Britain Warning Israel Hamas London Protesters Not Use Word Jihad Dainik Gomantak
ग्लोबल

London Protesters: ''घोषणाबाजीत जिहाद शब्दाचा प्रयोग केल्यास...'', ब्रिटनमधील आंदोलकांना तंबी; जाणून घ्या संपूर्ण प्रकरण

Israel-Hamas War: इस्रायल आणि हमास यांच्यातील युद्धाबाबत ब्रिटनची राजधानी लंडनमध्ये निदर्शने सुरु आहेत.

Manish Jadhav

Britain Warning Israel Hamas London Protesters Not Use Word Jihad: इस्रायल आणि हमास यांच्यातील युद्धाबाबत ब्रिटनची राजधानी लंडनमध्ये निदर्शने सुरु आहेत. दरम्यान, लंडनच्या मेट्रोपॉलिटन पोलिसांनी आंदोलकांना वर्णद्वेषी भाषा किंवा प्रक्षोभक भाषण न करण्याचा इशारा दिला आहे. या सूचनांचे पालन न केल्यास अटक होऊ शकते, असे पोलिसांकडून सांगण्यात आले.

शनिवारी राजधानीत सुमारे 1 लाख लोक आंदोलनात सामील होतील अशी आयोजकांची अपेक्षा आहे. त्याचवेळी, रविवारी धर्मविरोधी मोर्चात 50 हजारांहून अधिक लोक सहभागी होऊ शकतात.

लंडन पोलिसांनी सांगितले की, निदर्शनादरम्यान 1,500 हून अधिक अधिकारी तैनात असतील. कोणत्याही गुन्हेगारी कृत्यावर कठोर कारवाई केली जाईल. डेप्युटी असिस्टंट कमिशनर एडे अडेलेकन म्हणाले की, 'मध्यपूर्वेत संघर्ष सुरुच आहे.

लंडनमध्येही (London) निदर्शने आणि तणावपूर्ण वातावरण आहे. द्वेषाच्या गुन्ह्यात वाढ होण्याची भीती आहे. विशेषतः ज्यू आणि मुस्लिम समुदायांमध्ये ही भीती व्यक्त केली जात आहे. या आंदोलनांचा आपल्या समाजावर काय परिणाम होत आहे, याची आम्हाला चांगली जाणीव आहे.'

'जर कोणी वर्णद्वेषी टिप्पणी केली तर...'

पोलिस (Police) अधिकाऱ्याने सांगितले की, 'जर कोणी वर्णद्वेषी असेल किंवा कोणत्याही समूहाविरुद्ध द्वेष भडकावत असेल तर त्याला अटक केली जाईल. हमास किंवा इतर कोणत्याही बंदी घातलेल्या संघटनेला पाठिंबा देणाऱ्यांवरही अशीच कारवाई होईल.'

उप सहाय्यक आयुक्त म्हणाले की, 'जर कोणी दहशतवादी कृत्यांबद्दल जल्लोष करत असेल किंवा प्रोत्साहन देत असेल तर ते आम्ही खपवून घेणार नाही. यात निष्पाप लोकांची हत्या किंवा अपहरण यांचा समावेश आहे. तसेच, द्वेषमूलक भाषण करणाऱ्यांवरही कडक कारवाई केली जाईल.'

'जिहाद' शब्दाच्या वापराबाबत...

दरम्यान, पोलिसांनी निदर्शनांमध्ये 'जिहाद' हा शब्द वापरण्याबाबत इशारा दिला आहे. पोलिसांनी सांगितले की, 'जिहाद या शब्दाच्या वापराबाबत बरीच चर्चा झाली आहे. हा एक असा शब्द आहे, ज्यामुळे अस्वस्थता आणि चिंतेचे कारण बनू शकते. लोक याचा वापर हिंसाचार, दहशतवाद किंवा सेमेटिझमसाठी करत आहेत असे आम्हाला वाटल्यास त्वरीत कारवाई केली जाईल.'

दुसरीकडे, इस्रायल आणि हमास यांच्यातील युद्धाबद्दल बोलायचे झाल्यास, 4 दिवसांसाठी तात्पुरती युद्धबंदी लागू करण्यात आली आहे. युद्धबंदीच्या दुसऱ्या दिवशी शनिवारी ओलिस आणि इस्रायली तुरुंगातील कैदी यांच्यात अदलाबदल होणे अपेक्षित आहे. युद्धबंदीमुळे गाझामध्ये अत्यावश्यक मानवतावादी मदत पोहोचण्यास परवानगी मिळाली असून 7 आठवड्यांच्या युद्धानंतर प्रथमच नागरिकांना दिलासा मिळाला आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Pirna: चेहऱ्यावर जखमा, लाथाबुक्क्यांनी मारहाणीच्या खुणा! 'पीर्ण' प्रकरणातील गूढ वाढले; खुनाचा गुन्हा नोंद

Aishwarya Rai Controversy: बॉलिवूडची 'ब्यूटी क्वीन' आणि वाद! घटस्फोटाच्या अफवांपासून ते सलमानसोबतच्या नात्यापर्यंत... ऐश्वर्याच्या आयुष्यातील 6 सर्वात मोठे वाद

Ranji Trophy: गोव्यासमोर पंजाबचे कडवे आव्हान! हुकमी फलंदाज 'सुयश'च्या कामगिरीवर लक्ष; संघात पुन्हा धाकड अष्टपैलूची वापसी

Candolim: पैसे घेतले एकाकडून, जमीन विकली दुसऱ्याला! मुंबईच्या कंपनीला 8 कोटींचा गंडा; गोव्यातील चौघांसह पाचजणांविरुद्ध गुन्हा नोंद

Goa Tourism: गोव्याचे किनारे 'दलालमुक्त' होणार! पर्यटनमंत्री खंवटेंचा निर्धार; हंगामाच्या प्रारंभी पर्यटक वाढल्याचा दावा

SCROLL FOR NEXT