woman survives parachute accident Dainik Gomantak
ग्लोबल

Viral Video: विमानाची टक्कर झाली अन् हवेतच पॅराशूट फाटला... मृत्यूच्या दाढेतून 44 वर्षांची महिला थोडक्यात वाचली; अंगावर काटा आणणारा व्हिडिओ व्हायरल

Austria Alps Paraglider Plane Collision: ऑस्ट्रियाच्या आल्प्स पर्वतरांगांमधून समोर आलेल्या एका व्हिडिओने नेटीझन्सच्या काळजाचा ठोका चुकवला.

Manish Jadhav

Austria Alps Paraglider Plane Collision: सोशल मीडियावर दररोज थक्क करणारे अनेक व्हिडिओ व्हायरल होतात, मात्र सध्या ऑस्ट्रियाच्या आल्प्स पर्वतरांगांमधून समोर आलेल्या एका व्हिडिओने नेटीझन्सच्या काळजाचा ठोका चुकवला. आकाशात अत्यंत शांतपणे पॅराग्लाइडिंग करणाऱ्या एका महिला पॅराग्लाइडरला अचानक एका लहान विमानाने पाठीमागून जोरदार धडक दिली.

ही धडक इतकी भीषण होती की, विमानाचे पंख पॅराग्लाइडरच्या पॅराशूटला मध्यभागातून अक्षरशः चिरत निघून गेले. हा अंगावर काटा आणणारा अपघात उत्तर ऑस्ट्रियातील (Austria) श्मिटेनहोहे पर्वताजवळ घडला. 44 वर्षीय सबरीना नावाची महिला शनिवारी या नयनरम्य पर्वताच्यावर आकाशात उड्डाणाचा आनंद घेत असतानाच तिच्यासोबत हा दुर्दैवी प्रसंग ओढवला.

या अपघाताचा (Accident) फर्स्ट-पर्सन व्हिडिओ समोर आला असून, तो पाहून कोणाचाही थरकाप उडेल. व्हिडिओमध्ये दिसते की, एक लहान विमान सबरीनाच्या पॅराशूटला फाडून पुढे निघून जाते. विमानाची धडक बसताच पॅराग्लाइडरचा विंग पूर्णपणे फाटतो आणि सबरीना हवेत अत्यंत वेगाने गोल-गोल फिरत खाली कोसळू लागते. पॅराशूटचे फाटलेले कापड तिच्या अंगाभोवती गुंडाळले जाते आणि हवेतील तिचे नियंत्रण पूर्णपणे सुटते.

आकाशात हजारो फूट उंचीवर असताना साक्षात मृत्यू डोळ्यांसमोर दिसत असूनही सबरीनाने कमालीचे धैर्य दाखवले. प्रचंड घबराट आणि गोंधळाच्या परिस्थितीतही तिने हार न मानता स्वतःला सावरण्याचा आटोकाट प्रयत्न केला. अगदी शेवटच्या क्षणी, जमिनीवर आदळण्यापूर्वी तिने तिचे 'इमर्जन्सी पॅराशूट' उघडण्यात यश मिळवले आणि एका मोठ्या अनर्थातून तिचे प्राण वाचले.

एवढ्या भीषण आणि जीवघेण्या अपघातानंतरही सबरीना केवळ किरकोळ दुखापती आणि ओरखड्यांवर बचावली, हा एक मोठा चमत्कारच मानला जात आहे. या थरारक अनुभवानंतर तिने इन्स्टाग्रामवर आपली भावना व्यक्त करताना लिहिले की, "मी आज जिवंत राहून इथे बसून हे सर्व लिहित आहे, यावर माझा अजूनही विश्वास बसत नाहीये." पर्वताच्या उतारावर कोसळण्याच्या काही सेकंद आधी तिचे बॅकअप पॅराशूट उघडल्याने तिचा वेग मंदावला. त्यानंतर पोलीस हेलिकॉप्टरच्या मदतीने तिचे डोंगरातून रेस्क्यू बचाव करण्यात आले आणि उपचारासाठी तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले.

दुसरीकडे, सबरीनाला धडक दिल्यानंतर 28 वर्षीय विमान चालक देखील आपले विमान नियंत्रित करत 'जेल एम सी' विमानतळावर सुरक्षितपणे लँडिंग करण्यात यशस्वी ठरला. या धडकेत विमानाचेही थोडे नुकसान झाले. विमान वाहतूक अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, विमानाचा पायलट अत्यंत अनुभवी होता आणि त्यांनी दावा केला की, महिला पॅराग्लाइडर अचानक त्याच्या विमानासमोर आली, ज्यामुळे ही धडक टाळण्यासाठी त्याला कोणतीही संधी मिळाली नाही. सध्या स्थानिक प्रशासन या दोन्ही हवाई वाहनांच्या अपघाताची चौकशी करत आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Vasco Land Project: वास्कोतील सरकारी जमीन लाटण्याचा घाट! गरज पडल्यास विरोधासाठी रस्त्यावर उतरणार- जुझे फिलिप डिसोझा

Goa High Court: हॉटेल एफएआर घोटाळा: 2 आठवड्यात प्रतिज्ञापत्र सादर करा, अन्यथा मुख्य नगरनियोजकांना कोर्टात हजर राहावे लागेल

Goa Rough sea: बेतुल येथील फ्लोटिंग जेटी कोसळली; नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण, धोकादायक जेटी हटवण्याची मागणी

Meta AI Smart Glass: तुमची प्रत्येक हालचाल, प्रत्येक संवाद एआयच्या नजरेत? मेटा आणतंय 'सुपर-सेन्सिंग' चष्मा, पाहणाऱ्या-ऐकणाऱ्या गॅझेटमुळे गोपनीयतेवर प्रश्नचिन्ह

Goa Hotel Death: फातोर्ड्यात खळबळ! नोएडातील व्यावसायिकाचा हॉटेलमध्ये संशयास्पद मृत्यू, पुढील तपास सुरू

SCROLL FOR NEXT