British Fighter Jet Dainik Gomantak
ग्लोबल

British Fighter Jet: ब्रिटनच्या फायटर जेटचे जपानमध्ये इमर्जन्सी लँडिंग, दीड महिन्यातील दुसरी घटना; चीन-रशियाने उडवली खिल्ली

F-35B Emergency Landing: ब्रिटिश रॉयल एअर फोर्सच्या एका F-35B स्टील्थ फायटर जेटचे रविवारी (10 ऑगस्ट) दक्षिण-पश्चिम जपानमधील कागोशिमा विमानतळावर तांत्रिक बिघाडामुळे इमर्जन्सी लँडिंग करावे लागले.

Manish Jadhav

British F-35B Emergency Landing: ब्रिटिश रॉयल एअर फोर्सच्या एका F-35B स्टील्थ फायटर जेटचे रविवारी (10 ऑगस्ट) दक्षिण-पश्चिम जपानमधील कागोशिमा विमानतळावर तांत्रिक बिघाडामुळे इमर्जन्सी लँडिंग करावे लागले. विमानतळ अधिकाऱ्यांनी जपानी वृत्तसंस्था 'क्योडो न्यूज'ला ही माहिती दिली.

नेमकी घटना काय?

न्यूज एजन्सी 'एएनआय' नुसार, ही घटना स्थानिक वेळेनुसार सकाळी11:30 वाजता घडली. या घटनेमुळे विमानतळाची धावपट्टी सुमारे 20 मिनिटांसाठी बंद ठेवण्यात आली, ज्यामुळे अनेक व्यावसायिक उड्डाणे विलंबाने झाली. या दुर्घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही. हे फायटर जेट जपानच्या सागरी सेल्फ-डिफेन्स फोर्स आणि अमेरिकन लष्करासोबत सुरु असलेल्या संयुक्त सरावात सहभागी होते. हा सराव 4 ऑगस्ट रोजी सुरु झाला असून, मंगळवारपर्यंत चालणार आहे.

जपानी प्रसारक NHK ने संरक्षण मंत्रालयाच्या हवाल्याने सांगितले की, हे जेट रॉयल नेव्हीच्या 'एचएमएस प्रिन्स ऑफ वेल्स' (HMS Prince of Wales) या विमानवाहू नौकेवरुन उड्डाण करत होते. ही नौका एप्रिलपासून मोठ्या 'इंडो-पॅसिफिक' मोहिमेवर असून, तिने भूमध्य समुद्र, मध्य पूर्व, दक्षिण-पूर्व आशिया, जपान आणि ऑस्ट्रेलियातील बंदरांना भेटी दिल्या आहेत.

दीड महिन्यातील दुसरी घटना

दरम्यान, ही घटना गेल्या दीड महिन्यातील दुसरी मोठी दुर्घटना आहे. 14 जून रोजी 'एचएमएस प्रिन्स ऑफ वेल्स'वरील आणखी एका ब्रिटिश F-35B जेटने केरळमधील तिरुवनंतपुरम विमानतळावर हायड्रोलिक बिघाडामुळे इमर्जन्सी लँडिंग केले होते. ते विमान दुरुस्तीसाठी पाच आठवड्यांपेक्षा जास्त काळ जमिनीवरच होते. या घटनेनंतर ब्रिटिश उच्चायुक्तालयाने भारतीय अधिकाऱ्यांनी केलेल्या मदतीबद्दल जाहीरपणे आभार मानले होते. बर्मिंगहॅम लाइव्हनुसार, जपानमधील (Japan) ही घटना तिरुवनंतपुरममधील विमानाव्यतिरिक्त दुसऱ्या विमानात घडली आहे.

रशिया आणि चीनकडून ब्रिटिश तंत्रज्ञानावर टीका

या दोन्ही घटनांवर रशियन आणि चिनी सरकारी माध्यमांनी जोरदार टीका केली आहे. रशियाच्या 'स्पुतनिक इंडिया'ने X वर पोस्ट करत म्हटले की, "ब्रिटिश F-35 पुन्हा इमर्जन्सी लँडिंग करत आहे... एका F-35 ला भारतात अडकल्यानंतर काही आठवड्यांनी दुसरे विमान जपानमध्ये उतरण्यास भाग पडले."

चीनच्या (China) सरकारी 'ग्लोबल टाइम्स'ने यावर अधिक कठोर टीका केली. त्यांनी म्हटले की, "हा तांत्रिक बिघाड F-35B च्या अतिशय गुंतागुंतीच्या प्रणाली आणि त्याच्या देखभालीची मागणी दर्शवते. लांबच्या मोहिमांवर ब्रिटिश नौसैनिक यांना हाताळताना संघर्ष करत आहेत." या वृत्तपत्राने ब्रिटनच्या विमानवाहू नौका मोहिमा अमेरिकेच्या धोरणांचे पालन करत आहेत, असेही म्हटले. तसेच, "ब्रिटनची नौदल क्षमता आता पूर्वीसारखी राहिली नाही" असे सांगून त्यांनी लंडनला "अमेरिकेच्या हितांना साथ देण्याचे धोरण" पुन्हा विचारात घेण्यास सांगितले.

कागोशिमामधील F-35B ची सध्या तपासणी सुरु असून, तपासणीनंतर ते पुन्हा विमानवाहू नौकेवरील ताफ्यात सामील होईल, अशी अपेक्षा आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Japan PM Resign: जपानमध्ये मोठी राजकीय उलथापालथ! पंतप्रधान शिगेरू इशिबा यांची राजीनाम्याची घोषणा, कारण काय?

Surla Eco Tourism: 'सुर्ला प्रकल्प ग्रामीण अर्थकारणाला चालना देण्यासाठी महत्त्वाचा'; डॉ. देविया राणे

Goa Politics: भाजपला सनातन धर्माची पर्वा व आदर नाही, प्रदेशाध्यक्ष दामूंच्या वाढदिवशी मंदिरात केक कापणे 'अधर्म', काँग्रेसचा हल्लाबोल

Devarai: ..काही कोटी वर्षांपूर्वीचे, भारतात चारच ठिकाणी असणारे वृक्ष; गोव्यातील देवराया आणि त्यांचे महत्व

प्रेषित मुहम्मद यांच्याविरोधात आक्षेपार्ह पोस्ट, गोव्यात मुस्लिम समाज आक्रमक; कारवाई करण्याची मागणी

SCROLL FOR NEXT