Brazil Village Story: इकडे लग्नासाठी मुली मिळेनात, अन तिकडे नवरा मिळावा म्हणून मुली पैसे द्यायलाही तयार...

Brazil Village Story: सध्या मुलांना लग्नासाठी मुली मिळत नाहीयेत. दरम्यान ब्राझीलमध्ये असे एक गाव आहे, जिथे फक्त मुलीच राहतात.
Girls
GirlsDainik Gomantak

Brazil Village Story: सध्या मुलांना लग्नासाठी मुली मिळत नाहीयेत. दरम्यान ब्राझीलमध्ये असे एक गाव आहे, जिथे फक्त मुलीच राहतात. आता या गावातील मुली लग्नासाठी जोडीदाराच्या शोधात आहेत. त्यांना लग्न करण्याची खूप इच्छा आहे.

ही कहाणी ब्राझीलमधील नोइवा येथील एका गावातील आहे. हे गाव डोंगरावर वसलेले आहे. येथील मुली खूप सुंदर आहेत. विशेष म्हणजे, त्या अविवाहित मुलाच्या शोधत आहेत.

या गावात सुमारे 600 मुली राहतात. लग्नासाठी मुलाला पैसे द्यायलाही त्या तयार आहेत. असे असूनही त्या लग्नासाठी तरसत आहेत. चला तर मग जाणून घेऊया यामागचे कारण काय?

सुंदर मुली जोडीदाराच्या शोधात

मीडिया रिपोर्ट्सनुसार, या मुली ज्या ठिकाणी राहतात त्या ठिकाणचे लिंग गुणोत्तर खूपच भिन्न आहे. इथे मुलांची संख्या मुलींच्या तुलनेत खूपच कमी आहे.

यामुळेच मुलींना त्यांच्या स्वप्नातील राजकुमार मिळत नाहीये. या गावात पुरुषांना राहायला आवडत नाही. ते गाव सोडून जातात. त्यामुळेच मुली गावात एकट्या राहतात. याच कारणामुळे ब्राझीलच्या (Brazil) या गावातील महिला आपल्या जोडीदारासाठी आसुसलेल्या आहेत.

Girls
Brazil Flood : ब्राझीलमध्ये पूर, भूस्खलनाचे 48 बळी; 1700 नागरिकांचे स्थलांतर

लग्नासाठी मुलगा मिळत नाहीये?

विशेष म्हणजे, ब्राझीलच्या या गावात मुलींची संख्या जास्त असल्याने प्रामुख्याने निर्णयही त्यांच्याच बाजून घेतले जातात. हे आणखी एक कारण आहे, ज्यामुळे पुरुषांना येथे महिलांसोबत राहणे आवडत नाही.

या गावातील पुरुष प्रामुख्याने शेती आणि पशुपालनाची कामे करतात. विशेष म्हणजे, ही सर्व कामे महिलाही करतात. त्यामुळे गावातील पुरुष कामाच्या शोधात शहरात जातात.

Girls
Brazil Statue lightning: ब्राझीलच्या ऐतिहासिक येशू पुतळ्यावर पडली वीज, कॅमेरात टिपले अद्भूत क्षण

अहवालात ही बाब समोर आली आहे

अहवालानुसार, गावातील नियमांमुळे मुले येथे राहत नाहीत. मुलांनी लग्न (Marriage) करुन त्यांच्यासोबत गावात राहावे आणि प्राचीन काळापासून चालत आलेल्या नियमांचे पालन करावे अशी महिलांची इच्छा आहे. मात्र, मुलांना ही गोष्ट आवडत नाहीये.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com