North Atlantic Treaty Organization: नॉर्थ अटलांटिक ट्रीटी ऑर्गनायझेशन (NATO) चे सरचिटणीस जेन्स स्टोलटेनबर्ग हे युक्रेन युद्ध सुरु झाल्यानंतर पहिल्यांदाच गुरुवारी अचानक राजधानी कीव मध्ये पोहोचले.
नाटोच्या एका अधिकाऱ्याने गुरुवारी ही माहिती दिली. “नाटोचे सरचिटणीस युक्रेनमध्ये आहेत,” ज्या अधिकाऱ्याने नाव न सांगण्यास सांगितले, त्यांनी एपीला सांगितले.
युद्ध सुरु होण्यापूर्वी स्टोलटेनबर्ग युक्रेनला गेले होते, परंतु युद्धानंतर त्यांची ही पहिलीच भेट आहे. त्यांची भेट युक्रेनच्या स्वातंत्र्याचे रक्षण करण्यासाठी नाटोची दीर्घकालीन वचनबद्धता दर्शवते.
दरम्यान, नाटोचे सरचिटणीस जेन्स स्टोलटेनबर्ग युक्रेनमध्ये आल्याचे वृत्त समजताच रशियाने हल्ले तीव्र केले. रशियन सैन्याने शेवटच्या दिवसांत हल्ले वाढवले.
बुधवारी रशियाने (Russia) युक्रेनमधील ओडेसा येथे ड्रोन हल्ले केले. लोक राहत असलेल्या भागातील एका इमारतीलाही या हल्ल्याचा फटका बसला आहे.
युक्रेनियन हवाई दलाचे अधिकारी जनरल मायकोला ओलेशचुक म्हणतात की, 12 पैकी 10 कामिकाझे ड्रोन हवाई संरक्षणाद्वारे हवेत नष्ट केले गेले.
दुसरीकडे, नाटो सुप्रिमोंचा हा दौरा अशा वेळी होत आहे, जेव्हा युक्रेनचे (Ukraine) सैन्य पुन्हा एकदा रशियन सैन्याला मागे ढकलत आहे.
रशियन सैन्याला हिवाळ्यात, विशेषतः बखमुत शहराच्या आसपासच्या भागात पुढे जाण्यापासून रोखल्यानंतर युक्रेनियन सैन्यांचा विश्वास दुनावला आहेत. 31 सदस्यीय नाटोने युक्रेनला रशियन आक्रमणापासून बचाव करण्यासाठी मदत करण्याचे वचन दिले आहे.
वृत्तानुसार, स्टोलटेनबर्ग यांनी युक्रेनचे अध्यक्ष वोलोडिमिर झेलेन्स्की यांना जुलैमध्ये होणाऱ्या नाटो परिषदेत उपस्थित राहण्याचे आवाहन केले आहे.
युक्रेनने नाटो लष्करी संघटनेत सामील होण्यासाठी विनंती सुरु केली आहे. यामुळे रशिया संतप्त झाला आहे.
जर युक्रेन कसा तरी नाटोचा भाग बनला तर सर्व नाटो देश त्याला उघडपणे मदत करतील. नाटो करारानुसार, एका सदस्य राष्ट्रावर हल्ला हा सर्व सदस्य राष्ट्रांवर हल्ला मानला जातो.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.