Gold Silver Price Today: सोन्या-चांदीसह शेअर बाजार गडगडला! गुंतवणूकदार संभ्रमात; झाली 'इतक्या' रुपयांची घट

Gold Silver Rate Today: सोने-चांदीचे भाव अचानक गडगडले. सोन्यात प्रतिदहा ग्रॅमला ९०० रुपयांची (विना जीएसटी) तर चांदीत प्रतिकिलो सात हजारांची घट झाली आहे.
Gold Silver Price Today
Gold Silver Price TodayDainik Gomantak
Published on
Updated on

जळगाव: येथील सराफा बाजारात मागील दोन दिवसांपासून भाववाढीचा चढता आलेख पाहायला मिळाला. मात्र, गुरुवारी (ता. ८) सोने-चांदीचे भाव अचानक गडगडले. सोन्यात प्रतिदहा ग्रॅमला ९०० रुपयांची (विना जीएसटी) तर चांदीत प्रतिकिलो सात हजारांची घट झाली आहे.

अमेरिकेत ट्रम्प प्रशासनाने मोठे आयातशुल्क लावण्याबाबतच्या प्रस्तावाला मंजुरी दिल्याचा आणि अमेरिकेतच डिसेंबरमधील रोजगाराची आकडेवारी प्रसिद्ध झाल्याने आंतरराष्ट्रीय बाजारावर नकारात्मक परिणाम झाला. त्यामुळे सोन्या-चांदीच्या भावासह शेअर बाजारही गडगडला.

Gold Silver Price Today
Gold Silver Rate: इतिहासात पहिल्यांदाच! 10 ग्रॅम सोन्याचा दर 1.38 लाखांच्या पार, तर चांदी सव्वा दोन लाखांवर; आजवरचे मोडले सगळे रेकॉर्ड्स

सोन्याचा भाव प्रतिदहा ग्रॅमला एक लाख ३६ हजार ७०० रुपये होता. त्यात आज नऊशे रुपयांची (विना जीएसटी) घट होऊन सोने एक लाख ३५ हजार ८०० वर पोहोचले. तर चांदीचा भाव प्रतिकिलो दोन लाख ४८ हजार (विना जीएसटी) होता. त्यात गुरुवारी (ता. ७) सात हजारांची घट झाली.

Gold Silver Price Today
Gold Silver Price: जागतिक युद्धाचे सावट! अमेरिकेच्या व्हेनेझुएलावरील कारवाईनंतर सोन्या-चांदीच्या दरात मोठी उसळण; जाणून घ्या आजचे भाव
Gold Silver Rates
Gold Silver RatesDainik Gomantak

सोने चांदीचे काही दिवसांतील भाव (विना जीएसटी)

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com