Operation Sindoor: राज्यात पणजी आणि विमानतळांसह अनेक ठिकाणी हाय-अलर्ट; दाबोळीत मॉक ड्रिल यशस्वी!

Dabolim airport mock drill: मंत्रीमंडळाच्या बैठकीत मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी देखील भारतीय सेना आणि देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कामाचे कौतुक केले आहे
Operation Sindoor update
Operation Sindoor updateDainik Gomantak
Published on
Updated on

पणजी: भारताने केलेल्या हवाई हल्ल्यानंतर देश-विदेशातून भारताचं कौतुक केलं जातंय. बुधवारी (दि.7) रोजी झालेल्या मंत्रीमंडळाच्या बैठकीत मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी देखील भारतीय सेना आणि देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कामाचे कौतुक केले आहे.

'ऑपरेशन सिंदूर'च्या यशस्वी कामगिरीनंतर, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कणखर नेतृत्वाचे सर्वत्र कौतुक होत आहे. या पार्श्वभूमीवर, गोव्यात देखील जारी करण्यात आली आहे. राज्यातील महत्त्वाचे ठिकाणे जसे की विमानतळ, इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लिमिटेड, मुरगाव, पणजी शहर आणि राज्यातील नौदल तसेच तटरक्षक दल हाय अलर्टवर आहेत.

भारतातील विविध ठिकाणी बुधवारी मॉक ड्रिलचे आयोजन करण्यात आले, ज्यात गोव्याचा देखील समावेश होता. पैकी दाबोळी विमानतळावर आयोजित केलेले मॉक ड्रिल यशस्वी झाल्याचं उपजिल्हाधिकारी भगवंत करमाळी म्हणाले आहेत.

भारतावर शत्रूकडून हल्ला झाल्यास आपण किती साक्षम आहोत हे तपासण्यासाठी आणि सामान्य जनतेला आपत्कालीन स्थितीत काय करावं यांची तयारी तपासण्यासाठी करण्यासाठी हे मॉक ड्रिल आयोजित केले गेले.

Operation Sindoor update
Operation Sindoor: भारताच्या धडक कारवाईत लष्कर-ए-तोयबासह टॉप 6 दहशतवादी कमांडर ठार! कसाबने घेतलेले ट्रेनिंग सेंटरही उद्ध्वस्त

विमानतळ संचालक जॉर्ज वर्गीस म्हणाले की दाबोळी विमानतळ हे भारतातील सर्वात मोक्याच्या विमानतळांपैकी एक आहे आणि नौदलाच्या लढाऊ विमानांच्या सरावासाठी अधिक वेळ दिला जाईल, तसेच सीमेवरील तणावपूर्ण परिस्थितीमुळे आज दोन उड्डाणे रद्द करण्यात आली आहेत.

मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भारतीय सेनेने केलेल्या हवाई हल्ल्याचे कौतुक केले. पंतप्रधान मोदी यांनी कायमच देशाला प्रगतीच्या मार्गावर अग्रेसर ठेवलेय, भारताच्या रक्षणासाठी देखील ते तत्पर असतात. यासह सैन्याने दाखवलेल्या पराक्रमाचे मुख्यमंत्र्यांनी कौतुक केले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com