Big Inflation in Pakistan Imran Khan government declare package  Dainik Gomantak
ग्लोबल

पाकिस्तानमध्ये महागाईचं मोठं संकट, इम्रान सरकारने जाहीर केलं 120 अब्ज रुपयांचं पॅकेज

पंतप्रधान इम्रान खान यांनी बुधवारी देशासाठी 120अब्ज रुपयांचे अनुदान पॅकेज जाहीर केले आहे .

दैनिक गोमन्तक

पाकिस्तानमध्ये (Pakistan) मोठ्या प्रमाणात महागाईचे संकट वाढत चाललेआहे आणि याच वाढत्या महागाईमुळे (Inflation) देशातील अनेक भागात साखरेचे (Sugar) भाव गगनाला भिडले आहेत. पाकिस्तानातील स्थानिक माध्यमांनी गुरुवारी ही माहिती दिली आहे . कराचीमध्ये (Karachi) जीवनावश्यक वस्तूंच्या घाऊक दरात 25 रुपयांनी वाढ झाली असून, त्यानंतर आता येथे साखर 140 रुपये किलोने मिळत आहे. तर किरकोळ बाजारात त्याची किंमत 145 रुपये प्रति किलो आहे. आणि या महागाईचा चटका मात्र सर्वसामान्यांना बसत आहे. स्थानिक वृत्त संस्थेच्या माहितीनुसार लाहोरमध्ये साखरेची किरकोळ किंमत सध्या 140 रुपये प्रति किलो आहे, तर साखर डीलर्स असोसिएशनने म्हणण्यानुसार मिलर्सनी मालाचा पुरवठा थांबवला आहे. घाऊक बाजारात साखरेची किंमत प्रति किलो 9 रुपयांनी वाढली आहे आणि कालच्या 126 रुपये प्रति किलोच्या तुलनेत 135 रुपये प्रति किलोने विकली जात आहे.(Big Inflation in Pakistan Imran Khan government declare package)

पंतप्रधान इम्रान खान यांनी बुधवारी देशासाठी 120अब्ज रुपयांचे अनुदान पॅकेज जाहीर केले आहे . महागाईने त्रस्त 13 कोटी लोकांना आधार देण्यासाठी इम्रान सरकारने तूप, मैदा आणि डाळींवर 30 टक्के सूट दिली आहे . पंतप्रधांनांनी घोषणा केली की, या पॅकेज अंतर्गत लोकांना तूप, गहू आणि डाळी या तीन वस्तूंवर सहा महिन्यांसाठी 30 टक्के सूट मिळू शकेल.

तर दुसरीकडे पाकिस्तानच्या युटिलिटी स्टोअर्स कॉर्पोरेशनने बुधवारी इम्रान खान यांनी मदत पॅकेज जाहीर केल्यानंतर तूप आणि स्वयंपाकाच्या तेलाच्या किमती वाढवल्या आहेत. या संदर्भात जारी करण्यात आलेल्या अधिसूचनेचा संदर्भ देत सांगण्यात आहे की, विविध ब्रँडच्या स्वयंपाकाच्या तेलात स्टोअर्समध्ये प्रति लिटर 65 रुपयांची वाढ करण्यात आली आहे, तर तुपाच्या किमतीत प्रति किलो 53 रुपयांनी वाढ करण्यात आली आहे. युटिलिटी स्टोअर्सवरील दरवाढ तात्काळ प्रभावाने लागू होईल, असेदेखील अधिसूचनेत म्हटले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Agriculture Ambassador: स्वयंपूर्णतेचा संदेश देणारा वरद ‘कृषिदूत’! गोवा सरकारकडून ॲम्बेसिडर म्हणून निवड; भाजी उत्पादनात प्रगतीचा ध्यास

Goa News Live: मोपा विमानतळावर सॅटेलाईट डिव्हाईस बाळगणाऱ्या रशियन नागरिकाविरोधात एका दिवसात गुन्हा आणि आरोपपत्र दाखल

Colvale Jail: गुन्‍हेगाराला ‘माणूस’ बनवणार! कोलवाळ येथे होणार अर्धमुक्त कारागृह; आराखडा बनविणे सुरू

Omkar Elephant: 'ओंकार हत्ती'वर दिवसरात्र लक्ष, लवकरच रेस्क्यू करण्यात येणार; वन विभागाचे पथक पाळतीवर

NASA Space Challenge: नासा स्पेस चॅलेंज! गोव्यातील 38 संघ सहभागी; ग्लोबल नासा हॅकेथॉन 2025 अंतर्गत पर्वरीत आयोजन

SCROLL FOR NEXT