Baba Vanga Dainik Gomantak
ग्लोबल

Baba Vanga Predictions: सर्वनाश होणार? बाबा वेंगा यांच्या 2023 च्या भाकिताने...!

Baba Vanga Predictions: बाबा वेंगा यांच्या भाकितांबद्दल लोकांमध्ये भीती आहे. त्यांची अनेक भाकिते आत्तापर्यंत खरी ठरली आहेत.

Manish Jadhav

Baba Vanga Predictions: बाबा वेंगा यांच्या भाकितांबद्दल लोकांमध्ये भीती आहे. त्यांची अनेक भाकिते आत्तापर्यंत खरी ठरली आहेत. 2023 या वर्षाच्या संदर्भात त्यांनी केलेल्या भाकितांनी मानवजातीलाही धोका असल्याचे स्पष्ट झाले आहे. बल्गेरियातील रहिवासी बाबा वेंगा यांच्या मृत्यूनंतरही त्यांची भाकिते खरी ठरत आहेत.

दरम्यान, News.com.au नुसार, 2023 वर्ष संपण्यापूर्वी आण्विक आपत्ती येईल. डायनाचा मृत्यू, महामारीची आणि अमेरिकेसह (America) संपूर्ण जगाला हादरवून सोडणाऱ्या 9/11ची भविष्यवाणी करणाऱ्या या बाबा वेंगाच आहेत.

रिपोर्टनुसार, त्यांचे नाव 'वेन्जेलिया पांडेवा दिमित्रोवा' होते. वयाच्या 12 व्या वर्षी त्यांनी आपली दृष्टी गमावली. यानंतर त्यांनी जगाविषयी भाकिते व्यक्त करण्यास सुरुवात केली.

अणु प्रकल्पात स्फोट होण्याचा इशारा दिला होता.

तसेच, बाबा वेंगा यांच्या भाकितांवर विश्वास ठेवणाऱ्यांचे म्हणणे आहे की, 2023 मध्ये त्यांनी अणु प्रकल्पात स्फोट होण्याचा इशारा दिला होता. त्यांच्या मते, यामुळे आकाश विषारी ढगांनी व्यापले जाईल. बाबा वेंगा यांच्या अनुयायांच्या मते, या स्फोटामुळे अनेक देश प्रभावित होतील, त्यामुळे अनेक धोकादायक आजार पसरतील.

News.com.au च्या रिपोर्टनुसार, 2023 साठी बाबा वेंगा यांनी पृथ्वीच्या हवामानावर परिणाम करणाऱ्या धोकादायक सौर वादळाबाबत भाकीत केले होते. त्यांचे सर्वात धोकादायक भाकीत हे देखील आहे की, एक महासत्ता जैविक शस्त्रांचा वापरु करु शकते, ज्यामुळे हजारो लोकांचा मृत्यू होऊ शकतो.

दुसरीकडे, बाबा वेंगा यांना बाल्कन प्रदेशातील 'नॉस्ट्राडेमस' म्हणूनही ओळखले जाते. त्यांनी भारताबाबतही भाकीत केले आहे, जे खरे ठरले तर मृत्यू ओढवेल.

नेदरलँडचे संशोधक फ्रँक हूगरबीट्स यांनीही काही काळापूर्वी सीरिया आणि तुर्कीजवळ भूकंप होण्याची शक्यता वर्तवली होती. ही भविष्यवाणी खरी ठरली. बाबा वेंगा यांनी अनेक वर्षांपूर्वीच नैसर्गिक आपत्तीबद्दल सांगितले होते.

याशिवाय, ह्युगरबीट्सने भारताबाबत म्हटले आहे की, अफगाणिस्तान, पाकिस्तान आणि भारतालाही मोठ्या भूकंपातून (Earthquake) जावे लागू शकते. बाबा वेंगा यांनीही आशियाई देशांबाबत असेच भाकीत केले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Donald Trump: "त्यांच्या 'किल लिस्ट'मध्ये मी टॉपवर!", हत्येच्या कारस्थानाचा आरोप करत ट्रम्प यांनी मोडला इराणसोबतचा शांतता करार; युद्धाचा उडणार भडका?

Mangal Gochar: नशीब बदलणार, गरिबी हटणार! 'या' 5 भाग्यशाली राशींवर होणार पैशांचा पाऊस; 24 जुलैपासून मंगळ देवाचा महाधमाका

WhatsApp Username Feature: व्हॉट्सॲपच्या 'युझरनेम' फिचरने वापरकर्त्यांचा फायदा की सायबर गुन्हेगारांची चांदी?

Goa Politics: राजकारणात 'नव्या' पक्षांचा जुना खेळ

Goa Congress: अमित पाटकर अखेर काँग्रेस भवनात; आवश्यक दस्तऐवज संबंधित पदाधिकाऱ्याकडे सुपूर्द

SCROLL FOR NEXT