blast in lahore today Dainik Gomantak
ग्लोबल

Blast in Lahore: पाकिस्तानला आणखीन एक मोठा धक्का! ऑपरेशन सिंदूरनंतर 6 बॉम्बस्फोट; बलुचिस्तान आर्मीचाही हल्ला

lahore blast News: समोर आलेल्या माहितीनुसार पाकिस्तानात सलग सहा ठिकाणी बॉम्बस्फोट झालेत मात्र हे स्फोट कोणी केलेत याची माहिती अद्याप समोर आलेली नाही

Akshata Chhatre

लाहोर: भारताने ऑपरेशन सिंदूरच्या अंतर्गत केलेल्या हवाई हल्ल्यानंतर आता गुरुवार (दि.८) रोजी पाकिस्तानला आणखीन एक मोठा धक्का बसलाय. ऑपरेशन सिंदूरमधून सावरत असलेल्या पाकिस्तानमध्ये गुरुवारी आणखीन सहा मोठे हल्ले झाल्याची बातमी समोर आली आहे. समोर आलेल्या माहितीनुसार पाकिस्तानात सलग सहा ठिकाणी बॉम्बस्फोट झालेत मात्र हे स्फोट कोणी केलेत याची माहिती अद्याप समोर आलेली नाही.

लाहोरला कोणी हदरावलं?

पाकिस्तानमधील लाहोरमध्ये गुरुवारी सकाळी सलग तीन हल्ले झालेत. यात वॉल्टन विमानतळ, गोपाल नगर आणि नसराबाद अशी महत्वाच्या भागांचा समावेश होता. सकाळी अचानक झालेल्या या हल्ल्यांमुळे पाकिस्तान पुन्हा एकदा हादरून गेलंय.

बालुच आर्मीचा हल्ला:

पाकिस्तानवर भारताने केलेला हल्ला ताजा असतानाच बलुचिस्तान लिबरेशन आर्मीने पाकिस्तानमध्ये दोन बॉम्बस्फोट घडवून आणलेत. बलुचिस्तानला वेगळं राष्ट्र बनवण्याची मागणी करणाऱ्या या बंडखोरांनी पाकिस्तानी सैन्यांतील १४ सैनिक ठार केल्याची माहिती समोर आलीये. या हल्ल्यात बलुचिस्तान लिबरेशन आर्मीने पाकिस्तानी लष्करी ताफ्याच्या वाहनावर रिमोट-कंट्रोल आयईडी हल्ला केला, ज्यात ऑपरेशन्स कमांडर तारिक इम्रान आणि सुभेदार उमर फारूख यांच्यासह १२ सैनिकांनी जीव गमावला आहे.

दुसऱ्या एका कारवाईत बलुचिस्तान लिबरेशन आर्मीने केचमधील कुलाग तिग्रान भागात पाकिस्तानी सैन्याच्या बॉम्ब निकामी पथकावर हल्ला केला, ज्यात दोन जवानांचा मृत्यू झाला आहे.

बलुचला का हवंय वेगळं राष्ट्र?

बलुचिस्तानमधील या भागांमध्ये राजकीय दुर्लक्ष, मानवी हक्कांचे उल्लंघन आणि नैसर्गिक संसाधनांचे शोषण होत असल्याने त्यांनी वेगळ्या राष्ट्राची मागणी केलीये. या प्रदेशात असलेल्या खनिज संपत्तीचा स्थानिकांना नाही तर केंद्र सरकार आणि परदेशी गुंतवणूकदारांनाच फायदा होत असल्याचा दावा त्यांनी केलाय आणि म्हणूनच लोकांमध्ये असंतोष पसरला आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Lucky Zodiac Signs 2026: व्यापाऱ्यांसाठी जॅकपॉट अन् नोकरदारांना पगारवाढ! ऑगस्ट महिन्यात 'या' राशीची चांदीच चांदी; पैशांची चिंता कायमची मिटणार

Government Jobs: कर्मचारी भरती आयोगाकडून 3 हजार नोकऱ्या; आता आणखी 2 हजार पदांसाठी सरकार सज्ज, CM प्रमोद सावंतांची मोठी घोषणा

Bori Road Safety Issue: बोरीतील धोकादायक साकवाकडे प्रशासनाचे दुर्लक्ष? कठडा तुटल्याने वाहनचालकांच्या जीवाला धोका, तातडीने दुरुस्तीची गरज

Garuda Lenka: राजासाठी जीव देण्याची शपथ, मृत्यूची बातमी मिळताच आत्मबलिदान; होयसळ साम्राज्याच्या ‘गरुड लेंका’ योद्ध्यांची रोमांचकारी गाथा

Viral News: आश्चर्य..! दोन तोंड अन् आठ पायांच्या वासराचा जन्म; तब्बल 5 तास चालली प्रसूतीची शस्त्रक्रिया Watch Video

SCROLL FOR NEXT