Israel-Hamas War: बेंजामिन यांची दडपशाही! अल-जझीराच्या कार्यालयांना टाळं ठोकण्याची घोषणा; हमाससाठी काम केल्याचा आरोप

Al Jazeera Offices Closure: गाझावरील सततच्या हल्ल्यांदरम्यान इस्रायलकडून एक महत्त्वाची घोषणा करण्यात आली आहे.
Israel PM Benjamin Netanyahu
Israel PM Benjamin Netanyahu Dainik Gomantak

Al Jazeera Offices Closure: गाझावरील सततच्या हल्ल्यांदरम्यान इस्रायलकडून एक महत्त्वाची घोषणा करण्यात आली आहे. इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांनी रविवारी जाहीर केले की, त्यांच्या सरकारने अल-जझीरा न्यूजची कार्यालये बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. इस्रायल सरकारने मतदानाद्वारे हा निर्णय घेतला. अल-जझीरा वृत्तवाहिनी कतारी ब्रॉडकास्टरद्वारे चालवली जाते. तथापि, नेतन्याहू यांनी वृत्तवाहिनीची कार्यालये कायमस्वरुपी बंद केली जात आहेत की ती मर्यादित कालावधीसाठी बंद असतील याची माहिती दिली नाही.

दरम्यान, बेंजामिन नेतन्याहू (Benjamin Netanyahu) यांनी ट्विटरद्वारे या निर्णयाची माहिती दिली. त्यांनी ट्विटमध्ये म्हटले की, त्यांच्या सरकारने कतारच्या मालकीचे ब्रॉडकास्टर अल जझीराचे देशातील कार्यालये बंद करण्यासाठी एकमताने मतदान केले आहे.

Israel PM Benjamin Netanyahu
Israel-Hamas War: ‘’तु माझ्याशी लग्न कर आणि...’’; 18 वर्षीय इस्त्रायली तरुणीला हमासच्या दहशतवाद्याने दिली होती प्रेमाची कबुली

इस्रायलचे (Israel) मंत्री श्लोमो करही यांनी दिलेल्या माहितीनुसार, या आदेशावर त्वरित अंमलबजावणीसाठी स्वाक्षरी करण्यात आली आहे. आमचे आदेश तात्काळ लागू होतील. अल जझीरावर कारवाई करण्यासाठी कायदेशीर अडथळ्यांवर मात करण्यासाठी बराच वेळ घालवला गेला आहे. ते पुढे म्हणाले की, ‘’अल जझीरा हे युद्ध भडकावण्याचे तंत्र बनले आहे. याला आळा घालण्यासाठी सर्व अडथळे तातडीने दूर करण्यात आले आहेत.’’

Israel PM Benjamin Netanyahu
Israel Hamas War: इस्त्रायली लष्करानं ओलांडली क्रूरतेची सीमा; अमेरिका म्हणाला, ''युद्धापूर्वीही IDFने दाखवली बर्बरता''

वास्तविक, इस्रायलने अल-जझीरावर पक्षपाती वार्तांकन केल्याचा आरोप केला आहे. वृत्तवाहिनी आणि नेतन्याहू सरकारमधील संबंध फार पूर्वीपासून ताणले गेले आहेत. इस्त्रायल-हमास युद्धादरम्यान अल-जझीराने गाझामधील भीषण परिस्थिती वार्तांकन केले. एवढ्यावरच न थांबता अल जझीराने इस्रायलवर गाझावासीयांवर अत्याचार केल्याचा आरोप करुन हवाई हल्ले आणि रुग्णालयांचे ग्राफिक फोटो प्रसारित केले. तर दुसरीकडे, इस्रायलने अल जझीरावर हमाससाठी काम करत आरोप केला. अल जझीराचे मुख्यालय दोहा आहे. कतारी सरकार यासाठी निधी देते.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com