Nepal Weather Update Dainik Gomantak
ग्लोबल

Nepal Weather Update: नेपाळमध्ये खराब हवामान ठरतयं 'काळ'; वेगवेगळ्या घटनांमध्ये तब्बल 28 जणांचा मृत्यू

Nepal Landslide Update: 10 जून रोजी मॉन्सून नेपाळच्या पूर्व भागात दाखल झाला होता आणि तेव्हापासून देशाला अनेक नैसर्गिक आपत्तींचा फटका बसला आहे.

Manish Jadhav

नेपाळमध्ये खराब हवामानामुळे दैनंदिन जीवन विस्कळीत झाले आहे. नैऋत्य मॉन्सूनचे आगमन झाल्यापासून गुरुवारपर्यंत हवामानाशी संबंधित घटनांमुळे सुमारे 28 जणांचा मृत्यू झाला असून भूस्खलन, पूर आणि वीज पडून देश प्रभावित झाला आहे.

10 जून रोजी मॉन्सून नेपाळच्या पूर्व भागात दाखल झाला तेव्हापासून देशाला मोठ्या नैसर्गिक आपत्तींचा फटका बसला आहे. बुधवारी विविध जिल्ह्यांतून भूस्खलन, पूर आणि वीज पडण्याच्या 44 घटना घडल्या.

दरम्यान, नेपाळ तीन मुख्य भौगोलिक प्रदेशांमध्ये विभागलेला आहे - हिमालयी प्रदेश, मध्य पर्वतीय प्रदेश आणि तराई. अनेक लहान-मोठ्या नद्या हिमालय पर्वतरांगांमधून वाहतात, जिथे हवामान बदलामुळे हवामानाशी संबंधित घटना वाढत आहेत. गृह मंत्रालयाच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, पूर्व आणि पश्चिम नेपाळमधील पाच जिल्ह्यांमध्ये भूस्खलन आणि पुरामुळे 15 जणांचा मृत्यू झाला आहे.

नॅशनल डिझास्टर रिस्क रिस्पॉन्स अँड मॅनेजमेंट अथॉरिटीचे प्रवक्ते दिजान भट्टराई यांनी दिलेल्या माहितीनुसार, लमजुंग आणि तपलेजुंग जिल्ह्यात प्रत्येकी पाच, कास्कीमध्ये दोन आणि संखुवासभा आणि ओखलढुंगा जिल्ह्यात प्रत्येकी एकाचा भूस्खलनामुळे मृत्यू झाला. त्यांनी पुढे सांगितले की, मोरंग जिल्ह्यात पुरामुळे एकाचा मृत्यू झाला आणि दुसरा बेपत्ता झाला.

भूस्खलनामुळे 30 घरे जमीनदोस्त झाली

भूस्खलनामुळे (Landslide) या भागातील 30 घरांचे पूर्णपणे नुकसान झाले आहे. त्याचप्रमाणे 11 जिल्ह्यांमध्ये 13 जणांचा मृत्यू झाला असून त्यात झापा आणि कैलाली जिल्ह्यांतील प्रत्येकी दोन जणांचा वीज पडून मृत्यू झाला आहे, असे अधिकाऱ्यांनी सांगितले.

दरम्यान, अधिकाऱ्यांनी सांगितले की, ओखलढुंगा जिल्ह्यातील भूस्खलनात जखमी झालेल्या दोघांना बुधवारी विमानाने काठमांडूला नेण्यात आले आणि त्यांच्यावर खाजगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

सरकारने (Government) लष्कर, सशस्त्र पोलीस दल, पोलीस कर्मचारी तसेच स्थानिक लोकांना बचाव आणि मदत कार्यासाठी तैनात केले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

वास्कोत भररात्री गोंधळ! प्रार्थनास्थळी दानपेटी फोडली, मूर्तीचे नुकसान, अंतर्वस्त्रे घालून फिरणाऱ्या व्यक्तीवर संशय; कोण आहे हा 'अर्धनग्न' संशयित?

Cooch Behar Trophy: कल्याणी मैदानात रंगला सामना! बंगालविरुद्ध गोव्याचा डाव गडगडला, आता आराध्य-व्यंकट यांची जोडीच तारणहार!

IPL 2026 Auction: दमदार कामगिरीचं फळ! सुयश, ललित अन् अभिनव आयपीएल लिलावात; गोव्याच्या त्रिकूटावर सर्वांच्या नजरा

Zilla Panchayat Election: 'मागच्या दरवाजानं काँग्रेसमध्‍ये कुणालाही प्रवेश दिला नाही', जिल्हाध्यक्षांनी स्पष्टचं सांगितलं; सासष्टीतील पाचही जागांसाठी अर्ज दाखल

Zilla Panchayat Election: धारगळ मतदारसंघात काँग्रेसमध्‍ये उफाळला कलह, ऐनवेळी ज्ञानेश्‍‍वर शिवजी यांना उमेदवारी नाकारल्‍याने बंडाचा सूर

SCROLL FOR NEXT