Goa Women Mobile Use: सर्व राज्यातील महिलांना मागे टाकत गोव्यातील महिला देशात अव्वल...

केंद्रीय इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्री अश्विनी वैष्णव यांची राज्यसभेत माहिती
Goa Women Mobile Use
Goa Women Mobile UseDainik Gomantak
Published on
Updated on

Goa Women Mobile Use : गेल्या काही वर्षात मोबाईल फोन हा मानवासाठी इतका महत्वाचा बनला आहे की, तो जणू आपल्या शरीराचाच एक अवयव बनून गेला आहे. आजकाल बहुतेक लोकांची सकाळ मोबाईल फोन पाहून होते आणि रात्र देखील मोबााईल फोन पाहत संपत असते. ताज्या माहितीनुसार देशात मोबाईल फोन वापरात गोव्यातील महिलांचा अव्व्ल क्रमांक लागतो.

Goa Women Mobile Use
Chinese Spy Balloon: चीनचा स्पाय बलून अमेरिकेने अटलांटिक महासागरात पाडला...

देशातील सर्व राज्यांशी तुलना करता मोबाईल फोन असलेल्या 15 ते 49 वयोगटातील महिलांची सर्वाधिक संख्या गोव्यात असल्याचे समोर आले आहे. ही संख्या 91.2 टक्के असून ती राष्ट्रीय सरासरी (53.9 टक्के) च्या खूप पुढे आहे. केंद्रीय इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्री अश्विनी वैष्णव यांनी शुक्रवारी राज्यसभेत ही माहिती दिली.

या क्रमवारीत गोव्यानंतर सिक्कीम (88.6%), केरळ (86.6%), लक्षद्वीप (84%) आणि पुद्दुचेरी (82.8%) यांचा क्रमांक लागतो. तर ज्या राज्यांची स्थिती खराब आहे त्यात मध्य प्रदेश (38.5%), छत्तीसगड (40.7%), उत्तर प्रदेश (46.5%), आंध्र प्रदेश (48.9%), ओडिशा आणि पश्चिम बंगाल (50.1%) यांचा समावेश आहे.

वैष्णव म्हणाले की, आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय लोकसंख्या, आरोग्य आणि संबंधित डोमेनवरील महत्त्वपूर्ण डेटा गोळा करण्यासाठी वेळोवेळी राष्ट्रीय कुटुंब आरोग्य सर्वेक्षण (NFHS) आयोजित करते. 1992-93, 1998-99, 2005-06, 2015-16 आणि 2019-21 या कालावधीत देशात NFHS च्या पाच फेऱ्या आयोजित करण्यात आल्या आहेत.

सर्वेक्षण अहवालानुसार, भारतातील महिला इंटरनेट वापरणाऱ्या एकूण 51.8 टक्के महिला आहेत त्यात शहरी 24.6 टक्के तर ग्रामीण 33.3 टक्के आहेत.

Goa Women Mobile Use
Goa Petrol-Diesel Price: गोव्यात पेट्रोल-डीझेल दर स्थिर, जाणून घ्या आजचे दर...

वैष्णव म्हणाले की, मे 2022 च्या राष्ट्रीय कुटुंब आरोग्य सर्वेक्षण (NFHS-5) च्या सर्वेक्षण अहवालात 2019-21 या कालावधीसाठी भारतातील 15-49 वयोगटातील 33.3 टक्के महिलांनी इंटरनेट वापरल्याचे उघड झाले आहे.

केंद्रीय मंत्र्याने सांगितले की केंद्र सरकारने 2017 मध्ये प्रधानमंत्री ग्रामीण डिजिटल साक्षरता अभियान (PMGDISHA) योजना सुरू केली होती, गोव्याने 55,980 नागरिकांची नोंदणी केली आहे, त्यापैकी 51,980 डिजिटली साक्षर झाले आहेत आणि 37,683 प्रमाणित झाले आहेत.

प्रमाणित झालेल्यांमध्ये 23,633 महिला आणि 14,050 पुरुष आहेत, असे केंद्र सरकारच्या अहवालात म्हटले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com