China Chemical plant Dainik Gomantak
ग्लोबल

चीनच्या केमिकल प्लांटमध्ये मोठा स्फोट, 4 ठार तर 3 जण जखमी

अपघाताच्या कारणाचा शोध घेण्यासाठी प्रादेशिक सरकारने (Territorial Government) एक पथक तयार केले आहे.

दैनिक गोमन्तक

चीनमधील (China) केमिकल प्लांटमध्ये (Chemical plant) झालेल्या स्फोटात चार जणांचा मृत्यू झाला असून तीन जण जखमी झाले आहेत. स्थानिक अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, उत्तर चीनमधील इनर मंगोलिया स्वायत्त प्रदेशात शुक्रवारी रात्री उशिरा ही घटना घडली. अल्क्सा लीग (प्रीफेक्चर) मधील बयान ओबो इंडस्ट्रियल पार्कमधील एका केमिकल प्लांटच्या वर्कशॉपमध्ये रात्री 11:00 च्या सुमारास स्फोट झाला. स्फोटामुळे लागलेली आग शनिवारी पहाटे आटोक्यात आली. मात्र हा स्फोट कसा झाला हे मात्र समजू शकलेले नाही. अपघाताच्या कारणाचा शोध घेण्यासाठी प्रादेशिक सरकारने एक पथक तयार केले आहे.

नुकतेच चीनमधील शेनयांग शहरात (Shenyang City) असलेल्या एका रेस्टॉरंटमध्ये गॅस गळतीमुळे स्फोट झाला होता. साउथ चायना मॉर्निंग पोस्टनुसार, या अपघातात एकाचा मृत्यू झाला असून 33 जण जखमी झाले आहेत. मात्र ही गॅस गळती कशी झाली हे स्पष्ट होऊ शकलेले नाही. येथे बचाव कार्यही करण्यात आले. सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये स्फोटानंतर लोक इकडे-तिकडे धावत आहेत. आजूबाजूला इमारतींचे ढिगारे पसरले होते अन् गोंधळाचे वातावरणही होते.

रशियातील शेवटच्या केमिकल प्लांटमध्येही स्फोट झाला

याशिवाय रशियातील एका रासायनिक कारखान्यात स्फोट झाल्याने 16 जणांचा मृत्यू झाला. टास या वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार, पश्चिम रियाझान प्रांतातील (Ryazan province) केमिकल प्लांटमध्ये हा स्फोट झाला. मात्र, आपत्कालीन परिस्थिती मंत्रालयाने या अपघातात 12 जणांच्या मृत्यूची पुष्टी करताना चार लोक बेपत्ता असल्याचे सांगितले. तांत्रिक प्रक्रियेचे पालन न केल्यामुळे हा अपघात झाल्याचे TASS ने आपल्या सूत्रांच्या हवाल्याने सांगितले. या स्फोटादरम्यान लागलेली आग विझवण्यासाठी अग्निशमन दलाच्या गाड्याही पोहोचल्या आहेत. बचावकार्य सुरूच आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Android युजर्ससाठी खूशखबर! WhatsApp चा लूक पूर्णपणे बदलणार; आता तुमच्या फोनमध्येही दिसणार iPhone सारखा स्टायलिश 'फ्लोटिंग बार'!

Goa Postmen: गोव्यातील पोस्टमन 'आऊटसाईडर', 15 वर्षांपासून रोजंदारीवर; कायमस्वरूपी नोकरीसाठी आमदार आमोणकरांना साकडे

Pakistan Minister Video: ''अशी परत जाऊ नकोस''! पाकिस्तानी मंत्र्याचा महिला पत्रकाराची खिल्ली उडवणारा व्हिडिओ व्हायरल; यूजर्सनी घेतलं फैलावर

VIDEO: 'मुंबईचा राजा रोहित शर्मा...' मैदानात चाहत्यांची जोरदार घोषणाबाजी; हिटमॅनची 'ती' खास रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद, व्हिडिओ व्हायरल!

आखाड्यात अनियमित पाणीपुरवठ्याने नागरिक त्रस्त, महिलांची पाण्यासाठी धावपळ; विहिरींचे पाणीही पिण्यायोग्य नसल्यानं नाराजी

SCROLL FOR NEXT