bomb blast in Pakistan Dainik Gomantak
ग्लोबल

Pakistan: पाकिस्तानच्या पेशावर शहरात मोठा स्फोट, सुरक्षा दलाच्या वाहनाला केले लक्ष्य

Pakistan News: पाकिस्तानची अवस्था दयनीय झाली आहे. त्यावर सातत्याने होणाऱ्या दहशतवादी हल्ल्यांनी पाकिस्तानचे कंबरडे मोडले आहे.

Manish Jadhav

Pakistan News: पाकिस्तानची अवस्था दयनीय झाली आहे. त्यावर सातत्याने होणाऱ्या दहशतवादी हल्ल्यांनी पाकिस्तानचे पुरते कंबरडे मोडले आहे.

दहशतवाद्यांना आश्रय देणारा आणि त्यांचे पालनपोषण करणारा पाकिस्तान आता मोठ्या संकटात सापडला आहे. ताज्या घटनेत पाकिस्तानच्या पेशावर शहरात बॉम्बस्फोट झाला. या बॉम्बस्फोटात अनेक लोक मृत्युमुखी पडले.

मिळालेल्या माहितीनुसार, पाकिस्तानातील पेशावरमध्ये हा स्फोट झाला. येथे सोमवारी एका रुग्णालयाजवळ सुरक्षा दलाच्या वाहनाला लक्ष्य करुन हल्लेखोरांनी बॉम्बस्फोट केला. या अपघातात पाकिस्तानी सुरक्षा दलाच्या एका जवानाचा मृत्यू झाला आहे.

या घटनेत चार सुरक्षा कर्मचाऱ्यांसह अनेक जण जखमी झाले आहेत. एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने ही माहिती दिली.

दरम्यान, खैबर पख्तुनख्वा प्रांताची राजधानी पेशावरमधील वारसाक रोडवरील प्राइम हॉस्पिटलसमोर फ्रंटियर कॉन्स्टेब्युलरीच्या (एफसी) जवानांवर हा हल्ला झाला, असे अधिकाऱ्याने सांगितले.

वारसाकचे पोलिस अधीक्षक (एसपी) मोहम्मद अर्शद खान यांनी सांगितले की, स्फोटात एफसीचे पाच अधिकारी आणि तीन नागरिक जखमी झाले आहेत. खान म्हणाले की, हा हल्ला आयईडीने करण्यात आल्याचे दिसते.

बॉम्बस्फोट प्रकरणाचा तपास सुरु असल्याचे त्यांनी सांगितले. गेल्या आठवड्यात वायव्य-पश्चिम खैबर-पख्तुनख्वा प्रांतातील चित्राल जिल्ह्यातील दोन लष्करी चौक्यांवर तालिबानी दहशतवाद्यांनी (Terrorists) केलेल्या हल्ल्यात चार पाकिस्तानी सैनिक ठार आणि 7 जण जखमी झाले होते.

बलुचिस्तानमध्ये बॉम्बस्फोट झाला, 7 लोकांचे तुकडे झाले

अलीकडच्या काळात पाकिस्तानात सातत्याने बॉम्बस्फोट होत आहेत. महिनाभरापूर्वीही पाकिस्तानात बॉम्बस्फोट झाले होते.

पाकिस्तानातील (Pakistan) बलुचिस्तानमधील केच जिल्ह्यात झालेल्या या स्फोटात 7 जणांचा मृत्यू झाला. यामध्ये एका वाहनाला रिमोट कंट्रोल बॉम्बने उडवण्यात आले.

या बॉम्बस्फोटात मृत्युमुखी पडलेल्या 7 जणांमध्ये युनियन कॉन्सिल बालगुतारचे अध्यक्ष इश्तियाक याकूब यांचाही समावेश आहे.

इश्तियाक याकूब आणि लग्न समारंभातून परतणाऱ्या इतरांना घेऊन जाणाऱ्या वाहनाला लक्ष्य करण्यासाठी हल्लेखोरांनी रिमोट स्फोटक यंत्र पेरले होते.

जमियत उलेमा-ए-इस्लाम-फजलच्या बैठकीत मोठा स्फोट झाला

याआधी जुलै महिन्याच्या अखेरीस एका मोठ्या बॉम्बस्फोटाने पाकिस्तान हादरला होता. या बॉम्बस्फोटात 40 हून अधिक लोकांचा मृत्यू झाला होता.

बॉम्बस्फोटामुळे 200 हून अधिक लोक गंभीर जखमी झाले होते. जखमींना जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.

मिळालेल्या माहितीनुसार, पाकिस्तानातील खैबर पख्तुनख्वामधील बाजौर भागात जमियत उलेमा-ए-इस्लाम-फजल (JUI-F) ची बैठक सुरु होती. या बैठकीला उपस्थित राहण्यासाठी अनेक कार्यकर्ते आले होते. कार्यक्रम सुरु असताना बॉम्बस्फोट झाला होता.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Health Horoscope: साप्ताहिक आरोग्य राशीभविष्य 21 ते 27 सप्टेंबर 2026; 'या' 3 राशींची प्रकृती राहील ठणठणीत, तर काहींना तणाव आणि थकवा सतावण्याची शक्यता

Mahindra Thar 3-Door Facelift: ऑफ-रोडिंगचा दम कायम, पण लूक मॉडर्न! थार येतेय नव्या अवतारात! Roxxची झलक पाहायला मिळणार

Foreign Woman Viral Video: फोटो काढत होती परदेशी महिला, अचानक लोकांनी घेरलं; पुढे जे घडलं ते कॅमेऱ्यात कैद, पाहा व्हिडिओ

क्रिकेट चाहत्यांसाठी मोठी बातमी! Asian Games 2026 मध्ये IND vs PAK महामुकाबला होणार नाही; भारताची श्रीलंकेशी फायनलमध्ये लढत

Low BPची समस्या वारंवार होतेय? चक्कर, थकवा अन् मळमळकडे दुर्लक्ष करू नका; जाणून घ्या लक्षणे आणि उपाय

SCROLL FOR NEXT