Japan Dadly Bacterial Infection
Japan Dadly Bacterial InfectionDainik Gomantak

Japan Dadly Bacterial Infection: जपानमध्ये पसरतोय नवा आजार, 48 तासांत होतो मृत्यू; कोविडनंतर नवीन आव्हान

Japan Dadly Bacterial Infection: जपानमध्ये एक प्राणघातक आजार वेगाने पसरत आहे. हा आजार बॅक्टेरियामुळे होतोय.

Japan Dadly Bacterial Infection: जपानमध्ये एक प्राणघातक आजार वेगाने पसरत आहे. हा आजार बॅक्टेरियामुळे होतोय. हा बॅक्टेरिया मानवी शरीरात प्रवेश करतो आणि टिश्यूंवर हल्ला करतो आणि वेळेवर उपचार न मिळाल्यास, रोगाचा संसर्ग झाल्यानंतर 48 तासांच्या आत रुग्णाचा मृत्यू होतो. स्ट्रेप्टोकोकल टॉक्सिक शॉक सिंड्रोम (STSS) असे या आजाराचे नाव आहे. जपानमध्ये STAS ची 900 हून अधिक प्रकरणे नोंदवली गेली आहेत. जपानशिवाय युरोपमध्येही या आजाराची प्रकरणे नोंदवली गेली आहेत.

एसटीएसएस रोग म्हणजे काय? त्याचा प्रसार कसा होतो आणि 48 तासांत रुग्णाचा मृत्यू का होतो? याबद्दल तज्ज्ञांकडून जाणून घेऊया. जगभरात अनेक प्रकारचे बॅक्टेरिया असल्याचे डॉक्टरांचे म्हणणे आहे. यातील एक बॅक्टेरिया म्हणजे स्ट्रेप्टोकोकस, जो मानवांना संक्रमित करतो. हा बॅक्टेरिया एखाद्या प्राण्यापासून किंवा कीटकातून मानवी शरीरात प्रवेश करतो. हा बॅक्टेरिया ब्लड आणि टिश्यूमध्ये प्रवेश करतो आणि त्यांचे कार्य बिघडवतो. वेळेवर उपचार न मिळाल्यास 48 तासांत रुग्णाचा मृत्यू होतो.

Japan Dadly Bacterial Infection
China Corona Update: चीनमध्ये कोरोनाचा कहर! 80 % लोकसंख्या बाधित, हाजारो मृत्यू; यंत्रणा हाय अलर्टवर

दिल्लीतील आरएमएल हॉस्पिटलमधील डॉ. अंकित रावत सांगतात की, जेव्हा हा बॅक्टेरिया शरीरात प्रवेश करतो तेव्हा रुग्णाला ताप आणि कमी रक्तदाबाचा त्रास होतो. बॅक्टेरिया अशा प्रकारे हल्ला करतात की टिश्यू लगेच मरतात. यामुळे रुग्णाच्या (Patient) शरीरातील कोणताही भाग निकामी होतो. या बॅक्टेरियाला शरीरात प्रवेश करुन टिश्यूंवर हल्ला करण्यासाठी काही तास लागतात. या कालावधीत उपचार न मिळाल्यास अवयव निकामी होतो, ज्यामुळे मृत्यू होतो. हा बॅक्टेरिया हृदय, मूत्रपिंड आणि यकृत यांसारख्या कोणत्याही अवयवावर हल्ला करतो.

याचा धोका कोणाला आहे?

इतर कोणत्याही आजाराप्रमाणे, एसटीएसएसचा धोका लहान मुले आणि वृद्धांना जास्त आहे. दुखापत झालेल्या लोकांमध्ये एसटीएसएसचा धोका वाढतो. यामध्ये नुकतीच शस्त्रक्रिया झालेल्या किंवा व्हायरल इन्फेक्शन (Infection) झालेल्यांचाही समावेश असू शकतो.

Japan Dadly Bacterial Infection
China Corona : चीनमध्ये पुन्हा कोरोनामुळे हाहाकार! केवळ एका महिन्यात 'इतके' मृत्यू...

लक्षणे काय आहेत?

घसा खवखवणे

शरीराच्या कोणत्याही भागाला सूज येणे

तोंडात लाल आणि जांभळे डाग

वाढलेले लिम्फ नोड्स

Japan Dadly Bacterial Infection
Corona In China: चीनची प्रसिद्ध सिंगर जेन झांग कोरोनामुळे झाली ट्रोल, नेटकऱ्यांनी दिल्या संतप्त प्रतिक्रिया

संरक्षण कसे करावे?

जखमेच्या बाजूला जळजळ होत असल्यास, डॉक्टरांचा सल्ला घ्या

हात धूत राहा.

ताप आल्यास डॉक्टरांशी संपर्क साधा.

संक्रमित लोकांशी संपर्क टाळा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com