Baba Vanga Dainik Gomantak
ग्लोबल

Baba Vanga: किती वर्षात होणार जगाचा अंत? बाबा वेंगाच्या भाकितांनी पुन्हा उडवली झोप !

Baba Vanga Prediction Update: बल्गेरियात जन्मलेल्या बाबा वेंगा यांची अनेक भाकीते आत्तापर्यंत खरी ठरली आहेत.

दैनिक गोमन्तक

Baba Vanga Prediction Update: बल्गेरियात जन्मलेल्या बाबा वेंगा यांची अनेक भाकीते आत्तापर्यंत खरी ठरली आहेत. त्यांच्या भाकितांसंबंधी अनेकदा चर्चाही होते. बाबा वेंगा यांनी 111 वर्षांपूर्वी एक भविष्यवाणी केली होती, ज्याबद्दल जगभरात भीतीचे वातावरण आहे. बाबा वेंगा यांनी 2022 वर्षासाठी अनेक भाकिते केली होती, त्यापैकी 2 आत्तापर्यंत खरी ठरली आहेत, त्यानंतर आता 2023 च्या भाकितांवर चर्चा होत आहे. बाबा वेंगा यांना बाल्कनचा 'नॉस्ट्राडेमस' म्हणूनही ओळखले जाते. बाबा वेंगा यांनी 2022 या वर्षासाठी अनेक भाकिते केली होती, त्यापैकी दोन पूर्णतः खरी ठरली आहेत. त्याच वेळी, भविष्यासाठी त्यांनी जे भाकीत केले होते, त्याचा धोका अद्याप टळलेला नाही.

काळाचे चाक उलटे फिरणार!

बाबा वेंगा यांच्या म्हणण्यानुसार, पुढील वर्षी 2023 मध्ये पृथ्वी आपली कक्षा बदलणार आहे. यानंतर जगभरातील हवामान आणि स्थितीबाबत अनेक अंदाज बांधले जात आहेत. बाबा वेंगा पुढे म्हणाल्या होत्या की, 2023 मध्ये पृथ्वीवरील (Earth) बदलानंतर पाच वर्षांनी म्हणजेच 2028 मध्ये अंतराळवीर शुक्र ग्रहावर पोहोचतील.

जगाचा अंत कधी होणार?

बाबा वेंगा यांच्यावर संपूर्ण जगाचा विश्वास आहे. जगाचा निरोप घेण्यापूर्वी बाबा वेंगा यांनी जगाच्या अंतापासून, युद्ध आणि अगदी नैसर्गिक आपत्तींपर्यंत अगदी अचूक भाकीत केली होती. बाबा वेंगा, ज्यांना बाल्कनचा 'नॉस्ट्राडेमस' म्हटले जाते, त्यांनी 5079 पर्यंत भविष्यवाणी केली. बरीच वर्षे लोटली, पण त्यांच्या भविष्यवाण्यांनी मोठ्या देशांबद्दल अशी अचूक भाकीत केली जणू त्यांनी त्यांची संपूर्ण कुंडलीच बनवली होती. बाबा वेंगा यांनी जगाच्या अंताचीही भविष्यवाणी केली होती. जगाचा अंत केव्हा होईल हे त्यांनी सांगितले आहे. बाबा वेंगाच्या भविष्यवाणीनुसार 5079 साली जगाचा अंत होईल.

मानव 100 वर्षे जगू लागेल

बाबा वेंगाच्या आणखी एका धक्कादायक भविष्यवाणीनुसार, 2046 मध्ये, एक व्यक्ती 100 वर्षे जगू लागेल. मानवी अवयव प्रत्यारोपणाच्या क्षेत्रात इतकी प्रगती होईल की, लोक पूर्वीपेक्षा जास्त काळ जगू लागतील. त्याचवेळी बाबा वेंगा यांनी असेही म्हटले होते की, 'अशी वेळ येईल जेव्हा पृथ्वीवर रात्र नसेल.' हा धोका इतका मोठा असल्याचे सांगण्यात आले आहे की, पुढील काही दशकांमध्ये म्हणजेच 2100 सालापर्यंत पृथ्वीचे अनेक भाग कृत्रिम सूर्यप्रकाशाने प्रकाशित करावे लागतील.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

WTC Points Table: इंग्लंडला डबल झटका! आधी कांगारुंनी मैदानात दिली मात, नंतर WTC पॉइंट टेबलमध्ये झाली घसरण; जाणून घ्या भारताची सध्याची स्थिती

गोव्यात जमीनमालकांना झटका! मुंडकारांना हक्क मिळेपर्यंत जमिनीची विक्री होणार नाही; मुख्यमंत्र्यांनी घेतला मोठा निर्णय

Shani Gochar: 2026 नव्हे 2027 मध्ये होणार शनिदेवाचे राशी परिवर्तन, 'या' 5 राशींना राहावं लागणार सावधान; आरोग्य, धन आणि संबंधांवर थेट परिणाम!

Baba Vanga Predictions: 2026 मध्ये 'या' 5 राशीचे लोक होणार मालामाल, बाबा वेंगांची 'अफाट धनलाभा'ची भविष्यवाणी; शनिदेवाची राहणार कृपा!

IFFIESTA: संगीतप्रेमींनो, IFFI घेऊन आलंय 3 धमाकेदार कॉन्सर्ट्स पूर्णपणे मोफत; कधी आणि कुठे? सविस्तर माहिती येथे!

SCROLL FOR NEXT