Baba Vanga Dainik Gomantak
ग्लोबल

Baba Vanga: 2023 वर्ष किती धोकादायक असेल, बाबा वेंगा यांनी केले हे मोठे भाकीत

Baba Vanga Predictions List: बल्गेरियात जन्मलेल्या बाबा वेंगा यांच्या भाकितांची अनेकदा चर्चा होते.

दैनिक गोमन्तक

Baba Vanga Predictions For 2023: बल्गेरियात जन्मलेल्या बाबा वेंगा यांच्या भाकितांची अनेकदा चर्चा होते. 2022 सालासाठी केलेल्या भाकितांपैकी आतापर्यंत 2 भाकिते खरी ठरली आहेत. यानंतर आता लोकांना बाबा वेंगा यांनी 2023 बद्दल केलेल्या भविष्यवाणीबद्दल जाणून घ्यायचे आहे.

2023 मध्ये पृथ्वीची कक्षा बदलेल

बाबा वेंगा (Baba Vanga) यांनी केलेल्या भाकितांनुसार, 2023 मध्ये सर्वात मोठी खगोलीय घटना घडेल आणि पृथ्वीची कक्षा बदलेल. या घटनेचे गंभीर परिणाम होऊ शकतात. विशेष म्हणजे, पृथ्वीवर (Earth) अनेक बदल शक्य आहेत. याशिवाय बाबा वेंगा यांनी 2028 मध्ये व्हीनसवर अंतराळवीराच्या आगमनाची भविष्यवाणी केली होती.

5079 मध्ये जगाच्या अंताची भविष्यवाणी

बाबा वेंगाच्या भविष्यवाणीनुसार, 2046 मध्ये, अवयव प्रत्यारोपणाच्या मदतीने, लोक 100 वर्षांहून अधिक जगू शकतील. याशिवाय त्यांनी जगाच्या अंताची भविष्यवाणी केली होती. 5079 साली जगाचा अंत होईल, असे सांगितले होते.

2022 मध्ये भारतात उपासमारीची भविष्यवाणी

द सनच्या रिपोर्टनुसार, बाबा वेंगा यांनी 2022 मध्ये भारतात (India) उपासमारीची भविष्यवाणी केली होती. त्यांनी सांगितले होते की, 2022 मध्ये जगभरातील तापमानात घट होईल आणि त्यामुळे टोळांचा प्रादुर्भाव वाढेल, ज्याचा परिणाम भारतावरही होईल. टोळांच्या हल्ल्यामुळे पिकांचे मोठे नुकसान होईल आणि दुष्काळासारखी परिस्थिती निर्माण होऊ शकते. त्यामुळे भारतात तीव्र उपासमारीची परिस्थिती निर्माण होऊ शकते.

ही 19 वर्षांची मुलगी नव्या युगाचा बाबा वेंगा बनली

दरम्यान, अमेरिकेतील (America) एक 19 वर्षीय तरुणी समोर आली आहे, जिला लोक नव्या युगाची बाबा वेंगा म्हणत आहेत. अमेरिकेतील मॅसॅच्युसेट्स येथे राहणारी हॅना कॅरोल तिच्या भविष्यवाण्यांमुळे चर्चेत आहे, जिने 2022 च्या सुरुवातीला महाराणी एलिझाबेथ II च्या मृत्यूची भविष्यवाणी केली होती, जी खरी ठरली आहे. याशिवाय, हॅनाने किम कार्दशियन, हॅरी स्टाइल्स आणि बियॉन्सेचा नवीन अल्बम, रिहाना आणि प्रियांका चोप्राचे (Priyanka Chopra) यांच्या आई बनण्याचे भाकीत देखील केले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT