Bill Gates Makes Chapati Dainik Gomantak
ग्लोबल

Bill Gates Makes Chapati: बिल गेट्सही भारतीय चपातीच्या प्रेमात! स्वतः चपाती लाटून तुप लावून खाल्ली...

व्हिडिओ व्हायरल; पंतप्रधान नरेंद्र मोदींनीही शेअर केली पोस्ट

Akshay Nirmale

Bill Gates Makes Chapati: जगातील सर्वात श्रीमंत व्यक्तींच्या यादीत टॉप टेनमध्ये आपले स्थान गेली कित्येक वर्षे टिकवून ठेवलेल्या बिल गेट्स यांचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

या व्हिडिओमध्ये मायक्रोसॉफ्टचे सहसंस्थापक बिल गेट्स हे चपाती बनवताना दिसत आहेत. विशेष म्हणजे, गेट्स यांचा हा व्हिडिओ भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदींनीही शेअर केला आहे.

पंतप्रधान मोदींनी त्यांच्या इंस्टाग्राम स्टोरीमध्ये बिल गेट्स यांची ही स्टाईल शेअर केली आहे. या व्हिडिओमध्ये बिल गेट्स सेलिब्रिटी शेफ इटान बर्नाथसोबत दिसत आहेत. दोघे मिळून चमच्याने पीठ मळून घेतात आणि नंतर चपाती लाटतात.

हा व्हिडिओ सर्वप्रथम शेफ बर्नाथ याने त्याच्या ट्विटर पेजवर शेअर केला होता. या व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये बर्नाथने लिहिले आहे की, बिल गेट्स यांच्यासोबत चपाती बनवताना खूप मजा आली. मी नुकताच बिहारमधून (भारत) परत आलो, जिथे मी शेतकऱ्यांना भेटलो.

त्या शेतकऱ्यांचे आभार मानत बर्नाथ यांनी 'दीदी की रसोई' कॅन्टीनचा उल्लेख केला आहे. येथील महिलांनी मला चपाती, भाकरी बनवण्याचे बारकावे शिकवल्याचे बर्नाथ यांनी सांगितले आहे. "दीदींच्या स्वयंपाकघरातील कॅन्टीनमधील महिलांचे अभिनंदन, आणि आभार. त्यांच्यामुळे मी चपाती बनवू शकलो."

या व्हिडिओमध्ये बर्नाथ म्हणतो की, आज मी बिल गेट्ससोबत घरात चपाती लाटत आहे. त्यानंतर तो बिल यांच्याशी गप्पा मारत चपाती करताना दिसतो. बर्नाथ आणि बिल मिळून पिठात पाणी मिसळतात, पीठ मळून घेतात.

त्यानंतर बिल यांना चपाती लाटायलाही शिकवले जाते. चपाती लाटल्यानंतर ती तव्यावर भाजून त्यावर चांगले तूप लावले जाते. तूप घालून चपातीची चव चाखल्यावर बिल गेट्स यांनी खूप छान, अशी प्रतिक्रियाही दिली आहे. त्यानंतर त्यांनी इतर भाजीसोबतही चपातीचा आस्वाद घेतल्याचे दिसते.

सुपर्ब! इतरही अनेक भारतीय पदार्थ आहेत जे तुम्ही बनवण्याचा प्रयत्न करू शकता... अशी प्रतिक्रिया पंतप्रधान मोदींनी दिली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News Live: 54 जुन्या कदंब बस भंगारात; नव्या EV बसेस घेणार जागा

Operation Sindoor: 'भारत पाकिस्तानसोबत चीनशीही लढत होता...' ऑपरेशन सिंदूरबाबत भारतीय उप सेनाप्रमुखांचे मोठे वक्तव्य

BJP: इतिहासात पहिल्यांदाच भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाची सूत्रे महिलेकडे जाणार? RSS चा ग्रीन सिग्नल; 'ही' तीन नावे चर्चेत

Goa Athletics: गोव्यात रंगणार 'मनोहर पर्रीकर स्मृती ॲथलेटिक्स स्पर्धा'; तारखा, ठिकाण जाणून घ्या..

Pakistani Team: 'पाकिस्तान' टीम खेळणार भारतात! क्रीडा मंत्रालयाकडून ग्रीन सिग्नल; 2 करंडकांमध्ये घेणार भाग

SCROLL FOR NEXT