Vladimir Putin Dainik Gomantak
ग्लोबल

ब्रिटनचा रशियाला मोठा धक्का, सरकार समर्थित ब्रॉडकास्टरचा परवाना रद्द

रशियन सैन्याने युक्रेनमध्ये (Ukraine) भयंकर विध्वंस घडवून आणला आहे. दोन्ही बाजूंनी झालेल्या हल्ल्यात मोठ्या प्रमाणात जीवित आणि वित्तहानी झाली आहे.

दैनिक गोमन्तक

Russia-Ukraine War: रशियन सैन्याने युक्रेनमध्ये भयंकर विध्वंस घडवून आणला आहे. दोन्ही बाजूंनी झालेल्या हल्ल्यात मोठ्या प्रमाणात जीवित आणि वित्तहानी झाली आहे. याच पाश्वभूमीवर ब्रिटनच्या (Britain) कम्युनिकेशन्स रेग्युलेटरने युक्रेन (Ukraine) युद्धाच्या कव्हरेजच्या चौकशीदरम्यान रशियाला पाठिंबा देत असलेल्या ब्रॉडकास्टर आरटीचा परवाना रद्द केला आहे. ऑफकॉमने (Ofcom) एका निवेदनात म्हटले की, 'आम्ही ANO TV नोवोस्ती यांना UK प्रसारण परवाना धारण करण्यासाठी योग्य मानत नाही.' (Britain revokes Russian government-backed broadcaster's license)

निष्पक्षतेने तपास करुन निर्णय घेतला

ऑफकॉमचे म्हणणे आहे की, 'रशियाकडून युक्रेनवर हल्ला करण्यात आला. याच पाश्वभूमीवर या हल्ल्यासंबंधीच्या RT च्या बातम्या आणि समकालीन बाबींच्या कव्हरेजच्या निःपक्षपाती तपासांनंतर शुक्रवारी हा निर्णय घेण्यात आला.' नियामकाचे म्हणणे आहे की, 'आम्ही असा निष्कर्ष काढला आहे की सध्याच्या परिस्थितीत RT एक जबाबदार प्रसारक असू शकते यावर आम्ही समाधानी नाही. म्हणून Ofcom ने RT चा प्रसारणाचा परवाना त्वरित रद्द केला आहे.'

रशिया आणि युक्रेनमध्ये युद्ध सुरु

रशियाने युक्रेनच्या राजधानीसह अनेक महत्त्वाची शहरे उद्ध्वस्त केली. रशियन सैन्याने युक्रेनमध्ये कहर केला आहे. मोठ्या इमारती, शाळा आणि रुग्णालयेही रशियन सैनिकांकडून लक्ष्य करण्यात येत आहेत. युक्रेनमधील अनेक शहरे उद्ध्वस्त झाली आहेत, परंतु युक्रेनचे सैनिक त्यांच्या लष्करी ताकदीनुसार रशियन हल्ल्याला प्रत्युत्तर देत आहेत.

युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष व्होलोडिमिर झेलेन्स्की म्हणाले की, 'आता आपण पूर्वीपेक्षा वेगळे आहोत. आपला देश आता पूर्वीसारखा राहिला नाही.'

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Ugvem Highway Landslide: उगवे महामार्गावर पुन्हा कोसळली दरड! आठवड्यातील तिसरी घटना; नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर

मुरगाव बंदरातील धक्का क्रमांक 9चा फेरविकास अखेर रखडला, युद्धाचा फटका; 1,300 कोटींच्या निधीला केंद्राकडून नकार

Private Bus Service: मुसळधार पावसाचा फटका! गोव्यातून पुणे-मुंबईकडे जाणारी खासगी बससेवा विस्कळीत

अभिनेता सलमान खानला उच्च न्यायालयाची नोटीस, कांदोळी व्हिला बांधकामाविरोधातील जनहित याचिकेची दखल; यंत्रणांनाही नोटिसा

Horoscope: मंगळवारचा दिवस ठरणार भाग्यवर्धक! अनेक राशींना करिअरमध्ये यश, व्यवसायात नफा आणि धनलाभाचे प्रबळ योग

SCROLL FOR NEXT