Saudi Arabia Joins SCO China: चीनचे आणखी एक मोठे यश, सौदी अरेबिया शांघाय कोऑपरेशन ऑर्गनायझेशनमध्ये सामील

Saudi Arabia SCO China: सौदी अरेबियाने शांघाय कोऑपरेशन ऑर्गनायझेशनमध्ये सामील झाल्याचे जाहीर केले आहे.
Mohammed Bin Salman & Xi Jinping
Mohammed Bin Salman & Xi JinpingDainik Gomantak
Published on
Updated on

Saudi Arabia Joins SCO China: सौदी अरेबियाने शांघाय कोऑपरेशन ऑर्गनायझेशनमध्ये सामील झाल्याचे जाहीर केले आहे. सौदी अरेबियाच्या मंत्रिमंडळाने बुधवारी SCO मध्ये सामील होण्यास मान्यता दिली.

अशाप्रकारे, इराणसोबत झालेल्या करारानंतर सौदी अरेबियाने असे आणखी एक पाऊल उचलले आहे, जे चीनसोबतचे संबंध दृढ करणार आहे.

तेही जेव्हा सौदी अरेबियाच्या नव्या धोरणाबाबत अमेरिकेने सुरक्षेचे कारण देत चिंता व्यक्त केली आहे. सौदी अरेबियाने एससीओमध्ये सामील होण्याची घोषणा केली, जेव्हा चीनचे अध्यक्ष शी जिनपिंग यांनी मंगळवारी सौदी राजकुमाराशी वार्तालाप केला.

यापूर्वी, गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये चीनच्या राष्ट्राध्यक्षांनी सौदी राजकुमारांशी एससीओमध्ये सामील होण्याबाबत चर्चा केली होती.

सौदी अरेबियाच्या प्रेस एजन्सीने वृत्त दिले आहे की, सौदी अरेबियाने (Saudi Arabia) SCO मध्ये डायलॉग पार्टनर बनण्यास मान्यता दिली आहे.

Mohammed Bin Salman & Xi Jinping
Saudi Arabia: रमजानमध्ये कुराण जाळल्याने इस्लामिक देश भडकले; सौदी अरेबियाने...

दुसरीकडे, चीन (China) एससीओला नाटोच्या विरोधात उभे करण्याचा प्रयत्न करत आहे, ज्यामध्ये रशिया, इराण, भारत आणि पाकिस्तान देखील आहेत. SCO ची स्थापना 2001 मध्ये रशिया आणि चीनने केली होती. नंतर भारत आणि पाकिस्तानचा त्यात समावेश करण्यात आला.

सौदी अरेबिया आणि चीन यांच्यातील मैत्रीमुळे अमेरिका नाराज आहे

पाश्चात्य देशांचा प्रभाव कमी करण्यासाठी चीन आणि रशियाने SCO ची स्थापना केली. SCO च्या पूर्ण सदस्यत्वासाठी इराणने गेल्या वर्षी डॉक्युमेंटवर स्वाक्षरी केली होती.

डायलॉग पार्टनर हे SCO मध्ये सामील होण्याच्या दिशेने पहिले पाऊल मानले जाते. यानंतर संबंधित देशाला पूर्ण सदस्यत्व दिले जाते.

सौदी अरेबियाची दिग्गज सरकारी तेल कंपनी अरामकोने चीनसोबत अब्जावधी डॉलरच्या गुंतवणुकीचा करार केल्यानंतर SCO मध्ये सामील होण्याची घोषणा करण्यात आली आहे.

Mohammed Bin Salman & Xi Jinping
Saudi Arabia: सौदी राजपुत्राच्या भावाची पाश्चात्य देशांना धमकी, 'आम्ही जिहादसाठी बनलोय...'

तसेच, सौदी कंपनी चिनी कंपनीतील हिस्सा खरेदी करणार आहे. सौदी अरेबिया आणि चीन यांच्यातील वाढत्या संबंधांमुळे अमेरिकेची चांगलीच गोची होत आहे.

चीन जगात प्रभाव निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहे, पण यामुळे मध्यपूर्वेतील आमच्या धोरणात बदल होणार नाही, असे अमेरिकेने म्हटले आहे.

सौदी अरेबिया आणि इतर आखाती देशांनी पश्चिम आशियातील सुरक्षा हमीदार मानल्या जाणाऱ्या अमेरिकेबद्दल चिंता व्यक्त केली आहे.

सौदी अरेबिया आपल्या संबंधांमध्ये विविधता आणत असून भारत आणि चीनसोबतचे संबंध मजबूत करत आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com