Missing Titan Sub Missing Titan Sub
ग्लोबल

Titan Submarine: गूढ आवाजाने हालचाली वाढल्या; बेपत्ता झालेल्या पाणबुडीबाबत मोठी अपडेट

Missing Titan Sub: परिणामी, आवाजाचे कारण शोधण्याच्या प्रयत्नात आरओव्ही (रिमोटली ऑपरेटेड व्हेईकल) ऑपरेशन्सचे स्थान बदलण्यात आले.

Ashutosh Masgaunde

Missing Titan Sub:

यूएस कोस्ट गार्डने बुधवारी पहाटे सांगितले की, बेपत्ता झालेल्या टायटॅनिक पाणबुडीचा शोध घेत असलेल्या बचाव पथकांना शोध क्षेत्रात "पाण्याखालील आवाज" मोठा आवाज ऐकू आला. "कॅनेडियन P-3 विमानाला शोध क्षेत्रात पाण्याखालून मोठा आवाज ऐकू आला. परिणामी, आवाजाचे कारण शोधण्याच्या प्रयत्नात आरओव्ही (रिमोटली ऑपरेटेड व्हेईकल) ऑपरेशन्सचे स्थान बदलण्यात आले," असे यूएस कोस्ट गार्डच्या फर्स्ट डिस्ट्रिक्टने आपल्या अधिकृत ट्विटरवर म्हटले आहे.

आशा कायम

बेपत्ता झालेल्या टायटन पाणबुडीचा शोध सुरू असताना पाण्याखाली मोठा आवाज ऐकू आला, ज्यामुळे क्रू सदस्य मदतीसाठी संकेत देत असतील अशी नवीन आशा निर्माण झाली. शोधकर्त्यांनी सांगितले की त्यांनी पाणबुडी शोधत असताना 30-मिनिटांच्या अंतराने मोठा आवाज ऐकला.

डिपार्टमेंट ऑफ होमलँड सिक्युरिटी लीडरशिपने रलिंग स्टोनला पाठवलेल्या अंतर्गत ई-मेलमध्ये आवाजाबाबत सविस्तर तपशील आहेत. यानंतर RCC Halifax ने P8, Poseidon लाँच केले, ज्यात हवेतून पाण्याखालील आवाज शोधण्याची क्षमता आहे.

यावेळी P8 ने सुद्धा सोनोबुय्स तैनात केले, ज्याने 30 मिनिटांच्या अंतराने परिसरात धमाकेदार आवाज ऐकले. चार तासांनंतर अतिरिक्त सोनार तैनात करण्यात आले आणि त्यावेळी अजूनही जोरदार आवाज ऐकू येत होता.

टायटॅनिकच्या अवशेषाच्या ठिकाणी जाण्यास प्रवास सुरू केल्यानंतर सुमारे एक तास आणि 45 मिनिटांनंतर पोलर प्रिन्सचा पाणबुडीशी संपर्क तुटला. या पाणबुडीमध्ये 96 तास पाण्याखाली राहण्याची क्षमता आहे, त्यामुळे गुरुवारी पहाटेपर्यंत पाणबुडीवरील प्रवाशांना चिंत नसले.

टायटॅनिकचा अवशेष 4000 मीटर पाण्याखाली आहे, तर नौदलाचे मानवयुक्त बचाव यान केवळ 600 मीटर पाण्याखाली उतरू शकते. जर सबमर्सिबल टायटॅनिकच्या ढिगाऱ्याजवळ असेल तर त्यांच्यापर्यंत पोहोचण्यासाठी अंडरवॉटर ड्रोन किंवा रिमोट-ऑपरेट केलेले वाहन आवश्यक असू शकते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Highway: जमिनी गेल्या, रस्ताही अडला; उगवेकरांचा संताप, एनएच 66 मुळे दैनंदिन जीवन विस्कळीत; मोबदल्याची अद्याप प्रतीक्षा

Bicholim Hit And Run Case: सुरक्षेचा 'तिसरा डोळा' ठरला कर्दनकाळ; अपघातानंतर पळणाऱ्या चालकाच्या मुसक्या आवळल्या, डिचोली पोलिसांची कारवाई

"वाघांचे मृत्यू अन् वन विभागाचे अपयश"; पर्यावरणप्रेमी राजेंद्र केरकर यांचा थेट प्रहार!

Goa Crime: काकाची हत्या करून मावशीकडे घेतला आश्रय! बोरी येथील दीपक नाईक हत्या प्रकरणातील संशयित नराधम पोलिसांच्या तावडीत

Goa Accident: अटल सेतूवर विचित्र अपघात! 1 नाही, 2 नाही... 7 गाड्या एकमेकांना धडकल्या, वाहतूक विस्कळीत; Watch Video

SCROLL FOR NEXT