Kala Academy: कला अकादमीच्या नूतनीकरणात '50 कोटी' वायफळ खर्च! टास्क फोर्सकडून गंभीर चिंता व्यक्त; IIT मद्रासच्या अहवालातून त्रुटी उघड

Kala Academy Goa Report: कला अकादमीच्या नूतनीकरण कामाचा अभ्यास करण्यासाठी नेमलेल्या टास्क फोर्सने इमारतीच्या संरचनात्मक सुरक्षिततेबाबत गंभीर चिंता व्यक्त केली आहे.
Goa Kala Academy:
Goa Kala Academy:Dainik Gomantak
Published on
Updated on

पणजी: कला अकादमीच्या नूतनीकरण कामाचा अभ्यास करण्यासाठी नेमलेल्या टास्क फोर्सने इमारतीच्या संरचनात्मक सुरक्षिततेबाबत गंभीर चिंता व्यक्त केली आहे. पुढील ५० वर्षांसाठी कला अकादमीचे संरक्षण होईल, असे नूतनीकरण अपेक्षित होते; मात्र आयआयटी मद्रासच्या अहवालातील निष्कर्षांवरून हे काम योग्य प्रकारे झालेले नाही. तसेच नूतनीकरणावर सुमारे ५० कोटी रुपयांचा वायफळ खर्च झाल्याचा निष्कर्ष गुरुवारी झालेल्या टास्क फोर्सच्‍या बैठकीत काढण्यात आला.

या बैठकीस टास्क फोर्सचे अध्यक्ष विजय केंकरे, सदस्य देविदास आमोणकर, फ्रान्सिस कुएल्हो, आर्मानिनो रिबेरो यांच्यासह इतर सदस्य उपस्थित होते. बैठकीनंतर कुएल्हो यांनी पत्रकारांना सांगितले की, आयआयटी मद्रासच्या पथकाने गेल्‍या सप्टेंबरमध्ये प्रत्यक्ष पाहणी करून एक मसुदा अहवाल सादर केला होता.

या अहवालात अनेक महत्त्वाची संरचनात्मक कामे अपूर्ण राहिल्याचे नमूद करण्यात आले असून संपूर्ण इमारतीला भेगा, तसेच पाण्याची गळती आढळून आल्याचे स्पष्ट केले आहे. इमारतीच्या संरचनात्मक मजबुतीचे सखोल मूल्यांकन करण्यासाठी इन्फ्रारेड व थर्मल स्कॅनिंग करण्याची शिफारस आयआयटी मद्रासने केली आहे.

तसेच स्लॅबवरील वॉटरप्रूफिंग काढून पुन्हा करावे लागेल, असेही अहवालात नमूद आहे.दरम्‍यान, आम्हाला कला अकादमी पूर्वीसारखी हवी व त्‍यासाठी सतत सरकारकडे मागणी करत आलो आहोत, असे कलाकारांनी सांगितले.

कला अकादमी अजूनही सुरू कशी?

एकूण ६० कोटी रुपयांपैकी ५० कोटी खर्च झाले असून १० कोटी रुपये रोखून ठेवण्यात आल्याची माहिती समितीला मिळाली आहे. आयआयटी मद्रासच्या शिफारशी तातडीने अंमलात आणाव्यात, अशी मागणी टास्क फोर्सने केली आहे. एक महिन्यानंतर आणखी एक पाहणी करून त्यावर पाठपुरावा बैठक घेण्यात येणार आहे.

संरचनात्मक सुरक्षिततेबाबत गंभीर प्रश्‍‍न असतानाही कला अकादमी सध्या कशी सुरू आहे, असा सवाल समितीने उपस्थित केला आहे. संबंधित प्रमाणपत्र कोणत्या आधारे देण्यात आले, याची माहिती व्यवस्थापनाकडे मागणार असल्याचेही समितीने स्पष्ट केले.

Goa Kala Academy:
Kala Academy: कसे कोसळले 'कला अकादमी'चे छत? ‘टास्क फोर्स’ची होणार बैठक; हैद्राबादच्या अहवालाकडे विशेष लक्ष

सर्व उणिवा दिल्‍या दाखवून

‘आयआयटी मद्रास’ने ज्या शिफारशी केल्या आहेत, त्याची सर्व माहिती कला अकादमीच्या सदस्य सचिवांनाही दिली असावी, असा अंदाज व्यक्त करीत कुएल्हो म्हणाले, आयआयटी मद्रासने छायाचित्रांसह सर्व माहिती दिली आहे.

कामातील उणिवा आणि दुवे त्यातून स्पष्टपणे जाणवत आहेत. या अहवालाचा अभ्यास करून खाते त्वरित काम सुरू करेल अशी अपेक्षा आहे. पाण्याच्या निचऱ्यापासून गळतीपर्यंत किती चुका राहिल्या आहेत, हे यावरून स्पष्ट होते.

Goa Kala Academy:
Shankasur Kala: शेकडो वर्षांची परंपरा असलेला ‘शंकासुर काला'! गोव्यातील प्राचीन परंपरा; स्थानिक लोककलेचा आविष्कार

खुल्या रंगमंचाचे काय?

टास्क फोर्सच्या बैठकीनंतर सदस्यांनी प्रसारमाध्यमांना वृत्तांत सांगितला. त्यानंतर कला अकादमीशी निगडीत काही कलाकारांनी ‘गोमन्तक’कडे आपली खदखद व्यक्त केली. ती खदखद कला अकादमीच्या खुल्या रंगमंचाविषयी आहे. खुल्या रंगमंचाचे काम एक वीटही पुढे सरकले नाही, त्याचा विचार कोणीच कसा करीत नाही? अकादमीच्या नूतनीकरणाच्या कामावर कोट्यवधी रुपये खर्च झाले, पण खुल्या रंगमंचाचे छत कोसळले. ते उभारण्याचे आश्वासन दिले गेले, पण फोल ठरले.

कला अकादमीच्या कामाविषयी ‘आयआयटी मद्रास’चा फाईंडिंग ड्राफ्ट मिळाला आहे. त्यानुसार संबंधित खाते काम सुरू करेल.

विजय केंकरे (चेअरमन, टास्क फोर्स)

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com