Crown Prince Mohammed bin Salman of Saudi Arabia Dainik Gomantak
ग्लोबल

Saudi Arabia अन् भारताची गुप्तचर संस्था RAW यांच्यात मोठी डील, पाकिस्तान तणावात

Manish Jadhav

India- Saudi Arabia: एकेकाळी पाकिस्तानचा मित्र असलेला सौदी अरेबिया आता त्याचसाठी अडचणीचा ठरु शकतो.

वास्तविक, भारताची गुप्तचर संस्था रॉ आणि सौदी अरेबिया यांच्यात मोठा करार झाला आहे. या करारामुळे पाकिस्तान प्रचंड तणावात आहे. सौदी अरेबियाने भारताशी असा करार करावा हे पाकिस्तानला मान्य नाही.

पण भारताची वाढती ताकद आणि पाकिस्तानची बिकट परिस्थिती यामुळे मैत्रीचा मार्ग आणि चेहरा बदलला आहे.

त्याचबरोबर, भारतासोबत एवढा मोठा करार करण्यासही तो मागेपुढे पाहत नाही, त्यामुळे पाकिस्तान तणावात आहे.

दरम्यान, संकटकाळात सौदी अरेबिया पाकिस्तानला (Pakistan) मदत करत आहे. पण आता त्याने भारताची गुप्तचर संस्था RAW सोबत मोठा करार केला आहे.

भारताची गुप्तचर संस्था रिसर्च अँड अॅनालिसिस विंग 'RAW' आणि सौदी अरेबिया यांच्यात ऐतिहासिक करार झाला आहे. या करारानंतर RAW ला दहशतवादाविरोधात मोठी मदत मिळणार आहे.

याला महत्त्वाचा विकास म्हणून संबोधले जात आहे. काही दिवसांपूर्वी या कराराला सौदी कॅबिनेटची मंजूरी मिळाली होती. या करारानंतर सौदी अरेबिया दहशतवादाविरुद्धच्या लढाईत आखाती देशांमध्ये भारताचा सर्वात मोठा भागीदार बनेल.

अधिकृत निवेदन प्रसिद्ध केले

सौदी अरेबियाच्या मंत्रिमंडळानेही या कराराला मान्यता दिली आहे. यासोबतच यासंबंधीचे अधिकृत निवेदनही जारी करण्यात आले आहे.

या निवेदनानुसार, भारताच्या (India) RAW सोबतच सौदी अरेबियाची सुरक्षा एजन्सी दहशतवादी घटना आणि दहशतवादाचा निधी रोखण्यासाठी महत्त्वाची भूमिका बजावेल.

या संपूर्ण कराराची माहिती सौदी गॅझेटने अधिकृतपणे दिली आहे. या राजपत्रानुसार, अलीकडेच राजे सलमान यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या देशाच्या मंत्रिमंडळाने या कराराला मंजूरी दिली आहे.

करार मंजूर

राजपत्रात दिलेल्या माहितीनुसार, दहशतवादाचा मुकाबला करण्यासाठी सौदी अरेबियाची मुख्य सुरक्षा एजन्सी आणि भारताची 'रॉ' यांच्यात गुन्हेगारी रोखण्यासाठी आणि त्याला वित्तपुरवठा करण्यासंबंधीच्या सहकार्य कराराला मंजूरी देण्यात आली. या संपूर्ण प्रकरणावर पाकिस्तानचा डोळा होता, मात्र तो गप्प आहे.

दुसरीकडे, पाकिस्तानचे तज्ज्ञ सौदी अरेबिया आणि भारताच्या गुप्तचर संस्थेच्या या कराराला ऐतिहासिक ठरवत आहेत.

या तज्ज्ञांचे म्हणणे आहे की, हा करार पाकिस्तानसाठी मोठा झटका आहे. कारण भारताने नेहमीच दहशतवादी संघटनांबाबत कठोर भूमिका घेतली आहे. काश्मीरमधील दहशतवादासाठी भारत नेहमीच पाकिस्तानला जबाबदार धरतो, असे पाक तज्ज्ञांचे म्हणणे आहे.

अशा परिस्थितीत, भारत आणि सौदी अरेबिया यांच्यातील हा करार अत्यंत महत्त्वाचा असल्याचे पाकिस्तानच्या संरक्षण तज्ज्ञांचे मत आहे.

दहशतवादावर आता सौदी अरेबिया आणि भारत एकाच दिशेने विचार करत असल्याचे यावरुन सिद्ध होते.

पाकिस्तानच्या संरक्षण तज्ञांनी असेही म्हटले आहे की, सौदी अरेबिया आणि भारत यांच्यातील या करारावरुन हे समजू शकते की, आंतरराष्ट्रीय जगात आणि विशेषत: मुस्लिम देशांमध्ये पाकिस्तानचे स्थान नाही.

सौदी अरेबियाने पाकिस्तानकडे लक्ष दिले नाही

पाकिस्तानमधील तज्ज्ञांचे म्हणणे आहे की, 2019 मध्ये भारताने जम्मू-काश्मीरमधून कलम 370 हटवून त्याचा विशेष दर्जा रद्द केला होता.

त्यावेळीही सौदी अरेबियासह मुस्लिम देशांनी पाकिस्तानकडे लक्ष दिले नाही. आता काश्मीरच्या मुद्द्यावर आखाती देशांकडून पाकिस्तानला फारसा पाठिंबा मिळणार नाही, असा त्यांचा विश्वास आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Panaji News: मळ्यातील तळ्याचे सुशोभिकरण कधी? पणजीतील स्थानिकांचा सवाल

Panaji Smart City: पणजी मनपा इमारतीला 'ग्रीन सिग्नल' कधी? दोनदा पायाभरणी; मात्र कामाला सुरुवात नाही

Chimbel Flyover: Saint Francis Xavier अवशेष प्रदर्शनापूर्वी एक मार्ग होणार खुला ; चिंबल उड्डाणपुलाचे काम पूर्णत्वाकडे

Indian Coast Guards: भारतीय तटरक्षक दलाचा जोरदार सराव! गोवा, महाराष्ट्र किनारपट्टीच्या सुरक्षाव्यवस्थेचे सर्वेक्षण

Hina Khan: तिसऱ्या स्टेजच्या कॅन्सरशी लढणाऱ्या हिनाला गोव्यात वृद्ध महिलेकडून मिळाली प्रेरणा; देवाकडे केली प्रार्थना Video

SCROLL FOR NEXT