Ukraine Crisis: युक्रेनवरील हल्ल्यांदरम्यान भारताने जारी केली अ‍ॅडव्हायझरी

Russia-Ukraine War: भारतीय दूतावासाने भारतीय नागरिकांसाठी एक अ‍ॅडव्हायझरी जारी केली आहे.
 Embassy
EmbassyDainik Gomantak

Russia Ukraine War: रशियाने युक्रेनच्या शहरांवर केलेल्या क्षेपणास्त्र हल्ल्यानंतर कीवमधील भारतीय दूतावासाने भारतीय नागरिकांसाठी एक अ‍ॅडव्हायझरी जारी केली आहे. दूतावासाने भारतीय नागरिकांना युक्रेनमधील अनावश्यक प्रवास टाळण्याचा सल्ला दिला आहे.

दरम्यान, दूतावासाने युक्रेनमध्ये (Ukraine) उपस्थित भारतीयांना विनंती केली आहे की, त्यांनी दूतावासाला त्यांच्या उपस्थितीच्या स्थितीबद्दल माहिती द्यावी, जेणेकरुन आवश्यक असल्यास त्यांच्याशी संपर्क साधता येईल. यासोबतच भारतीय नागरिकांना युक्रेन सरकार आणि स्थानिक प्रशासनाने जारी केलेल्या सुरक्षा मार्गदर्शक तत्त्वांचे काटेकोरपणे पालन करण्यास सांगितले आहे. रशियाने (Russia) सोमवारी युक्रेनची राजधानी कीवसह अनेक शहरांवर हल्ले करुन नागरिकांना लक्ष्य केले. राजधानी कीवमध्ये (Kyiv) झालेल्या हल्ल्यात आठ जणांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे.

 Embassy
Russia-Ukraine War: युक्रेनची शार्प शूटर थालिता डो रशियन रॉकेट हल्ल्यात ठार

झेलेन्स्की यांनी देशवासीयांना खंबीरपणे उभे राहण्याचे आवाहन केले

दरम्यान, युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष वोलोडिमिर झेलेन्स्की यांनी सांगितले की, "रशिया आम्हाला पृथ्वीवरुन नष्ट करण्याचा प्रयत्न करीत आहे." युक्रेनियन लोकांना खंबीरपणे उभे राहण्याचे आवाहन त्यांनी केले आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com