत बाजपेयी यांनी सांगितले की, 'सत्यपाल आपल्या पत्नीला त्रास देत तिला उपाशी ठेवायचा जेवण द्यायचा नाही.' अशातच संतापलेल्या सत्यपालने 13 ऑगस्ट रोजी संजूवर उकळते पाणी ओतले, आणि तिला गंभीर इजा झाली. त्यानंतर तिला जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले. संजूच्या वडिलांनी या घटनेची माहिती दिल्यानंतर तक्रार दाखल करण्यात आली आणि सत्यपालवर बुधवारी गुन्हा दाखल करण्यात आला.

domestic violence
जम्मू-काश्मीर मध्ये भूकंप,कुठलीही जीवितहानी नाही

मात्र या घटनेतील आरोपी सत्यपाल फरार असल्याने त्याला अटक करण्यात आली नाही, त्याचबरोबर पुढील तपास सुरू असल्याची माहिती पोलीसांनी दिली.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com