Everest MDH
Everest MDHDainik Gomantak

Nepal: नेपाळनेही एव्हरेस्ट, MDH मसाल्यावर घातली बंदी; धोकादायक केमिकलबाबत केली कारवाई

Nepal: नेपाळनेही मसाल्यांची चाचणी सुरु केली आहे. हे दोन्ही ब्रँड मसाल्यांमध्ये खूप लोकप्रिय झाले होते. त्याची जगातील अनेक देशांमध्ये निर्यातही होते.
Published on

Nepal: सिंगापूरनंतर हाँगकाँगनेही एव्हरेस्ट आणि एमडीएच मसाल्यांच्या विक्रीवर बंदी घातली. आता नेपाळच्या खाद्य तंत्रज्ञान आणि गुणवत्ता नियंत्रण विभागाने सांगितले की, या मसाल्यांमध्ये इथिलीन ऑक्साईड असण्याची शक्यता आहे. इथिलीन ऑक्साईडचा वापर कीटकनाशक म्हणून केला जातो. नेपाळनेही मसाल्यांची चाचणी सुरु केली आहे. हे दोन्ही ब्रँड मसाल्यांमध्ये खूप लोकप्रिय आहेत. त्याची जगातील अनेक देशांमध्ये निर्यातही होते.

दरम्यान, ब्रिटननेही मसाल्यांच्या चौकशीचे आदेश दिले आहेत. याशिवाय, रिपोर्टनुसार, या मसाल्यांविरोधात न्यूझीलंड, अमेरिका आणि ऑस्ट्रेलियामध्येही तपास सुरु केला जाऊ शकतो. नेपाळच्या खाद्य आणि तंत्रज्ञान विभागाचे प्रवक्ते मोहन कृष्ण महर्जन म्हणाले की, एव्हरेस्ट आणि एमडीएच मसाल्यांच्या आयातीवर बंदी घालण्यात आली आहे. याशिवाय, बाजारात विक्रीवरही बंदी घालण्यात आली आहे. मसाल्यांमध्ये धोकादायक केमिकल असल्याचा संशय आल्यानंतर ही कारवाई करण्यात आली आहे. मात्र, याबाबतचा अंतिम अहवाल अद्याप आलेला नाही. तपास सुरु आहे.

 Everest MDH
Nepal Plane Crash: पायलटने चुकीचा लीव्हर ओढला आणि विमान कोसळले; 72 जणांचा मृत्यू- रिपोर्ट

इथिलीन ऑक्साईड हे कार्सिनोजेनिक केमिकल असल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. या मसाल्यांचा न्यूझीलंडच्या बाजारातही मोठा दबदबा आहे. नुकतेच हाँगकाँग आणि सिंगापूरच्या खाद्य संस्थांनी एव्हरेस्टच्या फिश करीवर बंदी घातली. तथापि, एजन्सीने असेही म्हटले आहे की, ‘’कमी प्रमाणात या मसाल्यांचे सेवन केल्यास कोणताही धोका नाही. परंतु दीर्घकाळ सेवन करत राहिल्यास कर्करोगाचा धोका उद्भवू शकतो.’’

 Everest MDH
Restore Monarchy In Nepal: ''राजेशाही बहाल करा...'', हिंदू नेत्याने नेपाळमध्ये सुरु केले आंदोलन; हजारो लोक उतरले रस्त्यावर!

दरम्यान, हा रंगहीन गॅस असून त्याला गंध आहे. हे अँटी फ्रीझ केमिकल बनवण्यासाठी वापरले जाते. त्याचबरोबर याचा वापर डिटर्जंट, फोम, औषधे आणि कापड उद्योगातही केला जातो. याशिवाय, रुग्णालयांमध्ये स्वच्छता उपकरणांसाठीही याचा वापर केला जातो. त्याला ग्रुप 1 कार्सिनोजेन श्रेणीमध्ये ठेवण्यात आले आहे. याचा अर्थ हे केमिकल कार्सिनोजेनिक असल्याचा पुरेसा पुरावा आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com