Imran Khan  Dainik Gomantak
ग्लोबल

Pakistan: इमरान खान यांच्या पत्नीची ऑडीओ क्लीप होतेय व्हायरल....

Pakistan: इमरान खान यांची पत्नी बुशरा बीबी आणि तहरीक-ए-इंसाफ ( पीटीआई )चे नेते जुल्फिकार बुखारी यांच्यातील ती ऑडीओ क्लीप असल्याचे समोर आले आहे.

दैनिक गोमन्तक

Pakistan:पाकिस्तानचे तत्कालीन पंतप्रधान इमरान खान सतत कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेत असतात. आता मात्र त्यांच्या पत्नीचा एक ऑडीओ व्हायरल झाल्यामुळे ते चर्चेत आहेत. इमरान खान यांची पत्नी बुशरा बीबी आणि तहरीक-ए-इंसाफ ( पीटीआई )चे नेते जुल्फिकार बुखारी यांच्यातील ती ऑडीओ क्लीप असल्याचे समोर आले आहे.

यामध्ये बुशरा बीबी , जुल्फिकार बुखारी यांना इमरान खान यांच्या महागड्या घड्याळांबद्दल सांगत आहे. त्या म्हणतात- " खान साहेंबाजवळ महागडी घड्याळे आहेत,ती तुम्हाला देण्यास सांगितली आहेत.जेणेकरुन ती तुम्ही विकू शकाल. "बुशरा बीबी यांच्या या वक्तव्यावर जुल्फिकार बुखारी म्हणतात- मी हे काम करेन.

ही ऑडीओ क्लीप व्हायरल झाल्यानंतर पाकिस्तान ( Pakistan ) च्या राजकारणात मोठा वाद निर्माण झाला आहे. हा वाद निर्माण होण्याचे कारण म्हणजे, सौदी अरेबियाचे प्रिंस मोहम्मद बिन सलमान यांनी रत्न जडित मास्टरग्राफ मनगटी घड्याळ इमरान खान यांना भेट म्हणून दिले असल्याचे म्हटले जात आहे. दरम्यान, दुबई ( Dubai )मध्ये करोडोंचा व्यवसाय असलेले उमर फारुख यांनी आपण हे घड्याळ इम्रान खान यांच्या जवळच्या व्यक्तीकडून विकत घेतल्याचे म्हटले आहे. मात्र पीटीआयने उमर फारुख यांच्या व्यक्तव्याला विरोध दर्शवला आहे. त्याचबरोबर पीटीआयने हेही स्पष्ट केले आहे की घड्याळ इस्लामाबादमधील 'आर्ट ऑफ टाइम 'ला विकले आहे. त्याची रिसिट मंत्रीमंडळासमोरसुद्धा प्रस्तुत केली होती. यानंतर पाकिस्तानमधल्या तोशखाना प्रकारणाला वेगळे वळण लागण्याची शक्यता आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Android युजर्ससाठी खूशखबर! WhatsApp चा लूक पूर्णपणे बदलणार; आता तुमच्या फोनमध्येही दिसणार iPhone सारखा स्टायलिश 'फ्लोटिंग बार'!

Goa Postmen: गोव्यातील पोस्टमन 'आऊटसाईडर', 15 वर्षांपासून रोजंदारीवर; कायमस्वरूपी नोकरीसाठी आमदार आमोणकरांना साकडे

Pakistan Minister Video: ''अशी परत जाऊ नकोस''! पाकिस्तानी मंत्र्याचा महिला पत्रकाराची खिल्ली उडवणारा व्हिडिओ व्हायरल; यूजर्सनी घेतलं फैलावर

VIDEO: 'मुंबईचा राजा रोहित शर्मा...' मैदानात चाहत्यांची जोरदार घोषणाबाजी; हिटमॅनची 'ती' खास रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद, व्हिडिओ व्हायरल!

आखाड्यात अनियमित पाणीपुरवठ्याने नागरिक त्रस्त, महिलांची पाण्यासाठी धावपळ; विहिरींचे पाणीही पिण्यायोग्य नसल्यानं नाराजी

SCROLL FOR NEXT