Goa Student Safety: शाळांजवळील अमलीपदार्थ विक्रेत्यांवर कडक कारवाई करा! आवदा व्हिएगस यांचे CM प्रमोद सावंतांना निवेदन

Goa student Drug Abuse: राज्यातील अमली पदार्थांच्या आहारी गेलेल्या मुलांसाठी स्वतंत्र पुनर्वसन केंद्र उभारण्याची मागणी करण्यात आली आहे.
Goa student Drug Abuse
Goa Student SafetyDainik Gomantak
Published on: 
Updated on: 

मडगाव: राज्यातील विद्यार्थ्यांमध्ये वाढते अमली पदार्थांचे व्यसन, अश्लील इंटरनेट सामग्रीचा वाढता वापर आणि शाळांजवळील संशयास्पद हालचाली याबाबत गंभीर चिंता व्यक्त करत बायलांचो एकवोटचे अध्यक्ष आवदा व्हिएगस यांनी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांना निवेदन सादर केले आहे. त्यामध्ये संबंधितांवर कडक कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे.

या निवेदनात राज्यातील अमली पदार्थांच्या आहारी गेलेल्या मुलांसाठी स्वतंत्र पुनर्वसन केंद्र उभारण्याची मागणी करण्यात आली आहे. अलीकडील कारवायांमधून राज्यात अमली पदार्थांचा अवैध व्यापार सुरू असल्याचे स्पष्ट होत असून, काही ठिकाणी अल्पवयीन मुलांचाही या साखळीत वापर होत असल्याची चिंता व्यक्त केली आहे.

Goa student Drug Abuse
Goa Drug Network Colvale Central Jail: कोलवाळ कारागृह बनले ड्रग्ज रॅकेटचे कंट्रोल रूम; आंतरराज्य जाळे, 43 लाखांचा ड्रग्ज साठा जप्त, 5 जण अटकेत

कोलवा पोलिसांनी इन्स्टाग्रामवरील कथित बाल लैंगिक अत्याचाराशी संबंधित सामग्री प्रकरणात केलेल्या अटकेचा उल्लेख करत, विद्यार्थ्यांमध्ये मोबाईल व इंटरनेटच्या अनियंत्रित वापरामुळे अश्लील सामग्री पाहण्याचे प्रकार वाढल्याने निवेदनात नमूद केले आहे.

विद्यार्थ्यांच्या मोबाईलमध्ये केवळ शैक्षणिक ॲप्सच ठेवण्याची व्यवस्था करावी, शाळांच्या परिसरात अमली पदार्थ विक्रेत्यांवर नियमित देखरेख ठेवावी, तसेच शाळांतील सीसीटीव्ही यंत्रणेची वेळोवेळी तपासणी करण्याचे निर्देश मुख्याध्यापकांना देण्यात यावेत, अशीही मागणी निवेदनात करण्यात आली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

Goa Politics
Goa Drug Case
Curchorem Drug Capital Goa
Goa Drug Trafficking
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com