Money Dainik Gomantak
ग्लोबल

Swiss Bank: आत्ता काय खरं नाय! स्विस बँकेने भारताला दिली खातेदारांची यादी

Black Money In Swiss Bank: स्वित्झर्लंडच्या बँकांमध्ये काळा पैसा ठेवणाऱ्या धनाढ्याविरोधात सरकारला पुन्हा मोठं यश मिळालं आहे.

दैनिक गोमन्तक

Swiss Bank on Black Money: स्वित्झर्लंडच्या बँकांमध्ये काळा पैसा ठेवणाऱ्या धनाढ्याविरोधात सरकारला पुन्हा एकदा मोठं यश मिळालं आहे. सरकारच्या विनंतीवरुन स्विस बँकेने पुन्हा भारतीय खातेदारांची यादी जाहीर केली आहे. भारताला मिळालेली ही चौथी यादी आहे. त्यात अनेक ट्रस्ट आणि कंपन्यांच्या खात्यांचाही समावेश आहे. मात्र सरकारने या खातेदारांची यादी सार्वजनिक केलेली नाही कारण त्याचा तपासावर विपरीत परिणाम होऊ शकतो.

34 लाख खातेदारांची यादी जाहीर

अहवालानुसार, स्वित्झर्लंडने (Switzerland) भारतासह 101 देशांना 34 लाख खातेदारांची यादी शेअर केली आहे. यामध्ये भारतातील शेकडो लोकांच्या खात्यांचाही समावेश आहे. स्वित्झर्लंडच्या फेडरल टॅक्स अ‍ॅडमिनिस्ट्रेशन (FTA) ने सांगितले की, 'ज्या काही देशांना खातेधारकांची यादी सलग चौथ्या वर्षी पाठवली गेली आहे, त्यात भारताचा (India) समावेश आहे. गेल्या महिन्यात ही माहिती सर्व देशांना पाठवण्यात आल्याचे एफटीएने म्हटले आहे. आता अशी पुढील माहिती सप्टेंबर 2023 मध्ये पाठवली जाईल.'

27 देशांना तपशील पाठवला नाही

स्विस बँकेने 101 देशांची नावे आणि इतर माहिती उघड केलेली नाही. पण ही माहिती मिळवणाऱ्या देशांच्या यादीत भारताचा समावेश असल्याचे बँक अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. रशियासह (Russia) 27 देशांना त्यांच्या खातेदारांची कोणतीही माहिती देण्यात आलेली नाही. याचे कारण असे सांगण्यात आले आहे की, 'त्या देशांकडून काही डेटा मागवण्यात आला होता, परंतु अनेक रिमाइंडर देऊनही त्यांनी आवश्यक कागदपत्रे दिली नाहीत, त्यामुळे त्यांना ती माहिती देता आली नाही.'

भारताला 2019 मध्ये पहिली माहिती मिळाली

सप्टेंबर 2019 मध्ये स्विस बँकांकडून भारताला पहिली यादी मिळाली होती. त्यासाठी त्यांनी इतर देशांसोबत स्विस सरकारवर दबाव आणला होता. त्यानंतर स्विस सरकारने प्रत्येक वर्षी खातेदारांची यादी आपोआप विविध देशांना पाठवण्याचा करार केला. भारत सरकारच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, स्विस बँकांकडून अशी माहिती मिळाल्याने विदेशात काळा पैसा जमा करणाऱ्या लोकांची माहिती मिळेल. यासोबतच त्यांनी स्विस बँकेत किती पैसे आणि दागिने ठेवले आहेत, याचीही माहिती घेतली जात आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Illegal Betting Case: ईडीची मोठी कारवाई! सुरेश रैना आणि शिखर धवन यांची 11.14 कोटींची संपत्ती जप्त; 'वन एक्स बेट'चा प्रमोशन करार पडला महागात

ट्रेनमध्ये भारतीय जवानाचा खून; चादरच्या वादातून साबरमती एक्सप्रेसमध्ये घडली घटना

"... म्हणून मी मांसाहार सोडला", आरोग्यमंत्री विश्वजित राणेंचा भावनिक खुलासा; Watch Video

Goa Politics: मंत्रीपद देतो म्हटलं की धावत येतील, विरोधकांच्या एकीचा उपयोग होणार नाही, 2027 मध्ये गोव्यात भाजपचीच सत्ता; विश्वजीत राणे

Cricket Controversy: "आपसी रंजिश, गुस्सा और खराब भाषा..." ज्युनियर्सवर हल्ल्याच्या आरोपानंतर बांगलादेशी कर्णधाराचा मोठा खुलासा, पोस्ट करत म्हणाली...

SCROLL FOR NEXT