US-China Conflict Dainik Gomantak
ग्लोबल

US-China: बायडन यांचा बीजिंग दौरा व्यर्थ, 5 कंपन्यांवर बंदी घालत चीनचा अमेरिकेला 'दे धक्का'

China Baned US Comapanies: अमेरिकेच्या कृतींमुळे चीनच्या सार्वभौमत्वाला आणि सुरक्षेला हानी पोहोचली आहे, तैवान सामुद्रधुनीतील शांतता आणि स्थिरता बिघडली आहे आणि चीनी कंपन्या आणि नागरिकांच्या हक्कांचे आणि हितांचे उल्लंघन झाले आहे.

Ashutosh Masgaunde

Biden's Beijing visit in vain, China 'shocks' America by banning 5 companies:

चीनसोबतचे संबंध सुधारण्यासाठी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांची नोव्हेंबर २०२३ मध्ये बीजिंगला दिलेली भेट आता अपयशी ठरताना दिसत आहे. मात्र, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन आणि चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांच्यातील तत्कालीन चार तासांची चर्चा अत्यंत सकारात्मक असल्याचे सांगण्यात आले आणि हे दोन्ही देशांमधील संबंधांमधील कटुता दूर करण्यासाठी उचललेले पाऊल असल्याचे सांगण्यात आले होते.

मात्र आता चीनने आपले डावपेच बदलले आहेत. बायडन यांच्या बीजिंग दौऱ्यानंतर सुमारे दोन महिन्यांनी चीनने 5 अमेरिकन कंपन्यांवर निर्बंध लादून व्हाईट हाऊसला मोठा धक्का दिला आहे. त्यामुळे दोन्ही देश पुन्हा एकदा आमनेसामने आले आहेत.

खरं तर, तैवानला शस्त्रास्त्रे विकल्याबद्दल आणि चिनी कंपन्या आणि नागरिकांवर निर्बंध लादल्याबद्दल चीनने रविवारी अमेरिकेच्या पाच संरक्षण कंपन्यांवर बंदी घातली.

परराष्ट्र मंत्रालयाने ऑनलाइन प्रसिद्ध केलेल्या निवेदनात म्हटले आहे की, या निर्बंधांमुळे चीनमधील या कंपन्यांची मालमत्ता गोठवली जाईल आणि चीनमधील संस्था आणि लोकांना त्यांच्यासोबत व्यवसाय करण्यास मनाई केली जाईल. बंदी घातलेल्या कंपन्यांमध्ये BAE सिस्टम्स लँड अँड आर्मामेंट, अलायंट टेकसिस्टम ऑपरेशन्स, एरो व्हायरनमेंट वायसॅट आणि डेटा लिंक सोल्युशन्स यांचा समावेश आहे.

अमेरिकन कंपन्यांवर निर्बंध लादल्यानंतर, चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाने म्हटले आहे की, अमेरिकेच्या कृतींमुळे चीनच्या सार्वभौमत्वाला आणि सुरक्षेला हानी पोहोचली आहे, तैवान सामुद्रधुनीतील शांतता आणि स्थिरता बिघडली आहे आणि चीनी कंपन्या आणि नागरिकांच्या हक्कांचे आणि हितांचे उल्लंघन झाले आहे.

मंत्रालयाने एका निवेदनात म्हटले आहे की, "राष्ट्रीय सार्वभौमत्व, सुरक्षा आणि प्रादेशिक अखंडतेचे रक्षण करण्यासाठी आणि चिनी कंपन्या आणि नागरिकांच्या कायदेशीर अधिकारांचे आणि हितांचे रक्षण करण्याच्या आमच्या निर्धारावर चीन सरकार स्थिर आहे." तैवानला स्वतःचा भाग मानते. त्यामुळे चीनने हे पाऊल उचलले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Congo Landslide: 'कांगो'मध्ये निसर्गाचा महाप्रलय! मुसळधार पावसानं डोंगराचा कडा कोसळून 200 जणांचा मृत्यू; मृतांमध्ये मुलांचाही समावेश VIDEO

Goa Elections 2027: प्लॅनिंग तयार, आता मैदानात उतरा! भाजप अध्यक्षांनी कार्यकर्त्यांना दिला 2027 च्या विजयाचा 'महामंत्र'; विधासभा निवडणुकीचं फुंकलं रणशिंग

Goa Politics: नितीन नवीन भाजपचे 'बिग बॉस', मुख्यमंत्री सांवतांकडून कौतुकाचा वर्षाव; आगामी निवडणुका जिंकण्याचा केला निर्धार

Goa Accident: झोप ठरली जीवघेणी...! ट्रक खाली झोपलेल्या अज्ञात व्यक्तीचा चिरडून मृत्यू; करासवाडा येथील घटनेनं हादरला गोवा

Seaweed Forests: गोव्याच्या किनाऱ्यावर 'समुद्री शेवाळाची जंगले' आहेत, ही जाणीव लोकांमध्ये निर्माण व्हायला हवी..

SCROLL FOR NEXT