Boris Johnson Dainik Gomantak
ग्लोबल

ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन युक्रेनमध्ये दाखल, झेलेन्स्की यांची घेतली भेट

ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन शनिवारी युद्धग्रस्त युक्रेनची राजधानी कीवमध्ये दाखल झाले आहेत.

दैनिक गोमन्तक

ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन युद्धग्रस्त युक्रेनची राजधानी असणाऱ्या कीवमध्ये दाखल झाले आहेत. यावेळी त्यांनी राष्ट्राध्यक्ष वोलोडिमिर झेलेन्स्की (Volodymyr Zelenskyy) यांची भेट घेतली. युक्रेनची राजधानी आणि आसपासच्या भागातून रशियन सैन्याची माघार आणि युक्रेनने युरोपीय देशांकडून शस्त्रास्त्रांची मागणी करत असताना या बैठकीला महत्त्व प्राप्त झाले आहे.

यापूर्वी, युरोपियन कमिशनच्या अध्यक्षा उर्सुला व्हॅन डर यांनी कीवमध्ये जाऊन झेलेन्स्की यांची भेट घेतली होती. अनेक युरोपीय देश युक्रेनची राजधानी कीवमध्ये (Kyiv) त्यांचे दूतावास पुन्हा सुरु करण्याचा विचार करत आहेत. झेलेन्स्की यांनी या बैठकीची माहिती दिली. तसेच त्यांच्या सल्लागाराने बोरिस जॉन्सन (Boris Johnson) यांच्यासोबतच्या भेटीचा फोटो फेसबुकवर शेअर केला आहे. यावेळी त्यांनी ब्रिटिश पंतप्रधानांशी थेट भेट घेतल्याचे लिहिले आहे. या बैठकीदरम्यान दोन्ही नेते एका मोठ्या खोलीत समोरासमोर बसलेले दिसत आहेत. जॉन्सन यांनी गडद रंगाचा सूट घातला आहे, तर झेलेन्स्की संपूर्ण खाकी ड्रेसमध्ये दिसत आहे. रशियाने युक्रेनवर आक्रमण केल्यापासून, झेलेन्स्की बहुतेक या पोशाखात दिसत आहेत.

दरम्यान, राष्ट्राध्यक्षांचे सल्लागार आंद्रे सिबिहा यांनी लिहिले की, ''ब्रिटन युक्रेनचा खंदा समर्थक आहे. जॉन्सन हे युद्धविरोधी युतीचे नेते आहेत. त्यांनी आत्तापर्यंत आक्रमक रशियाविरुद्ध निर्बंध लादण्यासंबधी अनेक मोठे निर्णय घेतले आहेत.'' तत्पूर्वी, युरोपियन कमिशनचे अध्यक्ष उर्सुला वॉन डर लेयन आणि ईयू धोरण प्रमुख जोसेप बोरेल यांनी शुक्रवारी कीवला भेट दिली. ऑस्ट्रियाचे चान्सलर कार्ल नेहेमर हे ही त्यांच्यासोबत होते. ब्रिटनच्या पंतप्रधान कार्यालय डाउनिंग स्ट्रीटने म्हटले आहे की, 'पंतप्रधान युक्रेनमधील लोकांशी एकात्म भाव दर्शविण्यासाठी जात आहेत.'

विशेष म्हणजे, रशियाने युक्रेनची राजधानी कीव आणि आजूबाजूचा परिसर रिकामा केला आहे. आता रशियाने युक्रेनच्या पूर्व भागातील डोनबास्क या फुटीरतावादी प्रदेशावर लक्ष केंद्रित करण्याचा निर्णय घेतला आहे. त्याचवेळी युक्रेनचे सैन्य अमेरिका आणि पाश्चात्य देशांकडून सातत्याने शस्त्रांची मागणी करत आहे. झेलेन्स्की यांनी युक्रेनियन लोकांचा नरसंहार केवळ शस्त्रांद्वारेच टाळता येऊ शकतो, असे म्हटले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Shehbaz Sharif Video: 'पाकिस्तान दहशतवाद कधी थांबवणार?' रिपोर्टरच्या थेट प्रश्नावर काय म्हणाले शाहबाज शरीफ? शाब्दिक चकमकीचा व्हिडिओ व्हायरल

43.20 कोटींच्या कोकेन प्रकरणात आरोपीला सशर्त जामीन मंजूर; दक्षिण गोवा जिल्हा सत्र न्यायालयाचा मंगेश वाडेकरला दिलासा

Goa Crime: 17 वर्षीय मुलीला पळवून नेऊन केला लैंगिक अत्याचार, डिचोलीतील घटनेनं खळबळ; कणकवलीच्या तरुणाला अटक

Makharotsav: ..उत्सवमूर्ती जिवंत झाल्याचा आभास देणारा 'मखरोत्सव', गोव्यातील लोकसंस्कृतीचे दर्शन

Viral Video: 'खतरों के खिलाडी' वाली स्टंटबाजी, पठ्ठ्याचा सोशल मीडियावर व्हिडिओ तूफान व्हायरल; नेटकरी म्हणाले...

SCROLL FOR NEXT