Oksana Baulina
Oksana BaulinaDainik Gomantak

युक्रेनमधील हल्ल्यात रशियन पत्रकाराचा मृत्यू

ओक्साना बौलिना यांच्या कुटुंबीयांनी आणि सहकाऱ्यांनी सोशल मीडियावर त्यांच्या मृत्यूबद्दल शोक व्यक्त केला आहे.
Published on

युक्रेन आणि रशियामधील युद्धात अनेकांनी जीव गमावला आहे. यामध्ये स्थानिक लोकांसह परदेशी नागरिकांचा देखील समावेश आहे. यातच आता युक्रेनची राजधानी कीव (Kyiv) येथे झालेल्या गोळीबारात रशियन महिला पत्रकार ओक्साना बौलिना यांचा मृत्यू झाला आहे. रशियन सैन्याने गोळीबार केला तेव्हा त्या पूर्वीच्या हल्ल्यातील नुकसानीचे चित्रीकरण करत होत्या.

Oksana Baulina
पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान विरुद्ध आज अविश्वास ठराव

ओक्साना बौलिना यांच्या सोबत असलेले आणखी दोन लोक जखमी झाले असून त्यांना रुग्णालयात (Hospital) दाखल करण्यात आले असल्याची माहिती समोर आली आहे. ओक्साना बौलिना आधी रशियन विरोधी पक्षनेते अलेक्सी नवलनी यांचे भ्रष्टाचार विरोधी फाउंडेशनसाठी काम करत होत्या. मात्र रशियन अधिकार्‍यांनी या संस्थेला “कट्टरतावादी” घोषित केले. पुढे बौलिना यांनी रशियातील (Russia) भ्रष्टाचारावर लिहायला सुरू केले.

एक महिन्यापूर्वी रशियाने युक्रेनवर (Ukraine) आक्रमण केल्यानंतर, बौलिना यांनी पश्चिम युक्रेनमध्ये जाऊन 'रिपोर्टिंग' करण्यास सुरुवात केली. ओक्साना बौलिना यांच्या कुटुंबीयांनी आणि सहकाऱ्यांनी सोशल मीडियावर त्यांच्या मृत्यूबद्दल शोक व्यक्त केला आहे.

Oksana Baulina
युक्रेनी लष्कराकडून रशियाचे जहाज नष्ट

बौलिना यांचे सहकारी व्लादिमीर मिलोव्ह यांनी त्यांच्या मृत्यूचा बदला घेण्याचे वचन दिले आहे.
“मी तिला कधीही विसरणार नाही आणि तिच्या मृत्यूला जबाबदार असलेल्या सर्वांना नक्की शिक्षा होईल," असे ते म्हणाले.

युक्रेनवरील रशियन आक्रमणादरम्यान मारल्या गेलेल्या इतर पत्रकारांमध्ये एक यूएस व्हिडिओग्राफर, एक फ्रेंच-आयरिश कॅमेरामन आणि एक युक्रेनियन निर्माता यांचा समावेश आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com