Bangladesh truck accident kills 15 workers Dainik Gomantak
ग्लोबल

Bangladesh Road Accident: ईदच्या आनंदावर काळाचा घाला! बांगलादेशात प्रवाशांनी भरलेला ट्रक उलटून 15 मजुरांचा मृत्यू; पहाटे घडला थरारक अपघात

Bangladesh Road Accident 15 Dead: ईदच्या आनंदाला काही क्षणांतच दुःखाचे ग्रहण लागल्याची एक धक्कादायक घटना बांगलादेशातून समोर आली.

Manish Jadhav

Bangladesh Road Accident 15 Dead: ईदच्या आनंदाला काही क्षणांतच दुःखाचे ग्रहण लागल्याची एक धक्कादायक घटना बांगलादेशातून समोर आली. मध्य बांगलादेशातील एका प्रमुख महामार्गावर प्रवाशांनी भरलेला एक ट्रक उलटल्याने 15 जणांचा जागीच मृत्यू झाला, तर 10 हून अधिक जण गंभीर जखमी झाले. हा भीषण अपघात सोमवारी पहाटे 5 वाजण्याच्या सुमारास ढाका येथून साधारण 83 किलोमीटर अंतरावर असलेल्या टांगेल जिल्ह्यातील सोराटोईल भागात घडला.

ट्रक चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्यामुळे हा थरारक अपघात झाल्याचे पोलिसांनी सांगितले. या अपघातातील बहुतांश मृत हे हातावर पोट असणारे रोजंदारी मजूर होते, जे सण साजरा करण्यासाठी आपल्या कुटुंबाकडे निघाले होते.

स्थानिक पोलीस प्रमुख फुआद हुसैन यांनी दिलेल्या माहितीनुसार, हा ट्रक लोखंडी सळया घेऊन ढाका येथून उत्तर भागाकडे जात होता. आगामी 'ईद अल-अदहा' या सणाच्या पार्श्वभूमीवर गुरुवारपासून सुट्ट्या सुरु होत असल्याने गावी जाणाऱ्या मजुरांनी या ट्रकमध्ये लिफ्ट घेतली होती. ट्रकमध्ये सळ्यांच्या वर हे सर्व प्रवासी बसले होते. पहाटेच्या वेळी अचानक चालकाचे नियंत्रण सुटले आणि ट्रक महामार्गावरच उलटला. लोखंडी सळ्यांखाली चिरडले गेल्यामुळे 15 प्रवाशांचा घटनास्थळीच मृत्यू झाला.

हा अपघात (Accident) इतका भीषण होता की, आजूबाजूच्या परिसरातील नागरिक मोठ्या आवाजाने जागे झाले. प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार, घटनास्थळावरुन येणारे किंचाळण्याचे आणि मदतीसाठीचे आवाज ऐकून त्यांनी तातडीने तिथे धाव घेतली आणि ट्रकमध्ये अडकलेल्या प्रवाशांना बाहेर काढण्याचे काम सुरु केले.

अपघाताची माहिती मिळताच पोलीस आणि प्रशासनाने घटनास्थळी धाव घेतली. जखमी झालेल्या 10 प्रवाशांना तातडीने जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. मजुरांच्या अचानक जाण्याने त्यांच्या मागे असणाऱ्या कुटुंबांवर दुःखाचा डोंगर कोसळला. बांगलादेशात (Bangladesh) अशा प्रकारच्या रस्ते अपघातांची मालिका नवीन नाही. खराब रस्ते, वाहतूक नियमांची योग्य प्रकारे न होणारी अंमलबजावणी आणि अननुभवी किंवा अप्रशिक्षित वाहनचालक यांमुळे 17 कोटींहून अधिक लोकसंख्या असलेल्या या देशात दरवर्षी रस्ते अपघातांमध्ये हजारो निष्पाप लोकांना आपले प्राण गमवावे लागतात, अशी खंतही यावेळी व्यक्त करण्यात आली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Lucky Zodiac Signs 2026: व्यापाऱ्यांसाठी जॅकपॉट अन् नोकरदारांना पगारवाढ! ऑगस्ट महिन्यात 'या' राशीची चांदीच चांदी; पैशांची चिंता कायमची मिटणार

Government Jobs: कर्मचारी भरती आयोगाकडून 3 हजार नोकऱ्या; आता आणखी 2 हजार पदांसाठी सरकार सज्ज, CM प्रमोद सावंतांची मोठी घोषणा

Bori Road Safety Issue: बोरीतील धोकादायक साकवाकडे प्रशासनाचे दुर्लक्ष? कठडा तुटल्याने वाहनचालकांच्या जीवाला धोका, तातडीने दुरुस्तीची गरज

Garuda Lenka: राजासाठी जीव देण्याची शपथ, मृत्यूची बातमी मिळताच आत्मबलिदान; होयसळ साम्राज्याच्या ‘गरुड लेंका’ योद्ध्यांची रोमांचकारी गाथा

Viral News: आश्चर्य..! दोन तोंड अन् आठ पायांच्या वासराचा जन्म; तब्बल 5 तास चालली प्रसूतीची शस्त्रक्रिया Watch Video

SCROLL FOR NEXT