Indian-Origin Minister Suella Braverman Twitter/ @ANI
ग्लोबल

Minister Suella Braverman: सुएला ब्रेव्हरमन यांची सुनक यांनी केली हकालपट्टी, पॅलेस्टिनी आंदोलकांप्रती पोलिसांच्या भूमिकेवरुन...

Indian-Origin Minister Suella Braverman: ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक यांनी त्यांच्या सर्वात ज्येष्ठ मंत्र्यांपैकी एक, गृहमंत्री सुएला ब्रेव्हरमन यांची हकालपट्टी केली आहे.

Manish Jadhav

British PM Rishi Sunak Sacks Indian-Origin Minister Suella Braverman: ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक यांनी त्यांच्या सर्वात ज्येष्ठ मंत्र्यांपैकी एक, गृहमंत्री सुएला ब्रेव्हरमन यांची हकालपट्टी केली आहे. वृत्तसंस्था रॉयटर्सने सूत्रांचा हवाला देत सांगितले की, पोलिस पॅलेस्टिनी समर्थकांप्रती मवाळ असल्याचा आरोप केल्यानंतर सुएला यांना बडतर्फ करण्यात आले.

गेल्या आठवड्यात ब्रेव्हरमॅन यांनी पॅलेस्टिनी समर्थक मोर्चाच्या पोलिसांच्या सौम्य हाताळणीसाठी पीएम सुनक यांना लक्ष्य केले होते.

त्यांच्या वक्तव्यानंतर, समीक्षकांनी सांगितले की, त्यांच्या भूमिकेमुळे तणाव वाढण्यास मदत झाली आणि उजव्या विचारसरणीच्या निदर्शकांना लंडनच्या रस्त्यावर उतरण्यास प्रोत्साहित केले. विशेष म्हणजे, सुनक यांच्यावर कारवाई करण्यासाठी दबाव आणण्यात आला.

ब्रेव्हरमन यांची जागा जेम्स यांनी घेतली

मीडिया रिपोर्ट्सनुसार, जेम्स क्लेवरली यांची ब्रेव्हरमन यांच्या जागी ब्रिटनचे गृहमंत्री म्हणून वर्णी लागली. ब्रेव्हरमन यांच्यावर कारवाई करण्यासाठी पंतप्रधान सुनक यांच्यावर दबाव होता, त्यानंतर त्यांनी हा निर्णय घेतला आहे.

रॉयटर्सच्या म्हणण्यानुसार, ब्रेव्हरमन या राष्ट्रीय सुरक्षा किंवा पोलिसांशी संबंधित वादग्रस्त विधाने करण्यासाठी फार पूर्वीपासून ओळखल्या जातात. 10 ऑक्टोबर रोजी, ब्रॅव्हरमन यांनी यूकेच्या रस्त्यावर पॅलेस्टिनी ध्वज प्रदर्शित केल्याबद्दल पोलिस (Police) प्रमुखांना चेतावणी दिली होती. त्या म्हणाल्या होत्या की, ध्वज फडकवणे हे दहशतवादाचे समर्थन म्हणून पाहिले जात असेल तर ते कायदेशीर असू शकत नाही.

पॅलेस्टाईनच्या समर्थनार्थ लंडनमध्ये मोर्चा काढण्यात आला

दरम्यान, 7 ऑक्टोबर रोजी हमासने (Hamas) केलेल्या हल्ल्यानंतर इस्रायलनेही प्रत्युत्तरादाखल हल्ले सुरु केले. 11 नोव्हेंबर रोजी लंडनमध्ये पॅलेस्टाईनच्या समर्थनार्थ मोर्चा काढण्यात आला होता.

यात हजारो आंदोलकांनी राजधानीच्या हायड पार्कमधील मार्बल आर्चपासून वॉक्सहॉल ब्रिज रोडपर्यंत मोर्चा काढला. 7 ऑक्टोबरच्या हमासच्या हल्ल्याला प्रत्युत्तर म्हणून गाझामध्ये इस्रायली सैन्याच्या ग्राउंड ऑपरेशनच्या निषेधार्थ हा मोर्चा होता.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Live Updates: हणजूण ग्रामसभा तापली; संगीत महोत्सवावरुन दोन गटात मारहाण

Goa Cabinet: ‘वाचाळवीर’ स्कॅनरखाली! चार मंत्र्यांना वगळून नव्यांना संधी द्या; मंत्रिमंडळ फेरबदलाच्या चर्चांना उधाण

Goa Tourism: पर्यटनाच्या नव्या संधी उपलब्ध होणार; गोवा-उझबेकिस्तान संबंधांना मिळणार नवा आयाम!

Benaulim: बाणावलीची जागा काँग्रेसच लढणार; निंबाळकरांनी विधानसभा निवडणुकीबाबत केले मोठे विधान

Goa Crime: वेश्या रॅकेट चालवणाऱ्या टोळीतील चौथा आरोपी अटकेत; गोवा पोलिसांनी आवळल्या मुसक्या

SCROLL FOR NEXT