Titanic Submarine: उरले फक्त 76 तास...! टायटॅनिक पाहण्यासाठी गेलेले ब्रिटिश अब्जाधीश पाणबुडीसह बेपत्ता;

"मला सांगताना अभिमान वाटतो की मी टायटॅनिकच्या अवशेषापर्यंत जाणाऱ्या मोहिमेचा एक भाग आहे."
Hamish Harding
Hamish HardingDainik Gomantak

टायटॅनिकचे अवशेष पाहण्यासाठी पाच पर्यटकांना घेऊन जाणारी पाणबुडी उत्तर अटलांटिकमध्ये बुडाली आहे. रविवारपासून या पाणबुडीबाबत काहीही माहिती नाही. अमेरिकेच्या तटरक्षक दलाकडून मदतकार्य सुरू आहे मात्र अद्याप यश आलेले नाही. या पाणबुडीमध्ये समावेश असलेले हामिश हार्डिंग हे एका एव्हिएशन कंपनीचे मालक आहेत.

धक्कादायक बाब म्हणजे पाणबुडीवर केवळ ९६ तासांचा ऑक्सिजन शिल्लक आहे. 19 जूनपर्यंत चाललेल्या मदतकार्यानंतरही काहीही सापडले नाही, असे बोस्टन तटरक्षक दलाकडून सांगण्यात आले. पाणबुडीवर एक पायलट आणि चार मिशन विशेषज्ञ होते.

पाणबुडीत ब्रिटनचे अब्जाधीश उद्योगपती हमीश हार्डिंग

ब्रिटनचे अब्जाधीश उद्योगपती हमीश हार्डिंग ही या पाणबुडीवर आहेत, असे त्यांच्या कुटुंबाचे म्हणणे आहे. 58 वर्षांचे हार्डिंग देखील एक संशोधक आहेत. गेल्या आठवड्याच्या शेवटी हार्डिंग यांनी सोशल मीडियावर म्हटले होते की, "मला सांगताना अभिमान वाटतो की मी टायटॅनिकच्या अवशेषापर्यंत जाणाऱ्या मोहिमेचा एक भाग आहे."

Hamish Harding
PM Modi in USA: पंतप्रधान अमेरिका दौऱ्यावर रवाना, त्यानंतर गाठणार थेट इजिप्त; जाणून घ्या संपूर्ण शेड्यूल

अधिकृत माहिती

यूएस कोस्ट गार्ड रिअर अ‍ॅडमिरल जॉन मॅगर यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत सांगितले की, "आम्ही अंदाज लावत आहोत की पाणबुडी शोधण्यासाठी आम्हाला 70 तासांपासून 96 तासांपर्यंत वेळ लागू शकतो." या पाणबुडीच्या शोधात दोन विमाने आणि एक पाणबुडी आणि सुसज्ज फ्लोटिंग बार्जेस तैनात करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.

मात्र, ज्या भागात ही शोधमोहीम सुरू आहे तो भाग दूर असल्याने या मोहिमेत अडचणी येत असल्याचेही त्यांनी सांगितले. रिअर अ‍ॅडमिरल म्हणाले की, बचाव मोहिमेत सहभागी असलेले लोक हे ऑपरेशन वैयक्तिकरित्या घेत आहेत आणि पाणबुडीवरील लोकांना वाचवण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करत आहेत.

कंपनीने जबाबदारी स्वीकारली

ही पाणबुडी Oceangate Expeditions द्वारे चालवली जाते. ही कंपनी खोल समुद्रात मोहिमा आयोजित करण्याचे काम करते. या अपघाताची जबाबदारी कंपनीने घेतली आहे. अंतराळवीर आणि पत्रकार स्टीव्ह नॉरिस यांनी स्पष्ट केले आहे की पाणबुडीमध्ये फक्त काही तास ऑक्सिजन शिल्लक आहे. अशा परिस्थितीत क्रूला शोधण्यासाठी केवळ ७२ तासांचा अवधी आहे.

Hamish Harding
Cough syrup मुळे कॅमेरूनमध्ये 12 मुलांचा मृत्यू; वाचा, या प्रकरणाचा भारताशी काय संबंध?

टायटॅनिकचा इतिहास

टायटॅनिक जहाज 1912 मध्ये एका ग्लेशियरला आदळल्याने बुडाले होते. या जहाजाच्या अवशेषाबाबत पर्यटकांमध्ये प्रचंड उत्सुकता आहे. ते त्यासाठी पैसेही देतात आणि नंतर छोट्या पाणबुडीच्या साहाय्याने त्याच्या अवशेषापर्यंत पोहोचतात.

टायटॅनिक जहाजाचे अवशेष सुमारे 3800 मीटर खोल आहेत. त्याचे अवशेष कॅनडातील न्यूफाउंडलँड येथे उत्तर अटलांटिकच्या तळाशी पडलेला आहे.

टायटॅनिकवरील 2,200 लोकांपैकी सुमारे 1,500 लोक मरण पावले होते. जहाज साउथॅम्प्टन ते न्यूयॉर्क या आपल्या पहिल्याच प्रवासाला निघाले होते. ग्लेशियरवर आदळल्यानंतर त्याचे दोन तुकडे झाले आणि ते सरळ खाली गेले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com