Japan Tsunami Photos: जपानमध्ये त्सुनामीचा हाहाकार! 20 लाख लोकांना घर सोडण्याचे निर्देश; धडकी भरवतात फोटो

प्रशांत महासागरात (Pacific Ocean) त्सुनामीच्या (Tsunami) लाटा उसळल्या.
japan tsunami
japan tsunami Dainik Gomantak
Published on
japan tsunami
japan tsunami Dainik Gomantak

भूकंप: रशियाच्या कामचटका द्वीपकल्पात (Kamchatka Peninsula) बुधवारी (30 जुलै) सकाळी 8.8 तीव्रतेचा विनाशकारी भूकंप (Earthquake) झाला. यानंतर लगेचच प्रशांत महासागरात (Pacific Ocean) त्सुनामीच्या (Tsunami) लाटा उसळल्या.

japan tsunami
japan tsunami Dainik Gomantak

जपानला सर्वाधिक फटका: दरम्यान, या त्सुनामीचा परिणाम रशिया (Russia), अमेरिका (America), न्यूझीलंड (New Zealand) आणि जपान (Japan) यांसारख्या देशांच्या किनारी देशांवर झाला. विशेषतः जपानला या त्सुनामीचा सर्वात जास्त फटका बसला.

japan tsunami
japan tsunami Dainik Gomantak

लाटा: जपान वेदर एजन्सीने दिलेल्या माहितीनुसार, नेमुरो (Nemuro) येथील होक्काइडोच्या (Hokkaido) पूर्व किनाऱ्यावर 60 सेंटीमीटर (सुमारे 2 फूट) उंचीची त्सुनामीची पहिली लाट पोहोचली. त्यानंतर आता या लाटा प्रशांत किनाऱ्यावरुन होक्काइडोपासून टोकियो खाडीपर्यंत (Tokyo Bay) दक्षिणेकडे वाढत आहेत.

japan tsunami
japan tsunami Dainik Gomantak

20 लाख लोकांना फटका: त्सुनामीच्या धोक्यामुळे जपानमध्ये सुमारे 20 लाख लोकांना आपली घरे सोडून सुरक्षित ठिकाणी जाण्यास सांगण्यात आले आहे.

japan tsunami
japan tsunami Dainik Gomantak

सुरक्षित ठिकाण: होक्काइडोपासून दक्षिणेकडील वाकायामा प्रांतापर्यंत (Wakayama Province) जपानच्या अधिकाऱ्यांनी लोकांना घरे रिकामी करुन सुरक्षित स्थळी जाण्यास सांगितले आहे.

japan tsunami
japan tsunami Dainik Gomantak

फुकुशिमा न्यूक्लिअर प्लांट: त्सुनामीच्या लाटांनी जपानच्या फुकुशिमा न्यूक्लिअर प्लांटपर्यंत (Fukushima Nuclear Plant) धडक दिली. धोक्याची शक्यता लक्षात घेता प्लांटमधील कर्मचाऱ्यांना सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आले. सध्या प्लांटमध्ये कोणत्याही नुकसानीची माहिती नाही.

japan tsunami
japan tsunami Dainik Gomantak

मदत कार्य: जपानचे पंतप्रधान शिगेरु इशिबा (Shigeru Ishiba) यांनी सांगितले की, अधिकारी परिस्थितीवर सतत लक्ष ठेवून आहेत. मदत आणि बचाव पथकेही (Relief and Rescue Teams) सतर्क आहेत.

japan tsunami
japan tsunami Dainik Gomantak

अद्याप जीवीतहानी नाही: इशिबा यांनी नागरिकांना किनारपट्टीपासून दूर राहण्यास आणि उंच ठिकाणी जाण्यास सांगितले आहे. जपानमध्ये त्सुनामीमुळे आतापर्यंत कोणतीही जीवितहानी किंवा मालमत्तेच्या नुकसानीची पुष्टी झालेली नाही, ही दिलासादायक बाब आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com