Drug Trafficking 
ग्लोबल

Drug Trafficking: गोळीबारात 64 हून अधिक ठार, 81 संशयितांना अटक, 42 रायफल्स जप्त; अंमली पदार्थ तस्करांविरुद्ध पोलिसांची मोठी कारवाई!

Brazil Drug Trafficking: ब्राझीलमधील रियो डी जेनेरियो शहरात पोलिसांनी केलेल्या एका मोठ्या कारवाईदरम्यान कमीत कमी 64 हून अधिक लोकांचा मृत्यू झाला.

Manish Jadhav

Brazil Drug Trafficking: ब्राझीलमधील रियो डी जेनेरियो शहरात पोलिसांनी केलेल्या एका मोठ्या कारवाईदरम्यान कमीत कमी 64 हून अधिक लोकांचा मृत्यू झाला. अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, शहरात सक्रिय असलेल्या एका मोठ्या अंमली पदार्थ तस्करी (Drug Trafficking) टोळीविरुद्ध ही कारवाई करण्यात आली.

2500 हून अधिक सुरक्षा कर्मचाऱ्यांची कारवाई

अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, अंदाजे 2500 पोलीस आणि सैनिकांच्या मोठ्या तुकडीने मंगळवारी (27 ऑक्टोबर) रियो डी जेनेरियोमध्ये अंमली पदार्थ तस्कर टोळीविरुद्ध ही छापेमारीची कारवाई केली. या कारवाईदरम्यान 81 संशयितांना अटक (Arrested) करण्यात आली.

गोळीबारात 64 जण ठार

पोलिसांनी (Police) दिलेल्या माहितीनुसार, ही कारवाई सुरु असताना पोलीस आणि तस्कर यांच्यात गोळीबार झाला. या गोळीबारात 64 लोक मारले गेले, ज्यात 4 पोलीस कर्मचाऱ्यांचा देखील समावेश आहे. सरकारने सांगितले की, या ऑपरेशनची योजना एक वर्षापेक्षा अधिक काळापासून आखली जात होती आणि यात 2500 हून अधिक सुरक्षा दलाचे जवान सहभागी होते.

ड्रोनचा वापर आणि संयुक्त राष्ट्रांची चिंता

सरकारने सांगितले की, टोळीच्या सदस्यांनी पोलिसांनी केलेल्या कारवाईला प्रत्युत्तर देण्यासाठी कथितरित्या ड्रोनचा वापर केला. 'गुन्हेगारांनी पेन्हा कॉम्प्लेक्समध्ये पोलीस अधिकाऱ्यांवर हल्ला करण्यासाठी ड्रोनचा वापर केला', असे निवेदनात म्हटले.

दरम्यान, संयुक्त राष्ट्र मानवाधिकार कार्यालयाने रियो डी जेनेरियोमध्ये अंमली पदार्थ तस्करांवर झालेल्या या पोलीस कारवाईला 'भीतिदायक' (Horrifying) असे म्हटले. '60 हून अधिक लोकांचा मृत्यू झालेल्या रियो डी जेनेरियोमधील पोलीस कारवाईमुळे आम्ही भयभीत झालो आहोत,' असे संयुक्त राष्ट्रांच्या मानवाधिकार कार्यालयाने स्पष्ट केले.

गव्हर्नर क्लाउडिओ कास्त्रो काय म्हणाले?

रियो डी जेनेरियोचे गव्हर्नर क्लाउडिओ कास्त्रो यांनी या घटनेवर प्रतिक्रिया देताना म्हटले की, "आमच्यासमोर एक भयंकर आव्हान आहे." ते म्हणाले की, ही एक सामान्य गुन्हेगारी नाही. 'डाव्या विचारसरणीच्या कैद्यांच्या एका गटाच्या रुपात तयार झालेली ही संघटना आता एक आंतरराष्ट्रीय टोळी म्हणून विकसित झाली आहे, जी अंमली पदार्थांची तस्करी आणि खंडणीमध्ये (Extortion) गुंतलेली आहे.' ही टोळी अनेकदा प्रतिस्पर्धी गट आणि सुरक्षा दलांसोबत संघर्ष करते, असेही त्यांनी नमूद केले. पोलिस अधिकाऱ्यांच्या मते, सध्या मोहीम सुरु असल्याने मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता आहे. या कारवाईत 42 रायफल जप्त करण्यात आल्या आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Crime: खाकी वर्दीचा धाक दाखवून वृद्धांना लुटायचे, डिचोलीत तोतया पोलिसांच्या टोळीचा पर्दाफाश! दोघे अटकेत

Ruturaj Gaikwad Century: ऋतुराज गायकवाडचं वादळ! गोव्याविरुद्ध झळकावलं शानदार शतक; बनला 'विजय हजारे ट्रॉफी'चा नवा 'सेंच्युरी किंग'

झारखंड दारु घोटाळा! छत्तीसगडच्या मद्य व्यावसायिक नवीन केडियाला गोव्यातून अटक; ACB ची कारवाई

"26 वर्षे देशाची सेवा केली, आता ओळख विचारताय?" निवडणूक आयोगाच्या नोटिसमुळे खासदार विरियातो संतापले

WPL 2026: गोमंतकीय क्रिकेटरचा ‘डब्ल्यूपीएल’मध्ये कल्ला! दिल्ली कॅपिटल्सला ठोकला रामराम; यूपी वॉरियर्ससोबत नवीन इनिंग

SCROLL FOR NEXT