Bangkok School Shooting Video Dainik Gomantak
ग्लोबल

Bangkok School Shooting: शाळेत अंदाधुंद गोळीबार; विद्यार्थ्यानं शिक्षकाची हत्या करून स्वतःवरही झाडली गोळी, 15 विद्यार्थी जखमी VIDEO

Bangkok School Shooting Video: थायलंडची राजधानी बँकॉकजवळील नॉनथाबुरी प्रांतातील एका शाळेत झालेल्या भीषण गोळीबाराच्या घटनेने संपूर्ण देश हादरला आहे.

Sameer Amunekar

थायलंडची राजधानी बँकॉकजवळील नॉनथाबुरी प्रांतातील एका शाळेत झालेल्या भीषण गोळीबाराच्या घटनेने संपूर्ण देश हादरला आहे. एका अल्पवयीन विद्यार्थ्याने शाळेच्या परिसरात शिक्षकावर गोळीबार करून त्यांचा मृत्यू घडवून आणला. त्यानंतर त्याने स्वतःवरही गोळी झाडून जीवन संपवले. या हल्ल्यात किमान 15 विद्यार्थी जखमी झाले असून त्यांच्यावर विविध रुग्णालयांत उपचार सुरू आहेत. घटनेनंतर परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून मोठ्या प्रमाणावर पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.

शिक्षकावर हल्ल्यानंतर विद्यार्थ्याची आत्महत्या

प्राथमिक माहितीनुसार, ही घटना नॉनथाबुरी येथील एका प्रसिद्ध शाळेत घडली. संशयित विद्यार्थी 19 वर्षांखालील असल्याचे सांगितले जात आहे. त्याने अचानक शिक्षकावर गोळीबार केला. शिक्षकाचा घटनास्थळीच मृत्यू झाला. त्यानंतर विद्यार्थ्याने स्वतःवर गोळी झाडली. शाळेतील विद्यार्थ्यांमध्ये आणि कर्मचाऱ्यांमध्ये या घटनेनंतर एकच गोंधळ उडाला.

गोळीबाराच्या वेळी शाळेत मोठ्या संख्येने विद्यार्थी उपस्थित होते. जीव वाचवण्यासाठी अनेकांनी वर्गखोल्या आणि सुरक्षित ठिकाणी धाव घेतली. पोलिस आणि आपत्कालीन पथकांनी तातडीने घटनास्थळी पोहोचून परिस्थिती नियंत्रणात आणली.

15 विद्यार्थी जखमी, तपास सुरू

या घटनेत जखमी झालेल्या 15 विद्यार्थ्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यांपैकी काहींची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती स्थानिक माध्यमांनी दिली आहे. पोलिसांनी संपूर्ण परिसर सील करून हल्ल्यामागील कारणांचा तपास सुरू केला आहे. विद्यार्थ्याने हे टोकाचे पाऊल का उचलले, याचा शोध तपास यंत्रणा घेत आहेत.

शाळांतील हिंसाचाराची चिंता

गेल्या काही वर्षांत थायलंडमध्ये शस्त्रांच्या वाढत्या वापराबाबत गंभीर चिंता व्यक्त केली जात आहे. देशात मोठ्या प्रमाणावर खासगी बंदुका असल्याचे मानले जाते. त्यामुळे अशा प्रकारच्या हिंसक घटना वेळोवेळी समोर येत आहेत.

2022 मध्येही उत्तर थायलंडमधील एका बालसंगोपन केंद्रात माजी पोलिस कर्मचाऱ्याने गोळीबार आणि चाकू हल्ला करत अनेक निरपराध मुलांसह प्रौढांची हत्या केली होती. त्यानंतर शस्त्रास्त्र नियंत्रणाचे कायदे अधिक कठोर करण्याची मागणी झाली होती. मात्र, ताज्या घटनेमुळे शाळांमधील सुरक्षा व्यवस्था आणि बंदूक नियंत्रणाच्या धोरणांवर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Health Horoscope: साप्ताहिक आरोग्य राशीभविष्य 21 ते 27 सप्टेंबर 2026; 'या' 3 राशींची प्रकृती राहील ठणठणीत, तर काहींना तणाव आणि थकवा सतावण्याची शक्यता

Mahindra Thar 3-Door Facelift: ऑफ-रोडिंगचा दम कायम, पण लूक मॉडर्न! थार येतेय नव्या अवतारात! Roxxची झलक पाहायला मिळणार

Foreign Woman Viral Video: फोटो काढत होती परदेशी महिला, अचानक लोकांनी घेरलं; पुढे जे घडलं ते कॅमेऱ्यात कैद, पाहा व्हिडिओ

क्रिकेट चाहत्यांसाठी मोठी बातमी! Asian Games 2026 मध्ये IND vs PAK महामुकाबला होणार नाही; भारताची श्रीलंकेशी फायनलमध्ये लढत

Low BPची समस्या वारंवार होतेय? चक्कर, थकवा अन् मळमळकडे दुर्लक्ष करू नका; जाणून घ्या लक्षणे आणि उपाय

SCROLL FOR NEXT