Russia Ukraine War Dainik Gomantak
ग्लोबल

Russia-Ukraine War: युक्रेन युद्धात रशियाचे मोठे नुकसान, पाच महिन्यांत 20 हजार रशियन सैनिक ठार; अमेरिकेचा दावा

Russia: गेल्या वर्षी फेब्रुवारीपासून सुरु असलेल्या युक्रेन-रशिया युद्धात अलीकडच्या पाच महिन्यांत रशियाचे मोठे नुकसान झाले आहे.

Manish Jadhav

Russia-Ukraine War: गेल्या वर्षी फेब्रुवारीपासून सुरु असलेल्या युक्रेन-रशिया युद्धात अलीकडच्या पाच महिन्यांत रशियाचे मोठे नुकसान झाले आहे.

युक्रेनमध्ये रशियन हवाई हल्ले सुरु असताना, डिसेंबरपासून 20,000 रशियन नागरिक मारले गेले आहेत, तर सुमारे 100,000 लोक जखमी झाले, असा अमेरिकेचा अंदाज आहे.

दरम्यान, युक्रेनच्या (Ukraine) पूर्वेकडील डोनेस्तक भागात रशियन आणि युक्रेनियन सैन्यांमध्ये भयंकर लढाई सुरु आहे, जिथे रशिया बाखमुत शहराला वेढा घालण्याचा प्रयत्न करत आहे.

दुसरीकडे, व्हाईट हाऊसच्या राष्ट्रीय सुरक्षा परिषदेचे प्रवक्ते जॉन किर्बी म्हणाले की, रशियन हानीचा अंदाज नुकत्याच सार्वजनिक करण्यात आलेल्या नवीन यूएस गुप्तचरांवर आधारित आहे. मात्र, गुप्तचर मंडळींनी कोणत्या आधारावर हा अंदाज लावला हे त्यांनी सांगितले नाही.

किर्बी म्हणाले की, मृतांपैकी निम्मे हे खाजगी वॅगनर गटाने भरती केलेले सैनिक होते, ज्यात रशियन तुरुंगातील कैद्यांची संख्या सर्वाधिक आहे.

युक्रेनच्या पूर्वेकडील प्रांतातील बाखमुत शहराभोवती अलीकडच्या काही दिवसांत भयंकर लढाई सुरु आहे, जिथे वॅगनर सैन्य आणि इतर सैन्य युक्रेनियन सैन्याशी लढत आहेत. रशियन सैन्याने पश्चिम रस्ता पुन्हा ताब्यात घेण्याचा प्रयत्न केला, जो अजूनही युक्रेनियन सैन्याच्या ताब्यात आहे.

दुसरीकडे, युक्रेनच्या हवाई संरक्षण दलाने सोमवारी पहाटे रशियन सैन्याने प्रक्षेपित केलेल्या 18 पैकी 15 क्षेपणास्त्रे नष्ट केली.

राष्ट्राध्यक्ष वोलोडिमिर झेलेन्स्की यांनी सोमवारी सांगितले की, रशियन क्षेपणास्त्र (Missile) हल्ले पूर्वेकडील पावलोहराड शहरावर रात्रभर सुरुच राहिले, ज्यात दोन लोक ठार आणि 40 जखमी झाले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Dabolim Dubai Flight: दाबोळी-दुबई विमानसेवा पुन्हा सुरू होणार, दररोज एक उड्डाण; मुंबई-गोवा मार्गावरही दिवसाला 8 फेऱ्या

Goa Tourist Death: आठ महिन्यांत गोव्यात 56 पर्यटकांचा मृत्यू! 4 पर्यटकांचे खून; 14 जणांचा बुडून मृत्यू, तर 10 जणांची आत्महत्या

DJ चा आवाज, लग्नाचा जल्लोष अन् अचानक आगीचे भयानक लोट! रिसेप्शन पार्टीत 22 जणांचा होरपळून मृत्यू, थरकाप उडवणारा Watch Video

Goa Politics: '2027 मध्ये 30 आमदार निवडून आणू'; वाढदिवसानिमित्त दामू नाईकांचा निर्धार

College Student Election: विद्यार्थी निवडणुकांत सरकारी हस्तक्षेप? NSUIचा गंभीर आरोप; कुमार गवळी म्हणाले, 'दबाव आणला जातोय'

SCROLL FOR NEXT