

काणकोण: मडगाव - कारवार हमरस्त्यावर पाडी येथे वळणावर मोठ्या प्रमाणात ऑईल सांडल्याने रस्ता निसरडा झाला असून प्रवासी बससह चारचाकी, दुचाकी वाहने अपघातग्रस्त झाली आहेत.
त्यामुळे या हमरस्त्यावरून जाणाऱ्या वाहनचालकांना सावधगिरी बाळगण्याचा इशारा देण्यात आला आहे. गुरुवारी संध्याकाळी एका टँकरला गळती लागून या हमरस्त्यावर ऑईल सांडली. काही वेळातच तेथे आलेली प्रवासी बस त्या ऑईलवरून घसरल्यामुळे बसने चार पाच वाहनांना धडक दिली.
त्यामुळे ती अपघातग्रस्त झाली आहेत. या दुर्घटनेनंतर काहीवेळ हमरस्त्यावरील वाहतूक ठप्प झाली होती. दरम्यान कुंकळ्ळी अग्निशमन दलाचे कर्मचारी संध्याकाळी उशीरापर्यंत ही ऑईल धुवून काढण्याच्या कामात गुंतले होते.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.