Somalia Blast Dainik Gomantak
ग्लोबल

Video of Somalia Bomb blast: काळीज पिळवटून टाकणारे दृश्य! भीषण स्फोटात 27 जण ठार, मृतांमध्ये सर्वाधिक मुले

Ashutosh Masgaunde

सोमालियामध्ये शनिवारी रात्री (10 जून) एक मोठा बॉम्बस्फोट झाला, ज्यामध्ये 27 लोकांचा मृत्यू झाला, तर 53 हून अधिक लोक जखमी झाले. मिळालेल्या माहितीनुसार, मृतांमध्ये बहुतांश मुले आहेत.

अहवालानुसार, सोमालियाच्या लोअर शबेले प्रदेशातील कोरिओली शहराजवळ मोर्टार शेलच्या स्फोटामुळे हा अपघात झाला.

कोरियोली शहराचे उपजिल्हा आयुक्त अब्दी अहमद अली यांनी सांगितले की, बॉम्ब आणि भूसुरुंग यांसारख्या स्फोटक अवशेषांच्या स्फोटामुळे ही घटना घडली आहे. त्यांनी सांगितले की, अपघातावेळी गावातील मैदानात मुले खेळत होती, त्यावेळी मोठा स्फोट झाला, ज्यामध्ये 12 ते 15 मुले सापडली.

या स्फोटात बहुतांश मुलांचा मृत्यू झाला

अहवालानुसार, बहुतेक मुलांचा जागीच मृत्यू झाला, तर काहींना तातडीने कोरोले येथील रुग्णालयात उपचारासाठी नेण्यात आले, तेथे उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला.

अब्दी अहमद अली यांनी दिलेल्या माहितीनुसार, जखमींवर उपचार सुरू आहेत. मात्र, मृतांचा आकडा आणखी वाढू शकतो. प्रत्यक्षात काही जखमींची प्रकृती चिंताजनक आहे.

हा अपघात कसा झाला याचा सविस्तर तपास सुरू असल्याचे अहमद अली यांनी सांगितले.

सोमालियातून हिंसाचाराच्या बातम्या येत असतात. नुकत्याच शुक्रवारी (9 जून) रात्री राजधानी मोगादिशूमध्ये एक मोठा दहशतवादी हल्ला झाला, ज्यामध्ये तीन सैनिकांसह 9 लोक ठार झाले, तर 10 जण जखमी झाले.

यापूर्वी गेल्या महिन्यातही येथे हिंसाचार उसळला होता. ज्यामध्ये सोमालियाच्या लष्कराने अल-शबाबच्या 8 दहशतवाद्यांना ठार केले. याशिवाय आणखी दोघांना अटक करण्यात आली.

सोमालियामध्ये गेल्या महिन्यातही हिंसाचार

सोमालियामधून  हिंसाचाराच्या बातम्या सतत येत असतात. गेल्या महिन्यातही येथे हिंसाचार उसळला होता. 30 मे सोमालियाच्या लष्कराने अल-शबाबच्या 8 दहशतवाद्यांना ठार केले. याशिवाय आणखी दोघांना अटक करण्यात आली.

यापूर्वी जानेवारी महिन्यात येथे आत्मघाती हल्ला झाला होता, ज्यामध्ये 35 हून अधिक लोकांचा मृत्यू झाला होता. शेकडो लोक जखमी झाले. अल-शबाबचे सोमालियामध्ये मोठे नेटवर्क आहे. तो रोज अशा घटना घडवत असतो.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Sunburn Festival 2024: ‘सनबर्न’ इथेच का हवा आहे? दबावामुळे स्थानिक संतप्त; बैठकीसाठी सरसावल्या बाह्या

Rashi Bhavishya 6 October 2024: कष्टातून मिळणार समृद्धी,पार्टनरशिपमधून होणार सुखाची प्राप्ती; जाणून घ्या कसा असेल तुमचा दिवस

Subhash Velingkar: सुभाष वेलिंगकरांची अटक अटळ? कोर्टाचा दिलासा नाही, जामीन अर्जावर सोमवारी सुनावणी

Saint Francis Xavier: सुभाष वेलिंगकरांच्या अटकेसाठी उद्रेक; पर्यटक, विद्यार्थ्यांचे हाल, गोव्यात दिवसभर कुठे काय घडलं?

BKC ते आरे JVLR पंतप्रधान मोदींचा मेट्रोने प्रवास; शाळकरी विद्यार्थी, महिलांशी साधला संवाद पाहा Video

SCROLL FOR NEXT