Israel Benjamin Netanyahu  Dainik Gomantak
ग्लोबल

Benjamin Netanyahu: ‘’मारेकऱ्यांना गोल्ड मेडल देण्यात आलं’’, पॅलेस्टाईनला मान्यता दिल्याने नेतन्याहू संतापले; दिला कारवाईचा इशारा

Israel Hamas War: नॉर्वे, स्पेन आणि आयर्लंडने पॅलेस्टाईनला औपचारिक मान्यता दिल्यानंतर इस्त्रायलचा तिळपापड झाला.

Manish Jadhav

Benjamin Netanyahu: इस्त्रायल आणि हमास यांच्यात सुरु असलेलं युद्ध थांबण्याचं नाव घेत नाहीये. यातच नॉर्वे, स्पेन आणि आयर्लंडने पॅलेस्टाईनला औपचारिक मान्यता दिल्यानंतर इस्त्रायलचा तिळपापड झाला. इस्त्रायल या निर्णयाविरुद्ध आपला निषेध नोंदवत आहे. तिन्ही देशांच्या या पावलाने इस्रायलमध्ये तीव्र नाराजी पसरली आहे. पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांनी या निर्णयावर जोरदार टीका केली. एवढ्यावरच न थांबता त्यांनी या तिन्ही देशांतील आपल्या राजदूतांना परत बोलावले. हत्यांराना गोल्ड मेडल देण्यासारखे आहे, असा टोलाही त्यांनी लगावला. ते म्हणाले की, ‘हे पाऊल इस्रायलमध्ये 7 ऑक्टोबर रोजी झालेल्या भीषण हत्याकांडाचे समर्थन करते. मात्र, हे आम्हाला थांबवणार नाही. हा निर्णय मागे न घेतल्यास त्या देशांविरुद्धही आम्ही अशीच पावले उचलू.’

दरम्यान, स्पेन, आयर्लंड आणि नॉर्वेने पॅलेस्टाईनला (Palestine) देश म्हणून मान्यता देणे म्हणजे दहशतवादाला बक्षीस देण्यासारखे आहे, असेही पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू म्हणाले. नेतन्याहू म्हणाले की, ‘’दहशतवाद पसरवणाऱ्या कोणत्याही देशाला अशा प्रकारे प्रोत्साहन दिले जाऊ नये. हे पाऊल 7 ऑक्टोबर रोजी आपल्या देशात घडलेल्या हत्याकांडाला प्रोत्साहन देण्यासारखे आहे. दहशतवादाला बक्षीस मिळू शकत नाही. तसेच, हे पाऊल आम्हाला हमासवर हल्ले करण्यापासून रोख शकणार नाही.’’

इस्रायली कारवाई

स्पेन, नॉर्वे आणि आयर्लंडने पॅलेस्टाईनला मान्यता दिल्याने इस्रायल इतका संतप्त झाला की त्याने या तिन्ही देशांतील राजदूतांना तात्काळ मायदेशी बोलावले. इस्रायलचे सार्वभौमत्व धोक्यात आणणाऱ्या आणि त्याच्या सुरक्षेत हस्तक्षेप करणाऱ्या कोणावरही इस्रायल कठोर कारवाई करेल, असा स्पष्ट संदेश मी आज देत आहे, असे इस्रायलचे परराष्ट्र मंत्री कॅट्झ म्हणाले.

हमास आणि इराणला पुरस्कृत

"आयर्लंड आणि नॉर्वेने पॅलेस्टाईनला मान्यता देण्याचा निर्णय घेऊन हमास आणि इराणला (Iran) पुरस्कृत करणे निवडले आहे," असेही कॅटझ म्हणाले. दहशतवादाला प्रोत्साहन दिल्याचा संदेश संपूर्ण जगात गेला असल्याचे देखील ते म्हणाले. हमास या दहशतवादी संघटनेने ज्यूंचे सर्वात मोठे हत्याकांड आणि जगात सर्वाधिक लैंगिक गुन्हे केले आहेत. इस्रायल गप्प बसणार नाही. त्याला आणखी गंभीर परिणामांना सामोरे जावे लागेल. जर स्पेनने पॅलेस्टाईनला मान्यता देण्याच्या आपल्या मनसुब्यावर कायम राहिल्यास त्याच्याविरुद्धही योग्य ते पाऊल उचलले जाईल, असा इशाराही त्यांनी दिला.

इस्रायलने पॅलेस्टाईनला फक्त वेदना दिल्या

दुसरीकडे, पॅलेस्टाईनला मान्यता देण्याच्या निर्णयाचे समर्थन करत नॉर्वे, स्पेन आणि आयर्लंड यांनी पुढील आठवड्यापर्यंत पॅलेस्टाईनला राष्ट्र म्हणून औपचारिक मान्यता द्यावी, असे सांगितले. नॉर्वेनेही तारीख जाहीर केली. पंतप्रधान जोनास गार स्टोरर म्हणाले की, पॅलेस्टाईनला 28 मे रोजी देश म्हणून मान्यता दिली जाईल. स्पेनचे पंतप्रधान पेड्रो सांचेझ यांनीही म्हटले आहे की, नेतन्याहू टू स्टेट सोल्यूशनच्या समाधानासाठी अडथळा निर्माण करतायेत. पॅलेस्टाईनबाबत इस्रायलच्या धोरणाला त्यांनी ‘विनाशाचे धोरण’ म्हटले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

स्थानिक टॅक्सी युनियनची दादागिरी; बीच भागात येणाऱ्या टॅक्सी चालकांवर हल्ला, गाडीची तोडफोड, असोसिएशनकडून तक्रार

Goa Today's Live News: सांगेत बिरसा मुंडा रॅलीला उत्स्फूर्त प्रतिसाद!

गोकुळची ‘ती’ फुगडी स्पर्धा ठरली अखेरची! एकुलता एक मुलगा, अर्धांगवायू झालेला पती; कमावत्या महिलेचा Heart Attack ने मृत्यू

Goa Medical College: विद्यार्थ्यांनो लक्ष द्या; ही संधी गमावू नका!! 'गोमेकॉ' ने केलीये फिजिओथेरपीच्या जागांमध्ये लक्षणीय वाढ

Sao Jose De Areal Gramsabha: औद्योगिक कचऱ्याच्या प्रदूषणामुळे कारखान्यांवर कडक कारवाईची मागणी

SCROLL FOR NEXT